1594 अहवाल प्राप्त, 145 पॉझिटीव्ह, 478 डिस्चार्ज, आठ मृत्यू
अकोला,दि.29(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे 1594 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1449 अहवाल
निगेटीव्ह तर 145 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. दरम्यान 478
जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर आठ
जणांचा उपचारा दरम्यान
मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.28) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 75 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 55282(41545+13560+177) झाली आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी
दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 145 + रॅपिड
ॲन्टीजेन चाचणी 75= एकूण पॉझिटीव्ह- 220.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 265174 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 262126 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2658
नमुने होते. आजपर्यंत एकूण 265097 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह
अहवालांची संख्या 223552 आहे, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
145
पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 145 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्यात 65 महिला व 80 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-18, अकोट-17, बाळापूर-12, बार्शीटाकळी- सहा, पातूर-13, तेल्हारा-16
अकोला-63. (अकोला ग्रामीण-18, अकोला
मनपा क्षेत्र-45), दरम्यान काल (दि.28) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन
चाचण्यांच्या अहवालात 75 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व
ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
478 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 17, युनिक
हॉस्पीटल येथील एक, अकोला
ॲक्सीडेंट येथील एक, सुर्यचंद्र
हॉस्पीटल येथील दोन, यकीन
हॉस्पीटल येथील एक, थोटे
हॉस्पीटल येथील दोन, समर्पण
हॉस्पीटल येथील एक,
आयकॉन हॉस्पीटल येथील चार, ओझोन
हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल
रिजेन्सी येथील सहा, बिहाडे
हॉस्पीटल येथील एक, आधार
हॉस्पीटल येथील एक, इंदिरा
हॉस्पीटल येथील एक, देशमुख
हॉस्पीटल येथील दोन, अर्थव
हॉस्पीटल येथील चार, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, सोनोने हॉस्पीटल येथील एक, काळे
हॉस्पीटल येथील दोन,
लोटस हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 425
असे एकूण 478 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला,अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
आठ जणांचा
मृत्यू
आज दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात,
पिंजर ता.बार्शीटाकळी येथील 6
महिन्याची बालिका असून या बालीकेस दि. 27 रोजी दाखल केले.
देवर्डा ता. अकोट येथील 75
वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 25
रोजी दाखल केले होते.
पातुर येथील 55
वर्षीय महिला असून या महिलेस दि. 23 रोजी दाखल केले होते.
अकोलखेड ता. अकोट येथील 70
वर्षीय महिला असून या महिलेस दि. 223
रोजी दाखल केले होते.
कार्ला ता. पातुर येथील 62
वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 27
रोजी दाखल केले होते.
सकनी ता. बार्शीटाकली येथील 65 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 21 रोजी दाखल केले होते.
वाई ता. मूर्तिजापूर येथील 61
वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. 28 रोजी दाखल केले होते.
सांगवी ता.तेल्हारा येथील 62 वर्षीय
महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 25 रोजी
दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
4861 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 55282(41545+13560+177)
आहे. त्यात 1064
मृत झाले आहेत. तर 49357 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 4861 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा