पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध पोलीसांत तक्रार

  आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध पोलीसांत तक्रार अकोला, दि. 27 : जिल्हाधिकारी कार्यालयापासून  100 मीटरच्या आत प्रचाराचा मजकूर असलेली वाहने उभी केल्याबद्दल दोघांविरूद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातील भरारी पथक क्र. 5 चे प्रमुख नीलेश बायस्कर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 100 मीटरच्या आत 2 मिनी ट्रक वाहने (क्र. एमएच 24 जे 9619 व क्र. एमएच25 पी 4373) लावण्यात आल्याचे पथकाला आढळले. वाहनाच्या दोन्ही बाजूंवर फ्लेक्सवर विकसित भारत मोदींची गॅरंटी व कमळ  पक्षचिन्ह आदी प्रचार मजकूर आढळून आला. पथकाच्या सदस्यांनी तत्काळ नोंद घेतली. पथकाने चालकांना विचारणा केल्यावर वाहनावरील फ्लेक्स काढून दोन्ही वाहनचालक वाहने घेऊन परिसरातून निघून गेले. अंबादास नरवाडे (पार्डी, ता. जि. हिंगोली) व निवृत्ती जाधव (किरोडा, ता. लोहा, जि. नांदेड) अशी चालकांची नावे आहेत.   या वाहनांना परवानगी प्राप्त नसल्याचे  व प्रचार मजकूर असलेले वाहन निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयाच्या परिसरात आणल्याने आचारसंहितेच

लोकसभा निवडणुकीसाठी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल

  लोकसभा निवडणुकीसाठी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल अकोला, दि. ३०  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ०६- अकोला लोकसभा मतदार संघासाठी आज दोन नामनिर्देशन पत्रे दाखल  झाली.    प्राप्त नामनिर्देशन पत्रे पुढीलप्रमाणे : प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), मुरलीधर लालसिंग पवार (अपक्ष). दरम्यान, आज २४ व्यक्तींनी ५१ अर्जांची उचल केली. त्यानुसार अद्यापपर्यंत जिल्ह्यात ८९ अर्जांची उचल झाली आहे.   नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी ४ एप्रिलपर्यंत असून, दि. ३१ मार्च या सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.  ०००

विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थीने एक संसार सावरला

  विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थीने एक संसार सावरला अकोला, दि. ३० : विभक्तीच्या उंबरठ्यावर असलेला एका दांपत्याचा संसार विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थीने सावरला. हकीकत अशी की, मुर्तिजापुर येथील एक विवाहिता विवाहानंतर बाळापूर येथील एका गावी सासरी नांदण्यास गेली होती. काही वर्षे पति-पत्नि यांचा संसार सुरळीत सुरु होता. त्यांना दोन अपत्ये ही झाली होती. परंतु मागील काही महिन्यापासून पति पत्निमधील संबंध विकोपास गेले होते. पत्नी अनेक महिन्यापासून माहेरी राहत होती. अनेक प्रयत्न करुनही पति-पत्निमध्ये तडजोड होत नव्हती. सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोहर बेलोकार यांनी सदरचे प्रकरणात मध्यस्थी करीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला येथे दाखल केले. पति-पत्नि व त्यांचे कुटुंबिय यांचेत अनेक बैठका घेण्यात आल्या. परंतु एकत्र राहायचेच नाही असेच दोघांनीही ठरविले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे या प्रकरणात मध्यस्थी करण्यात आली. पति-पत्नि यांचेत वाद असले तरी दोघेही त्यांचे मुलांवर खुप प्रेम करत होते. दोघांनाही मुलांच्या भविष्याची काळजी होती. हिच बाब लक्षात घेवून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने दुरावलेल्

कलेक्टर ऑफिसपासून मंगळवारी भव्य बाईक रॅली

इमेज
 ‘स्वीप’अंतर्गत ‘रॅली फॉर डेमोक्रसी’ कलेक्टर ऑफिसपासून मंगळवारी भव्य बाईक रॅली ‘स्वीप’अंतर्गत ‘रॅली फॉर डेमोक्रसी’ हा मोटरसायकल रॅलीचा उपक्रम मंगळवारी, दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वा. आयोजित करण्यात आला आहे. त्याची सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून होईल. पुढे ही रॅली अशोक वाटिका, नेहरू पार्क, सिव्हिल लाईन चौक, रतनलाल प्लॉट चौक, जिल्हा क्रीडा संकुल चौक, अकोट स्थानक- माणेक टॉकीज,सिटी कोतवाली, गांधी रोड, पंचायत समिती, पोलीस लॉन अशी जाऊन पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन समारोप होईल. शहरातील सर्व व्यवस्थापनांच्या व माध्यमांच्या शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, तसेच सर्वच शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी मॅडम यांनी केले आहे. ०००

अकोला पश्चिम मतदारसंघात बाईक रॅलीद्वारे मतदार जनजागृती

इमेज
अकोला पश्चिम मतदारसंघात बाईक रॅलीद्वारे मतदार जनजागृती अकोला, दि. 31 : अकोला पश्चिम मतदारसंघात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातर्फे आज बाईक रॅली काढून मतदार जनजागृती करण्यात आली. अकोलेकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘स्वीप’अंतर्गत उपक्रमांना गती देण्यात आली आहे. त्याअंतर्गत विविध माध्यमांतील प्रसिद्धीबरोबरच नागरिकांशी संवाद, रॅली आदी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार आज पंचायत समितीपासून शहरात रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय चौक, अशोकवाटिका चौक, बसस्थानक, जिल्हा क्रीडा संकुल चौक, रेल्वेस्थानक चौक, रामदासपेठ पोलीस ठाणे अशा विविध चौकांतून रॅली पुढे जात सावित्रीबाई फुले कन्या शाळा येथे समारोप झाला.    ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत, समन्वय अधिकारी गजानन महल्ले यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येकाने आपला मताधिकार बजावला पाहिजे. या नि

खर्च निरीक्षकांकडून निवडणूक यंत्रणेचा आढावा

इमेज
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक खर्च निरीक्षक बी. ज्योतिकिरण (भा. रा. से.) जिल्ह्यात दाखल खर्च निरीक्षकांकडून निवडणूक यंत्रणेचा आढावा अकोला, दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अकोला मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी श्रीमती बी. ज्योतिकिरण यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली असून, त्या गुरूवारी जिल्ह्यात दाखल झाल्या. त्यांनी आज सकाळी नियोजनभवन येथे बैठक घेऊन निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, 'स्वीप'च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्यासह सर्व सहायक निवडणूक अधिकारी, तसेच नोडल अधिकारी उपस्थित होते. निवडणूक खर्च निरीक्षकांनी सर्व सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिका-यांकडून निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. निवडणूक काळात प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या, मद्य, वस्तू, पैसे यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सजग राहून अशा बाबींना तत्काळ निर्बंध घालावा व संबंधितांवर

वार्षिक मूल्य दर बदलण्यापूर्वी दस्त नोंदणी करून घ्यावी - मुद्रांक जिल्हाधिकारी

  वार्षिक मूल्य दर बदलण्यापूर्वी दस्त नोंदणी करून घ्यावी -         मुद्रांक जिल्हाधिकारी अकोला, दि. 28 : राज्यात दरवर्षी एक एप्रिलपासून वार्षिक मूल्य दर तक्त्यात बदल अपेक्षित असतो. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी चालू मूल्य दरानुसार 31 मार्चपूर्वी दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. शासकीय सुट्टीच्या दिवशीही नोंदणी कार्यालये सुरू आहेत, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी विजय तेलंग यांनी केले.

नझूल कर न भरणा-या मिळकतधारकांवर कारवाई करणार - भूमी अभिलेख उपअधिक्षक

  नझूल कर न भरणा-या मिळकतधारकांवर कारवाई करणार -         भूमी अभिलेख उपअधिक्षक अकोला, दि. 28 : नझूल कर न भरणा-या मिळकतधारकांवर कारवाई करण्याचा इशारा भूमी अभिलेख उपअधिक्षकांनी दिला आहे. नगर भूमापन योजना लागू असलेल्या वर्ग-2 च्या जमीनीवरील नझूल कर भूमी अभिलेख कार्यालयाकडून वसूल केला जातो. यातील सर्व मिळकतपत्रिका ऑनलाईन झाल्या आहेत. तथापि, अनेक मिळकतधारक कर भरत नाहीत. त्यामुळे मार्चअखेर लक्षात घेता तत्काळ भरणा करावा अन्यथा मिळकतीवर बोजा नोंद मिळकती सरकारजमा करण्याचा प्रस्ताव दिला जाईल, असा इशारा उपअधिक्षकांनी दिला आहे. ०००

‘आरटीओ’ कार्यालय सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहणार

  ‘आरटीओ’ कार्यालय सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहणार अकोला, दि. 28 : मार्चअखेर नव्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची शक्यता व महसूली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय दि. 29 ते 31 मार्च या सार्वजनिक सुट्ट्यांच्या  कालावधीत सुरू राहील. शुक्रवार ते रविवार या तिन्ही दिवशी नवीन वाहन नोंदणी,  करवसुलीची प्रक्रिया, इतर परिवहनविषयक कामकाज, थकित करवसुली खटला विभाग आदी कामे सुरू राहतील. त्यामुळे नवीन वाहन खरेदीदारांना या काळात वाहन नोंदणी करून घेता येणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे. ०००   

बेकायदेशीर बालगृहांची माहिती द्यावी महिला व बालविकास अधिका-यांचे आवाहन

बेकायदेशीर बालगृहांची माहिती द्यावी महिला व बालविकास अधिका-यांचे आवाहन   अकोला, दि. 28 : बेकायदेशीररीत्या बालगृहे, अनाथाश्रम चालवणे हा गंभीर अपराध असून, असे् घडत असल्याची माहिती असल्यास ती तत्काळ कळवावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.   राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बालगृहे, अनाथाश्रम चालविणे, बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवणे, त्यांचे शारिरीक, मानसिक शोषण होत असल्याच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेकवेळा अनधिकृत संस्था सामाजिक माध्यमांचा वापर करून त्यावर काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांची छायाचित्रे प्रसिध्द करतात. हे बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमाच्या कलम 74 चे उल्लंघन आहे. बेकायदेशीर संस्था सामाजिक माध्यमांवर अशी छायाचित्रे प्रसारित करून त्याद्वारे नागरिकांना भावनिक आवाहन करतात व मोठ्या प्रमाणात निधी गोळा करीत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. हे कृत्य अतिशय गंभीर असुन शासनाकडे अनेक तकारी प्राप्त होत आहेत. अनधिकृत संस्थांमध्ये प्रवेशितांवर लैंगिक अत्याचार, मारहाण, पलायन, बलात्कार, अतिप्रसंग, शारिरीक, मानसी

मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

  मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अकोला, दि. 27 :   मुद्रांक अधिनियमानुसार न भरलेले मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अभय योजनेची संधी उपलब्ध आहे. तरी संबंधितांनी 31 मार्चपूर्वी शुल्क व शास्ती जमा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग – 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विजय तेलंग यांनी केले आहे. जिल्ह्यात सन 2020 पूर्वी निष्पादित दस्तऐवजांचा विशेष पथकामार्फत शोध घेण्यात आला व अपेक्षित शुल्क न भरलेल्या संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वितरित केलेली कंत्राटांची एकूण 673 प्रकरणे, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून वितरित करण्यात आलेले गाळे एकूण 158 प्रकरणे, तसेच महानगरपालिकेच्या कार्यकंत्राटाचे एकूण 137 प्रकरणांमध्ये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम 33 अन्वये अवरुध्द करण्यात येऊन सर्वांना मागणी नोटीस बजावण्यात आली आहे. अशा प्रकरणी बऱ्याच पक्षकारांनी मुद्रांक शुल्क व शास्ती शासन जमा करून अभय योजनेचा लाभ घेतलेला आहे. तरी उर्वरित पक्षकारांनी योजनेचा 31 मार्चपूर्वी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 000

टपाली मतपत्रिकेसाठी विहित नमुना वेळेत भरणे आवश्यक

इमेज
    टपाली मतपत्रिकेसाठी विहित नमुना वेळेत भरणे आवश्यक अकोला, दि. 27 : लोकसभा निवडणूकीत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करू इच्छिणा-या कार्यरत कर्मचा-यांनी विहित नमुना अधिसूचना निघाल्यानंतर पाच दिवसांत भरून देणे आवश्यक आहे, अशी सूचना निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील आदींनी यावेळी टपाली मतपत्रिकेच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही, निवडणूक आयोगाच्या विविध सूचना व निर्देश याबाबत आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयांना टपाल मतपत्रिकेचे नमुना 12 डी पुरविण्यात आले आहेत. ज्या अधिकारी व कर्मचा-यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करायचे आहे, त्यांनी हा नमुना भरून त्यांच्या कार्यालयप्रमुखांकडे द्यावा, अशी सूचना श्री. सिद्धभट्टी यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ( www.akola.gov.in ) नमुना 12 डी उपलब्ध करून दिला आहे. निवडणुकीची अधिसूचना निघाल्यावर पाच दिवसांच्या आत नमुना भरून देणे आवश्यक आहे, असे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थि

नामनिर्देशनपत्र भरताना निवडणूक आयोगाच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात - जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार

  नामनिर्देशनपत्र भरताना निवडणूक आयोगाच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात - जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 26 : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरताना इच्छूक उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी, अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केली आहे. नामनिर्देशनपत्र दि. 28 मार्च ते दि. 4 एप्रिल या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी  3 या वेळेत निवडणूक निर्णय अधिका-यांच्या दालनात स्वीकारण्यात येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार नाहीत. नामनिर्देशनपत्र https: Suvidha.eci.gov.in  या भारत निवडणूक आयोगाच्या सुविधा पोर्टलवर उमेदवार लॉगईनवर रजिस्‍ट्रेशन करून नामनिर्देशन फॉर्म ऑनलाईन पध्‍दतीने भरून त्‍याची प्रिंट करून जिल्‍हा निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे संबंधित कागदपत्रांसह सादर करावी. उमेदवार किंवा त्यांचे कमीत कमी एका प्रस्तावक किंवा सूचकाने स्वत: उपस्थित राहून नामनिर्देशनपत्र दाखल करणे आवश्यक आहे.  दोनपेक्षा जास्त लोकसभा मतदार संघात नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही.  एका लोकसभा मतदार स

निवडणूक आचारसंहिता : ‘काय करावे’ व ‘काय करू नये’

 निवडणूक आचारसंहिता : ‘काय करावे’ व ‘काय करू नये’ अकोला, दि. 27 : निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात, तसेच राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. आचारसंहिता कालावधीत उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी ‘काय करावे’ व ‘काय करु नये’ याबाबत निवडणूक आयोगाने वानगीदाखल तयार केलेली सूची पुढीलप्रमाणे आहे. काय करावे : अनुपालन करण्याविषयी मार्गदर्शक तत्वे निवडणुका घोषित होण्यापूर्वी क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरु करण्यात आलेले कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतील. ज्याविषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संबंधात, भारत निवडणूक आयोग/राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण/मान्यता प्राप्त करण्यात यावे. पूर, अवर्षण, रोगाची घातक साथ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांतील जनतेसाठी पीडा निवारण आणि पुनर्वसन कार्य सुरु करता व चालु ठेवता येऊ शकेल. मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना उचित मान्यतेने रोख रक्कम किंवा वैद्यकीय सुविधा देण्याचे समुचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल.  मैदानासारखी सार्वजनि

जिल्हाधिका-यांकडून अकोट, मूर्तिजापूर येथील तयारीचा आढावा

इमेज
    जिल्हाधिका-यांकडून अकोट, मूर्तिजापूर येथील तयारीचा आढावा अकोला, दि. 27 : आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता घेतानाच, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक कार्यवाही काटेकोरपणे पूर्ण करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले. जिल्ह्यातील अकोट व मूर्तिजापूर येथे भेट देऊन त्यांनी यंत्रणेची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिका-यांनी अकोट व मूर्तिजापूर येथील आचारसंहिता नियंत्रण कक्ष, परवाना कक्ष, ईव्हीएम स्ट्रॉँगरूम, पोस्टल मतपत्रिका कक्ष आदींची पाहणी केली. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचारी पथकांनी ‘अलर्ट मोड’वर राहून आयोगाच्या प्रत्येक सूचनेनुसार कार्यवाही करावी. आचारसंहितेचा भंग कुठेही होऊ नये, यासाठी सजग देखरेख ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. ०००

‘बाईपण भारी देवा’ एकपात्री प्रयोगाने व परिसंवादाने गाजला ग्रंथोत्सव

इमेज
  ‘बाईपण भारी देवा’ एकपात्री प्रयोगाने व परिसंवादाने गाजला ग्रंथोत्सव अकोला दि २२:   जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित ग्रंथोत्सवाचा दुसरा दिवस ‘बाईपण भारी देवा’ हा एकपात्री प्रयोग व परिसंवादाने गाजला.                        अकोला ग्रंथालय चळवळीतील ग्रंथ प्रेमींसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी ठरली. ग्रंथोत्सस्वाच्या द्वितीय दिवशी स्पर्धा परीक्षेतील आव्हाने या कार्यक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याकरिता आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नितीन शेगोकार यांनी मार्गदर्शन केले व करिअर केअर अकॅडमी तर्फे अनिल हांडे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन ज्योती सरदार यांनी केले          द्वितीय सत्रात अकोट येथील कुमारी हर्षदा इंदाने या मुलींने 'बाई पण भारी देवा 'हा बहारदार एकपात्री प्रयोग सादर करून व स्त्री पात्राची विविध रूपे सादर करून हास्य फुलविले. तृतीय सत्रात वाचन संस्कृतीमध्ये सार्वजनिक ग्रंथालयाचे योगदान व भूमिका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले .या चर्चासत्राचे अध्यक्षस्थानी रामभाऊ मुळे होते या चर्चासत्रात ग्रंथ मित्र राजेश डांगटे, भास्करराव पिलात्र

ज्येष्ठांच्या बी.सी.जी. लसीकरणाबाबत जनजागृती करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
  ज्येष्ठांच्या बी.सी.जी. लसीकरणाबाबत जनजागृती करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला दि. 20 : ज्येष्ठांच्या बी.सी.जी. लसीकरणाबाबत जनजागृती   करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात टा स्क फोर्स सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. सभे ला मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे , माता व बाल संगोप न अधिकारी डॉ. विनोद करंजीकर , जिल्हा क्षयरोग अधिकरी डॉ. मनिष शर्मा , वैद्यकारी अधिकारी डॉ. अलका बोराखडे , जिल्हा क्षयरोग केंद्र तसेच डॉ. सिमा तायडे ( FOGSI) डॉ. मोनाली कदम , डॉ. सोळंके , डॉ. सतीश घाटोळ उपस्थित होते. साठीपुढील, १८ वर्षावरील जे मधुमेहाचे रु ग्ण, बॉडी मास्क इंडेक्स १८ पेक्षा कमी असणारे (कुपोषित प्रौढ) , मागील ५ वर्षातील क्षयरोगमुक्त रुग्ण तसेच क्षयरोग रुग्णांच्या मागील तीन वर्षातील सहवासातील रु ग्ण आदी सर्व लसीसाठी पात्र आहेत. याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. आशांनी घरोघरी जा ऊ न स र्व्हे क रू न त्याबाबत जागृ ती निर्माण करावी व लोकांना लसीचे महत्त्व पट वू न द्यावे

‘सीबीएसई’ परीक्षा उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश

  ‘सीबीएसई’ परीक्षा उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश अकोला दि.20 : केंद्रीय शिक्षा बोर्डाच्या परिक्षेच्या पाच उपकेंद्रांवर शंभर मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केले. अकोला येथील स्कुल ऑफ स्कॉलर्स, नोएल स्कुल, जवाहर नवोदय विद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल व अकोट येथील विद्यांचल स्कुल येथील परिक्षा उपकेंद्रांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश 2 एप्रिल पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत लागू राहतील. त्यानुसार परिसरात 5 हून अधिक व्यक्तींना एकत्रित प्रवेश, झेरॉक्स, फॅक्स, पानपट्टी, ध्वनीक्षेपक आदी चालवणे, इंटरनेट, मोबाईल साधने सोबत बाळगणे अनधिकृत व्यक्ती किंवा   वाहन प्रवेश करणे आदी सर्व बाबींना मनाई करण्यात आली आहे. 00000

अकोला जिल्हा ग्रंथोत्सव आजपासून

  अकोला जिल्हा ग्रंथोत्सव आजपासून अकोला दि.20 : ग्रंथालय संचालनालय व जिल्‍हा ग्रंथालयातर्फे अकोला जिल्हा ग्रंथोत्सव उद्यापासुन (21 मार्च) जिल्हा ग्रंथालयात आयोजित करण्यात आला आहे. त्यात दि. 22 मार्चपर्यंत विविध कार्यक्रम होतील. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन गुरूवारी सकाळी 11 वाजता जेष्ठ साहित्यिक प्रतिमा इंगोले यांच्या उपस्थितीत होईल. दु. 2 वाजता ‘वाचन संस्कृतीवर सोशल मिडीयाचा प्रभाव’ या परिसंवादात ग्रंथमित्र एस.आर. बाहेती, डॉ. स्वाती दामोदरे, प्रा. अशोक सोनोने, मनोज देशमुख आदी सहभागी होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ‘स्पर्धा परीक्षेतील आव्हाने’ या परिसंवादात नितीन शेकोकार व अनिल हांडे मार्गदर्शन करतील. दु. 1 वाजता हर्षदा इंदाने या ‘बाईपण भारी देवा’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करतील. दु. 3 वाजता वाचन संस्कृतीत सार्वजनिक ग्रंथलयाचे योगदान या परिसंवादात अनुराग मिश्र, राम मुळे, राजेश डांगटे, भास्करराव पिलात्रे सहभाग घेतील. दु. 4 वाजता समारोप होईल. साहित्यप्रेमी व वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 000000

उन्हाळ्यात पशुधनाची अशी घ्या काळजी शासनाच्या मार्गदर्शक सूचना

उन्हाळ्यात पशुधनाची अशी घ्या काळजी शासनाच्या मार्गदर्शक सूचना अकोला, दि. 18 : सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.  जगदीश बुकतारे यांनी केले. उन्हाळ्याच्या दिवसांत जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना चरण्यास सोडावे. हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत. गोठ्याची उंची जास्त असावी. जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील. छपराला शक्यतो पांढरा चुना अथवा रंग लावावा. तसेच त्यावर पालापाचोळा, तुराट्या, पाचट टाकावे. ज्यामुळे सूर्याची किरणे परावर्तित होण्यास मदत होईल. परिसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत. मुक्तसंचार गोठ्याचा अवलंब करावा. गोठ्यामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी पाण्याचे फवारे, स्प्रिंकलर्स यासोबत पंख्याचा वापर करावा. दुपारच्या वेळेस गोठ्याच्या भोवती बारदाणे, शेडनेट लावावेत व शक्य असल्यास त्यांना पाण्याने भिजवावे, जेणेकरून उष्ण हवा गोठ्यात येणार नाही व आतील वातावरण थंड राहील. जनावरांना मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी

‘स्वीप’अंतर्गत नोडल अधिका-यांकडून आढावा दिव्यांगांचे 100 टक्के मतदान होण्यासाठी नियोजन - जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी.

इमेज
  ‘स्वीप’अंतर्गत नोडल अधिका-यांकडून आढावा दिव्यांगांचे 100 टक्के मतदान होण्यासाठी नियोजन -             जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी. अकोला, दि. 18 : दिव्यांग मतदानाच्या टक्केवारीत राज्यात अग्रेसर असल्याने अकोला जिल्ह्याला 2019 मध्ये पुरस्कार मिळाला होता. ही गौरवशाली परंपरा कायम राखावी व मतदानाच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी तथा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी. यांनी आज येथे केले. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग संघटना व शाळा यांची संयुक्त बैठक राजर्षी शाहू महाराज सभागृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा समाजकल्याण अधिकारी पी. डी. सुसतकर, जिल्हा समन्वय अधिकारी गजानन महल्ले आदी यावेळी उपस्थित होते.     जिल्ह्यात दिव्यागांचे 100 टक्के मतदान व्हावे यासाठी दिव्यांग संघटना व शाळाचालकांशी चर्चा करण्यात आली.   तालुका स्तरावर रथ तयार करून, तसेच पथनाट्य, व्हिडीओ आदी माध्यमातून मतदान करण्याबाबत प्रचार करण्याचा निर्णय झाला. ०००

नामनिर्देशन पत्र दाखल करताना केवळ पाच व्यक्तींना प्रवेश

  नामनिर्देशन पत्र दाखल करताना केवळ पाच व्यक्तींना प्रवेश अकोला, दि. 18 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पाचहून अधिक व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. जिल्हा दंडाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केले आहे. उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना  निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात, तसेच दालनात केवळ पाचहून अधिक व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच  वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा अधिक वाहने असू नयेत. कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्ये वाजविणे, गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.    वाहतुकीला अडथळा नको निवडणूकीचे पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊटस्, होर्डिंग्ज आदी साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा किंवा अपघात होईल असे लावण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रके लावणे, घोषणा लिहि

संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे बँकर्सना निर्देश

इमेज
  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे बँकर्सना निर्देश अकोला, दि. 18 : लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी बँकांनी   संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवून तत्काळ माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.   जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील बँकर्सची बैठक नियोजनभवनात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, आचारसंहिता कालावधीत बँकांची भूमिका महत्वाची आहे. निवडणूक काळात बँकांना रोज संशयास्पद   व्यवहार अहवाल (एसटीआर) सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. बँकांमार्फत असे व्यवहार होत आहेत किंवा कसे, एखाद्या शाखेत अचानक पैशाची मागणी वाढल्यास त्यावर नजर ठेवावी. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना व आदेशांबाबत यापूर्वीही बँकांना माहिती देण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान लोकसभा मतदारसं

निवडणूक वार्ता आचारसंहितेच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांकडून विविध आदेश जारी

  निवडणूक वार्ता आचारसंहितेच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांकडून विविध आदेश जारी अकोला, दि. 18 : आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विविध आदेश जारी केले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाने, उमेदवार किंवा प्रतिनिधीने शासकीय, निमशासकीय कार्यालय, विश्रामगृहे येथे सभा घेणे वापर करणे, तेथील आवाराचा रॅली आदींसाठी वापर करणे, अशा आवारात फलक, भित्तीपत्रके आदी बाबींना निर्बंध घालण्यात आले आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यलय, विश्रामगृहे आदी ठिकाणी मोर्चा, धरणे, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.   धार्मिक स्थळे, रूग्णालये, शैक्षणिक संस्था व मतदान केंद्राच्या 200 मीटर अंतरामध्ये तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्तेवर होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स, भिंतीवर जाहिराती आदी लावून त्या मालमत्ता विद्रुप करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यात कुठलेही जात, भाषा, धार्मिक शिबिरे व मेळाव्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही पक्षांनी   किंवा उमेदवारांनी ताफ्यामध्ये द

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांकडून आढावा मनुष्यबळाचे प्रथम सरमिसळीकरण पूर्ण

इमेज
      लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांकडून आढावा मनुष्यबळाचे प्रथम सरमिसळीकरण पूर्ण अकोला, दि. 17 : अकोला लोकसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक व अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी नोडल अधिका-यांच्या, तसेच कर्मचा-यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना प्रक्रियेची माहिती दिली.   अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता, निवडणूक खर्चाची मर्यादा, मतदान प्रक्रिया आदी विविध बाबींची माहिती जिल्हाधिका-यांनी पक्ष प्रतिनिधींना दिली. शासकीय यंत्रणेच्या जबाबदा-या व करावयाची कार्यवाही याबाबत सर्व यंत्रणा अधिका-यांना व कर्मचा-यांना सूचना देण्यात आल्या. आदर्श आचारसंहिता अंमलात आली असून, योजना- कामांचे फलक झाकण्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण व्हावी. निवडणूकीच्या अनुषंगाने सजग राहावे. अनावश्यक रजा टाळाव्यात, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. मनुष्यबळाचे प्रथम