२९०३ अहवाल प्राप्त, ५०३ पॉझिटीव्ह, ५४६ डिस्चार्ज,१८ मृत्यू

            अकोला,दि.२०(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २९०३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २३९८  अहवाल निगेटीव्ह तर ५०३  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान ५४६  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर १८ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.१९) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १६७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ५२३१९(३९५५३+१२५८९+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ५०३ + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १६७= एकूण पॉझिटीव्ह- ६७०.

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २४८५७८ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे २४५५७९ फेरतपासणीचे ३९० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २६०९ नमुने होते. आजपर्यंत एकूण २४८४८९ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २०८९३६ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

५०३ पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात ५०३ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १९५ महिला व ३०८ पुरुषांचा समावेश आहे.

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-९१, अकोट-१२६, बाळापूर-३१, तेल्हारा-६०, बार्शी टाकळी-३५, पातूर-११, अकोला-१४९. (अकोला ग्रामीण-३६, अकोला मनपा क्षेत्र-११३). दरम्यान काल (दि. १९) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात १६७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

५४६ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११, आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील चार, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, ठाकूर हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, गोयंका हॉस्पीटल येथील सहा, धोटे हॉस्पीटल येथील दोन, समापन हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील सहा, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील सहा, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, फातिमा हॉस्पीटल येथील तीन, के.एस. पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील चार, केअर हॉस्पीटल येथील तीन, संमित्र हॉस्पीटल येथील एक, भोयसर हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ४५६ असे एकूण ५४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला., अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

१८ जणांचा मृत्यू

दरम्यान आज दिवसभरात १८ जणांचा मृत्यू झाला. त्यात खाजगी रुग्णालयातील सहा जणांचा समावेश आहे. त्यात-

कडोशी ता. बाळापूर येथील ५२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१८ रोजी दाखल केले होते.

 कोठली खु. बार्शीटाकळी येथील  ६७ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.५ रोजी दाखल केले होते.

 राजपुत पुरा येथील ५७ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल केले होते.

काळेगाव ता. अकोला येथील ७६  वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१७ रोजी दाखल केले होते.

अकोट येथील ६६ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१५रोजी दाखल केले होते.

जुने शहर भागातील ६५वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि.१९ रोजी दाखल केले होते.

खदान येथील ३० वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१३ रोजी दाखल केले होते.

पातुर येथील  ६५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. रोजी दाखल केले होते.

तापडीया नगर येथील ८० वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१८ रोजी दाखल केले होते.

बार्शी टाकळी येथील ५५ वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि.१४ रोजी दाखल केले  होते.

अकोट येथील  ५५ वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल केले होते.

तारफैल येथील  ७२ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१२ रोजी दाखल केले होते.

खालील रुग्णांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.

खिरपूर ता. बाळापूर येथील ६९ वर्षीय पुरुष रुग्ण असून  या रुग्णास दि.१७ रोजी दाखल केले होते.

उमरी येथील ७६ वर्षीय महिला रुग्ण असून  या रुग्णास दि.१५ रोजी दाखल केले होते.

पातुर येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.११ रोजी दाखल केले होते. 

अकोट स्टॅण्ड  अकोला येथील ५५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१६ रोजी दाखल केले होते.

गोविंद नगर, अकोला येथील ६७ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१७ रोजी दाखल केले होते.

राऊतवाडी, अकोला येथील ७३  वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१७ रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

६६५२ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ५२३१९(३९५५३+१२५८९+१७७) आहे. त्यात ९७६ मृत झाले आहेत. तर ४४६९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ६६५२ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ