पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’ पॉझिटिव्ह

अकोला दि.31(जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 61 अहवाल प्राप्त झाले.   त्यात कोणाचाही अहवाल   पॉझिटीव्ह आला नाही,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0)0 +रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 0. आरटीपीसीआर ‘निरंक’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. सक्रिय रुग्ण ‘15’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66096(49963+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 सक्रिय रुग्ण आहेत,   अशी माहिती    जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.   ०००००

जिल्ह्याची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४८ पैसे

अकोला,दि. 30   (जिमाका)-    सन 2022-23 या वर्षाकरीता  तहसिलदार    यांच्याकडुन प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी हंगामी अंतिम पैसेवारी 48 पैसा इतकी जाहिर करण्यात आली आहे,    असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. तालुक्यानिहाय हंगामी पैसेवारी याप्रमाणे : अकोलाचे 45 पैसे, अकोट 48 पैसे, तेल्हारा 47 पैसे, बाळापूर 51 पैसे, पातूर 51 पैसे, मुर्तिजापूर 46 पैसे तर बार्शीटाकळी 50 पैसे असे सरासरी 48 पैस निश्चित करण्यात आली आहे. 00000

कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’ पॉझिटिव्ह

अकोला दि.30(जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 76 अहवाल प्राप्त झाले.   त्यात कोणाचाही अहवाल   पॉझिटीव्ह आला नाही,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0)0 +रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 0. आरटीपीसीआर ‘निरंक’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. सक्रिय रुग्ण ‘15’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66096(49963+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 सक्रिय रुग्ण आहेत,   अशी माहिती    जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.   ०००००

सोमवारी(दि.2) जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

इमेज
अकोला , दि. 30 ( जिमाका)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे,   जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अकोला याच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 2 जानेवारी 2023 रोजी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या कलांचा समावेश करण्यात असून पात्र व इच्छुक मंडळ किंवा स्पर्धाकांनी सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.   जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन सोमवार दि. 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वा 30 मि.नी भारत स्काऊट आणि गाईड कार्यालय येथील हॉलमध्ये करण्यात आले आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या दोन कलांचा समावेश राहणार असून लोकगीतासाठी साथसंगत देण्याऱ्यायासह जास्तीत जास्त दहा स्पर्धक व लोकनृत्य या स्पर्धामध्ये विस स्पर्धक सहभागी होवू शकतात. स्पर्धत सहभागी होणारे स्पर्धक व साथसंगत देणाऱ्यांचे वयवर्ष 15 ते 29 वयोगटातील असावे. लोकनूत्य सादर करणाऱ्या   संघाने पुर्वाध्वनीमुद्रित टेप अथवा रेकॉडिगला परवानगी दिली जाणार नाही. तसेच लोकगीत सादर करणाऱ्या संघाचे गीत व लो

अमरावती विभाग पदविधर निवडणूक कार्यक्रम घोषीत; 30 जानेवारीला मतदान तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी

इमेज
  अकोला ,   दि. 30( जिमाका)-   भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषद अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. कार्यक्रमानुसार मतदान सोमवार दि. 30 जानेवारी 2023 रोजी तर मतमोजणी गुरुवार दि. 2 फेब्रवारी रोजी होईल ,   अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्र. जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिली. निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे गुरुवार दि. 5 जानेवारी रोजी विधान परिषद सदस्याची निवडणुकीची अधिसूचना जाहीर करणे. गुरुवार दि. 12 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक.  शुक्रवार दि. 13 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करणे. सोमवार दि. 16 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिनांक. सोमवार दि. 30 जानेवारी रोजी  सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान. गुरुवार दि. 2 फेबुवारी रोजी मतमोजणी व शनिवार दि. 4 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे. पदविधर निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून तात्काळ प्रभावाने जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहिल ,   असे प्र.जिल्हाधिकारी सौरभ कटीयार   यांनी पत्राव्दारे कळविले आहे. 000000

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा; शाळा महाविद्यालयांनी उत्स्फुर्तने सहभागी व्हा

इमेज
अकोला , दि. 29( जिमाका)-     मराठी भाषा विभागाव्दारे सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये दि. 14 ते 28 जानेवारी 2023 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सर्व शाळा व महाविद्यालयानी मराठी भाषा संवर्धनासाठी पंधरवाडा कालावधीत विविध कार्यक्रमाचे नियोजन करुन पंधरवाडा यशस्वी करण्यासाठी उत्स्फुर्तने सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.             जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकशाही सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, राष्ट्रीय सेवा योजनाचे जिल्हा समन्वयक प्रा. येऊले, शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी उपस्थित होते. 00000

कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’ पॉझिटिव्ह

अकोला दि.29(जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 83 अहवाल प्राप्त झाले.   त्यात कोणाचाही अहवाल   पॉझिटीव्ह आला नाही,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0)0 +रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 0. आरटीपीसीआर ‘निरंक’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. सक्रिय रुग्ण ‘15’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66096(49963+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 सक्रिय रुग्ण आहेत,   अशी माहिती    जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.   ०००००

एकलव्य रेसिडेशियल पब्लीक स्कुलमध्ये प्रवेशाकरिता अर्ज आमंत्रित

इमेज
अकोला , दि. 29( जिमाका)-   आदिवासी विकास विभागांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या सर्व एकलव्य मॉडेल रेसीडेशियल स्कुलमध्ये प्रवेशासाठी दि. 26 फेब्रुवारी, 2023 रोजी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने सन 2022-23 या शैक्षणिक वर्षा मध्ये इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याकरीता दि. 10 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे   प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे   यांनी केले आहे. इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेशियल पब्लीक स्कुलमध्ये प्रवेशासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यक्षेत्रातील जिल्हातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालीका व महानगरपालीकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पाचवी ते आठवी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी स्पर्धा परिक्षेसाठी पात्र राहतील. सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी प्रवेश परिक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांकडून भरुन प्रकल्प अधिकारी,

राज्य वाङमय पुरस्कार योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

इमेज
           अकोला , दि. 29( जिमाका)- स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रका‍शित झालेल्या पुस्तकासाठी दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील इच्छुक लेखक व प्रकाशकांनी स्पर्धेकरीता प्रवेशिका मागविण्यात आले आहे. विहित कालावधीनंतर प्राप्त प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.   0000000

पदवीधर मतदारसंघ नोंदणी कार्यक्रम; अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध

अकोला , दि. 29( जिमाका)-     निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 नोव्हेंबर 2022 च्या अर्हता दिनांक आधारित अमरावती विभाग पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आले होते.  विभागीय आयुक्त अमरावती यांचेकडून अंतिम मतदार याद्या पदनिर्देशीत ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्र.   जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिली आहे. 000000

कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’ पॉझिटिव्ह

अकोला दि.28(जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 73 अहवाल प्राप्त झाले.   त्यात कोणाचाही अहवाल   पॉझिटीव्ह आला नाही,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0)0 +रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 0. आरटीपीसीआर ‘निरंक’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. सक्रिय रुग्ण ‘15’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66096(49963+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 सक्रिय रुग्ण आहेत,   अशी माहिती    जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.   ०००००

लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; थेट कर्ज योजनाकरीता अर्ज आमंत्रित

इमेज
अकोला , दि. 28( जिमाका)-     साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या.) अंतर्गत सन 2022-23 या आर्थीक वर्षाकरीता थेट कर्ज योजनातंर्गत प्रस्ताव मागविण्यात आले आहे. पात्र व इच्छुक अर्जदारांनी कर्ज प्रस्तावाकरीता दि. 24 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे(मर्या.) जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. थेट कर्ज योजनाकरीता आवश्यक कागदपत्रे       अर्जदाराचे सिबील केंडीट स्कोअर 500 असावा, जातीचा दाखला, आधार कार्ड, शैक्षणिक दाखला, रेशनकार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, अनुदान किवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषना पत्र, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा(नमुना नं.8 लाईट बिल व टॅक्स पावती), ग्रामपंचायत, नगरपालीका, महानगरपालीका यांचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा शॉप ॲक्ट परवाना, व्यवसाय संबधीत तांत्रिक प्रमाणपत्र, व्यवसाय दरपत्रक, तीन पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल इ. आवश्यक राहिल. थेट कर्ज योजनातंर्गत जिल्ह्याकरीता 30 चे उदिष्ट

जिल्हास्तर युवा महोत्सव; लोकगीत व लोकनृत्य स्पर्धेसाठी अर्ज मागविले

अकोला , दि. 27 ( जिमाका)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे,   जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अकोला याच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या कलांचा समावेश करण्यात असून पात्र व इच्छुक मंडळ किंवा स्पर्धाकांनी सहभागी होण्यासाठी दि. 29 डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.   जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन शनिवार दि. 31 डिसेंबर रोजी भारत स्काऊट आणि गाईड कार्यालय येथील हॉलमध्ये करण्यात आले आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या दोन कलांचा समावेश राहणार असून लोकगीतासाठी साथसंगत देण्याऱ्यायासह जास्तीत जास्त दहा स्पर्धक व लोकनृत्य या स्पर्धामध्ये वीस स्पर्धक सहभागी होवू शकतात. स्पर्धत सहभागी होणारे स्पर्धक व साथसंगत देणाऱ्यांचे वयवर्ष 15 ते 29 वयोगटातील असावे. लोकनूत्य सादर करणाऱ्या   संघाने पुर्वाध्वनीमुद्रित टेप अथवा रेकॉडिगला परवानगी दिली जाणार नाही. तसेच लोकगीत सादर करणाऱ्या संघाचे गीत व लोकनृत्य चित्रपट बा

कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘चार’ पॉझिटिव्ह;

अकोला दि.27(जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 79 अहवाल प्राप्त झाले.   त्यात चार जणांचा अहवाल   पॉझिटीव्ह आला,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 4 व खाजगी 0)4+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 4. आरटीपीसीआर ‘चार’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक पुरुष व तीन महिलांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर व अकोला महानगर क्षेत्रातील प्रत्येकी दोन प्रमाणे रहिवाशी आहे,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. सक्रिय रुग्ण ‘15’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66096(49963+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 सक्रिय रुग्ण आहेत,   अशी माहिती    जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.   ०००००

बालगृहात ‘वीर बाल दिवस’ साजरा

इमेज
अकोला , दि. 27 ( जिमाका)- गुरु गोविंदसिंह यांचे लहान सुपूत्र साहीब जादे जोरावर सिंहजी, साहिबजादे फतेहसिंहजी यांच्या शहादत दिवसानिमित्त सोमवार दि. 26 रोजी शासकीय बालगृहात ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्यात आला. गुरु गोविंदसिंह यांचे लहान सुपूत्र साहीब जादे जोरावर सिंहजी, साहिबजादे फतेहसिंहजी यांच्या शहादत दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणुन दि. २६ डिसेंबर हा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस वीर बालदिवस म्हणुन साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीष पुसदकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालगृहे शासकीय निरीक्षणगृह व बालगृह, गायत्री बालिकाश्रम सुर्योदय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह या बालगृहांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बालकांना वीर बालदिवस साजरा करण्यामागचे पाश्वभूमी सांगून गुरु गोविंद सिंह व त्यांचे चार साहीब जादे यांच्या बलिदानाविषयी माहिती दिली. तसेच लहान सुपूत्र साहीब जादे जोरावर सिंह, साहिबजादे फतेहसिजी यांच्या बलिदानाविषयी गौरवकथा सांगण्यात आली. तसेच मुलामुलींन

डॉ. पंजाबरावे देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

इमेज
अकोला , दि. 27 ( जिमाका)- डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार , उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, अधीक्षक मिरा पागोरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ०००००

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण आवश्यक - मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार

इमेज
अकोला , दि. 27( जिमाका)-     कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे स्वयंशिस्तीने पालन करीत लसीकरण करा , असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी केले आहे.                जिल्हाधिकारी यांच्या दालनात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.डी. अष्टपुत्रे, डॉ. एन.ए. अंभोरे आदि उपस्थित होते.              चीनमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. सोबतच लसीकरणाचे तिन्ही डोस घेणे आवश्यक आहे. प्रिकॉशन डोसचे प्रमाण अत्यल्प असून लसीकरण वाढवणे आवश्यक आहे. विशेषतः   60   वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण प्राधान्याने करावे. लसीकरण हाच कोरोनापा

कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’ पॉझिटिव्ह;

अकोला दि.26(जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 18 अहवाल प्राप्त झाले.   त्यात कोणाचाही अहवाल   पॉझिटीव्ह आला नाही,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0)0+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 0. आरटीपीसीआर ‘निरंक’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. सक्रिय रुग्ण ‘11’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66092(49959+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 11 सक्रिय रुग्ण आहेत,   अशी माहिती    जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.   ०००००