रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1188 चाचण्यात 131 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 3 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी
जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.2) दिवसभरात झालेल्या 1188 चाचण्या झाल्या त्यात 131 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा
रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोट येथे 57 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तेल्हारा येथे 17 चाचण्या
झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 44 चाचण्या झाल्या त्यात सहा
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला
महानगरपालिका येथे 787 चाचण्या झाल्या त्यात 48 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 14 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 77 चाचण्या झाल्या
त्यात 34 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,
तर हेडगेवार लॅब येथे 75 चाचण्या झाल्या त्यात 30
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला येथे 25, बाळापूर येथे 18, बार्शीटाकळी
येथे सात, पातूर येथे 48, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 19 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला
नाही, असे 1188 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 131 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 13 हजार 704 चाचण्या झाल्या पैकी 9516 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा