अकोला,दि.28 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात काल (दि.27) दिवसभरात
झालेल्या 1101 चाचण्या झाल्या त्यात 75 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोट येथे 51 चाचण्या झाल्या त्यात 14 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर येथे
चार चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 62 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, मुर्तिजापूर येथे 233 चाचण्या झाल्या त्यात 21 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, तर अकोला महानगरपालिका येथे 605 चाचण्या झाल्या त्यात 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 26
चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,
हेगडेवार लॅब येथे 55 चाचण्या झाल्या त्यात 15
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर बार्शीटाकळी येथे 20, पातूर येथे 20, अकोला आयएमए येथे सहा, आरोग कर्मचाऱ्यांचे 19
चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल
पॉझिटीव्ह आला नाही, असे 1101 जणांच्या
चाचण्या होऊन त्यात 75 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 50 हजार 757 चाचण्या झाल्या पैकी 13574 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा