1622 अहवाल प्राप्त, 309 पॉझिटीव्ह, 575 डिस्चार्ज, 18 मृत्यू
अकोला,दि.10(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे 1622 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1313 अहवाल निगेटीव्ह तर 309 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. दरम्यान 575 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 18
जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत
कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 167 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 46276(35345+10754+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे
एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 309+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 167= एकूण पॉझिटीव्ह- 476.
शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 227538 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 224593
फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2558 नमुने होते. आजपर्यंत एकूण 227423 अहवाल प्राप्त
झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 192078 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे.
309 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 309 अहवाल
पॉझिटीव्ह आले. त्यात 118 महिला व 191
पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-32, अकोट-19, बाळापूर-नऊ, तेल्हारा-30,
बार्शी टाकळी-आठ, पातूर-आठ, अकोला-203. (अकोला ग्रामीण-99, अकोला मनपा क्षेत्र-104)
दरम्यान काल (दि. 9)
रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 167 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण
संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
575 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 32, आरकेटी आर्युवेदिक
महाविद्यालय येथील तीन, देवसार हॉस्पीटल येथील तीन, समाज कल्याण वसतीगृह येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट
येथील 18, केअर हॉस्पीटल येथील सहा, आयकॉन
हॉस्पीटल येथील 10, लोहना हॉस्पीटल येथील एक, जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथील तीन, सोनोने हॉस्पीटल
येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील दोन, अकोला
ॲक्सीडेंट येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, बबन हॉस्पीटल येथील पाच, यकीन हॉस्पीटल येथील 15,
जिल्हा स्त्री रुग्णालय येथील चार, ओझोन
हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, नवजीवन हॉस्पीटल येथील
चार, सहारा हॉस्पीटल येथील तीन, देशमुख
हॉस्पीटल येथील एक, फातिमा
हॉस्पीटल येथील एक, अर्थव
हॉस्पीटल येथील चार, काळे हॉस्पीटल येथील दोन,
अवघाते हॉस्पीटल येथील दोन, आधार हॉस्पीटल
येथील एक तर होम आयसोलेशन मधील 435 असे एकूण 575 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
18 जणांचा मृत्यू
आज दिवसभरात 18
जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात कौलखेड येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 28 एप्रिल रोजी
दाखल करण्यात आले होते. तर अन्य दहिहांडा येथील 65 वर्षीय
महिला असून या रुग्णास दि. 5 मे रोजी दाखल करण्यात आले होते,
मोठी उमरी येथील 73 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 8 रोजी
दाखल करण्यात आले होते, दहिहांडा येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.
7 मे रोजी दाखल करण्यात आले होते, तर
अंबोदा ता.अकोट येथील 74 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, मुंडगाव ता.अकोट येथील 46
वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 रोजी दाखल
करण्यात आले होते. वर्धमान नगर येथील 55 वर्षीय महिला असून
या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते. नंदखेड ता.
अकोट येथील 74 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. आश्रय नगर येथील 96 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 2 रोजी दाखल
करण्यात आले होते, अकोट येथील 49 वर्षीय
पुरुष रुग्णास दि. 7 रोजी
दाखल करण्यात आले होते, शरद नगर येथील 49 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल
करण्यात आले होते, कापसी ता. पातूर येथील 74 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल
करण्यात आले होते, अजनी ता.बार्शीटाकळी येथील 36 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 30 एप्रिल रोजी
दाखल करण्यात आले होते, अकोट फैल येथील 50 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल
करण्यात आले होते, बापूनगर अकोट फैल येथील 38 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल
करण्यात आले होते, हरिहर पेठ येथील 80 वर्षीय
पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते,
तापडीया नगर येथील 46 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 5 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच एकाचा खाजगी
रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण बाळापूर येथील 41 वर्षीय
पुरुष असून या रुग्णास दि. 27 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले
होते, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
6447 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात
एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 46276(35345+10754+177) आहे. त्यात 817 मृत झाले आहेत. तर 39012 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6447 जणांवर उपचार
सुरु आहेत, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा