2345 अहवाल प्राप्त, 379 पॉझिटीव्ह, 550 डिस्चार्ज, 22 मृत्यू

 


           अकोला,दि.8(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2345 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1966  अहवाल निगेटीव्ह तर 379  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान  550   जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 22 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.7) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 144 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 45038(34486+10375+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 379+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 144= एकूण पॉझिटीव्ह- 523.

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 223577 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 220649 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2541 नमुने होते. आजपर्यंत एकूण 223507 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 189021  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

379 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात 379 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 133 महिला व 246 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-33, अकोट-37, बाळापूर-34, तेल्हारा-14, बार्शी टाकळी-17, पातूर-34, अकोला-210. (अकोला ग्रामीण-88, अकोला मनपा क्षेत्र-122), अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

550 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 58, युनिक हॉस्पीटल येथील सात, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, देवसारे हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील एक, इनफिनीटी हॉस्पीटल येथील एक, जिल्हा स्त्री रुगणालय चार, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील चार, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, नवजीवन हॉस्पीटल येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, फतेमा हॉस्पीटल येथील एक, पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील चार, काले हॉस्पीटल येथील दोन, सोनोने हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 440 असे एकूण 550 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

22 जणांचा मृत्यू

आज दिवसभरात 22 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात कौलखेड येथील 66 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 24 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य खडकी येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 30 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, दगडपारवा ता.बार्शीटाकळी येथील 61 वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. 2 मे रोजी दाखल करण्यात आले होते,  अकोट येथील 66 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 4 रोजी दाखल करण्यात आले होते, तर अपोती बु. येथील 30 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, डाबकी रोड येथील 81 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल करण्यात आले होते. खदान येथील 72 वर्षीय पुरुष  असून या रुग्णास दि. 4 रोजी दाखल करण्यात आले होते. कैलास टेकडी येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 29 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. रणपिसे नगर येथील 82 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 28 रोजी दाखल करण्यात आले होते, तर चोहट्टा बाजार ता.अकोट येथील 65 वर्षीय महिला रुग्णास दि. 4 रोजी दाखल करण्यात आले होते, गाडगे नगर येथील 42 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 3 रोजी दाखल करण्यात आले होते.कान्हेरी येथील 50 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 27 रोजी दाखल करण्यात आले होते. लहान उमरी येथील 77 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल करण्यात आले होते. मोठी उमरी येथील 59 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 20 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, रेणूका नगर येथील 78 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 1 रोजी दाखल करण्यात आले होते, लहरिया नगर येथील 47 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 30 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, पारस ता. बाळापूर येथील 63 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 24 रोजी दाखल करण्यात आले होते, तसेच माता नगर येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 7 रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते, गुलजारपुरा येथील 42 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. मलकापूर येथील 60 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. तर दोन जणांचे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात जिल्हा परिषद कॉलनी येथील 72 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल करण्यात आले होते, कोतवाल सिटीजवळ येथील 69 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 4 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

6353 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 45038(34486+10375+177) आहे. त्यात 787 मृत झाले आहेत. तर 37898 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6353 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :