पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रत्येक तालुक्यात शिवभोजन थाळी केंद्र

अकोला , दि . ३१ ( जिमाका )- देशातील लॉक डाऊन स्थिती पाहता शासनाने शिवभोजन थाळी केंद्रांची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून आता प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे शिवभोजन थाळी केंद्र उद्यापासून सुरु होतील. दरम्यान आज मुर्तिजापूर व तेल्हारा येथील केंद्र कार्यान्वित ही झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे. शिवभोजन थाळी योजनेचे कार्यान्वयन प्रजासत्ताक दिनापासून झाले होते. त्यात अकोला जिल्ह्यात केवळ अकोला शहरात दोन केंद्र सुरु झाले होते. आता लॉक डाऊन कालावधीत गोरगरीब लोकांना पुरेसे जेवण स्वस्तात मिळावे म्हणून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात येत आहेत. स्वस्तधान्य वाटपात दिव्यांगांना प्राधान्य द्या आगमी तीन महिन्यासाठी स्वस्त धान्य वितरण पुरवठा विभागामार्फत होणार आहे. हे वाटप करतांना दिव्यांगांना वाटप प्राधान्याने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पुरवठा विभागाच्या यंत्रणेला दिले आहेत. २० आश्रयकेंद्रात १६४२ जणांची व्यवस्था जिल्ह्यात परप्रांतातून आलेले व येथे लॉक डाऊन मुळे थांबावे लागलेल्या १

जिल्ह्यातील सर्व मनाई आदेशांना १४ एप्रिल पर्यंत मुदत वाढ

अकोला , दि . ३१ ( जिमाका )- कोरना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  दि.२४ रोजी मनाई आदेश जारी करुन संचारबंदी लागू केली होती. त्याशिवाय प्रतिबंधात्मकउपाययोजना म्हणूनही विविध घटकांना बंदी जाहीर केली होती. त्या सर्व मनाई आदेशांना १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज निर्गमित केले. त्यानुसार, जिल्ह्यात १४ एप्रिलपर्यंत कलम १४४ लागू करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. या आदेशाचा भंग झाल्यास भारतीय दंड संहिता १९६० चे ४५ कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भाजीपाला, किराणा घरपोच सेवा देण्यासाठी संस्था नियुक्त

अकोला , दि . ३१ ( जिमाका )- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांचा भाग म्हणून  नागरिकांना किराणा, भाजीपाला, फळे धान्य, जेवणाचे डबे घरपोच देण्यासाठी  विभागनिहाय संस्थांची नियुक्ती करण्यात  आली आहे. ती याप्रमाणे- अकोला शहरात गोरक्षण रोड परिसरात आदर्श कॉलनी, सहकार नगर,   निवारा कॉलनी,   कीर्ती नगर येथे रमेश बोचरे (९६०४५९७८४२). जवाहर नगर, गोकुळ कॉलनीसाठी   संजय वानखडे (९८५००७६२३२). सिंधी कॅम्प, कौलखेड चौक ते मलकापूर परिसर व तुकाराम चौक परिसर येथे   अनिताताई देशमुख (९८८११९०८७७). शिवनी , शिवर प्रभाग क्रमांक १८ मध्ये सुरज आठवले (९९२३०३५३७७) मलकापूर, खडकी, केशवनगर येथे शिवदास गौड (८०८०२१५७३०) तार फैल, विजय नगर, नायगाव येथे   बनवारी चंडाले (९४०३४७७०५६) मोरेश्वर कॉलनी, सुधीर कॉलनी, खेडकर नगर, राम नगर येथे विनोद गिरी (७०३८७८१४७७) कानाशिवणी, कान्हेरी, शिवापूर येथे प्रवीण वाहुरवाघ (९०१११८५०८९) डाबकीरोड, जुने शहर येथे अनिताताई देशमुख (९८८११९०८७७) अकोला ग्रामीण बोरगाव मंजूसाठी   जगन्नाथ वरघट (७६२०२०१७१९) बार्शी टाकळी साठी   प्रदीप दंदी (९५४५०१९८७३) हिवरखेड

मोकळ्या जागांवर भाजीपाला लागवड, परसबाग विकसित करा- पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन

अकोला , दि . ३१ ( जिमाका )- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी   लागू झालेल्या लॉक डाऊनची स्थिती पाहता भाजीपाला टंचाई भासू नये म्हणून विविध शासकीय, सार्वजनिक जागांवर उपलब्ध पाण्याचा वापर करुन भाजीपाला लागवड करावी तसेच  तसेच जिल्हाप्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजना लक्षात घेता घराबाहेर पडणे टाळण्यासाठी नागरिकांनी शक्यतो आपल्या घरीच ( बागेत, छतावर, गॅलरीत इ.) परसबाग तयार करुन त्यात भाजीपाला पिकवावा,असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.  सद्यस्थितीत जिल्हा प्रशासन , कृषि विभाग , महसूल विभाग , परिवहन विभाग , सहकार विभाग , पणन विभाग , नगरविकास विभाग , ग्रामविकास विभाग इ. विभागाच्या जिल्हा यंत्रणामार्फत गावपातळी नगर परिषद , नगर पंचायत , नगर पालिका महानगर पालिका कार्यक्षेत्रामध्ये आत्मा योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत नागरीकांना फळे , भाजीपाला दूध , रेशन , इ. ऑनलाईन ऑर्डर घेऊन वाजवी दरात घरपोच सेवा देण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाजीपाला , फळे ई. चे उत्पादन व पूरवठ्यामध्ये भव

पिक कर्जांसंदर्भात मार्गदर्शक सुचना जारी

अकोला , दि . ३१ ( जिमाका )- रिझर्व बँकेने कोरोना (कोबीड-१९) व्हायरस संसर्गाच्या अनुषंगाने अल्प , मध्यम , व दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाच्या दि. एक मार्च ते ३१ मे या कालावधी मधील कर्जाचे परतफेडीसंबंधी करावयाच्या उपाय योजना बाबत मार्गदर्शक सुचना कळविल्या आहेत.तसेच देशात संपूर्ण लॉकडाऊन , संचारबंदी आणि कलम १४४ लागु करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिक कर्ज मुदतीत भरणा करण्यास होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या सुचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, अल्प मुदती पिक कर्जे ही   बँकेने संमत केलेल्या प्रचलित धोरणानुसार सन २०१९-२० खरीप पिकासाठी असलेली कर्ज परतफेडीची अंतीम मुदत दि.३१ मार्च ऐवजी दि.३० जून करण्यात आली आहे.   हा बदल फक्त सन २०१९-२०२० या हंगामाकरीता लागु असेल. तसेच जे शेतकरी खरीप पिकासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड माहे मार्च २०२० अखेर करतील अशा सभासदांना   तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर केंद्र , राज्य व बँके मार्फत व्याज सवलत योजनेचा लाभ मिळेल. त्याचप्रमाणे जे शेतकरी खरीप पिकासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड माहे जुन २०२० अखेर करतील अशा सभासदांना तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ब

मालमत्ता नोंदणी खरेदी बंदच्या आदेशास १४ पर्यंत मुदतवाढ

अकोला , दि . ३१ ( जिमाका )- जिल्ह्यातील मालमत्तांच्या खरेदी विक्री व नोंदणी व्यवहार  बंद ठेवण्याच्या आदेशास येत्या १४ एप्रिल पर्यंत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मुदतवाढ दिली आहे. या संदर्भात दि.२३ रोजी  जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २, ३ व ४   अन्वये  जिल्ह्यातील सह जिल्हा निबंधक कार्यालयात होणारे मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार व नोंदणी ही ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर हे आदेश देण्यात आले होते. मालमत्ता खरेदी विक्री नोंदणीचे व्यवहार हे बायोमेट्रीक पद्धतीने होत असल्याने व मालमत्ता खरेदी विक्रीसाठी बाहेरगावाहून लोकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी हे आदेश जारी करण्यात होते.  देशात १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन असल्याने या आदेशास मुदतवाढ देण्यात आली आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

४२ पैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह; अकरा प्रलंबित

अकोला , दि . ३१ ( जिमाका )-   जिल्ह्यात आज सायं. पाच वा. अखेर एकही कोरोना विषाणू संसर्गित रुग्ण नाही. आजअखेर अकरा जण सदृष्य लक्षणांमुळे दाखल झाले आहेत. त्यात आजच दाखल झालेल्या दोघांचा समावेश आहे. दरम्यान आजपर्यंत दाखल ४२ जणांपैकी ३१ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणि आज दाखल झालेले दोघे व अन्य नऊ असे अकरा जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. जिल्ह्यात आजतागायत विदेशातून आलेल्या १५१ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ५१ जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. तर ९० जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी   पूर्ण झाला आहे. तर नऊ जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत.

अकोला डाक विभागाची सेवा; पोस्टमन आणून देणार बॅंकेतून रक्कम आणि किराणा

अकोला , दि . ३१ ( जिमाका )-   अकोला डाक विभागामार्फत  लॉक डाऊन कालावधीत ग्राहकांना विविध सेवा दिल्या जाणार आहेत. या सेवा अकोला व वाशिम जिल्ह्यात देण्यात येणार आहेत.  या कालावधीत जे नागरिक घराबाहेर येऊ शकत नाहीत त्यांना  त्यांच्या राष्ट्रीय बॅंक खात्यातून  दहा हजार रुपयांपर्यंतच रक्कम पोस्टमन मार्फत घरपोच अदा करण्यात येईल. या सोबतच किराणा माल ही पोहोचविण्यात येणार आहे.  त्यासाठी ज्यांचे राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते आहेत त्या व्यक्तींनी प्रवर अधिक्षक डाक घर अकोला विभाग अकोला यांच्या  दूरध्वनी  ०७२४-२४१५०३९ या क्रमांकावर सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळात आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक तसेच आवश्यक रक्कम  आणि हवे असलेले किराणा सामान याची माहिती द्यावी. पोस्टमन मार्फत घरपोच रोख रक्कम व किराणा सामान पोहोचविले जाईल. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर अधिक्षक  डाकघर अकोला विभाग, अकोला यांनी केले आहे. या सेवेचा लाभ हा ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांच्या घरी बाहेर जाऊन सामान आणण्यासाठी कोणी व्यक्ती नाही अशांसाठी उपयुक्त ठरेल.

लोक घरातच राहतील याची खबरदारी घ्या- जिल्हाधिकारी पापळकर

इमेज
अकोला , दि . ३० ( जिमाका )-   कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्ह्यात  बाहेरगावाहून आलेले लोक हे घरातच अलगीकरण करुन कसे राहतील याची अधिकाधिक खबरदारी घ्या, लोकांचा एकमेकांशी संपर्क होऊ देऊ नका, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.   जिल्ह्यातील संचार बंदी अंमलबजावणी अन्य अनुषंगिक बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर,   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा उपनिबंधक डॉ प्रवीण लोखंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी सुमारे १५ हजार लोक हे मुंबई, पुणे,नागपूर यासारख्या जिल्ह्यातून व परप्रांतातून आलेले आहेत. या सर्व लोकांच्या हातावर शिक्का मारुन त्यांना घरातच अलगीकरण करुन ठेवा, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घ्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याचा भंग करणाऱ्यांसाठी त

कोरोना संसर्गाचा तिसरा टप्पा भेदण्यासाठी जिल्हाप्रशासन सज्ज

इमेज
अकोला , दि . ३० ( जिमाका )-   कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाचा तिसरा टप्पा भेदण्यासाठी जिल्हाप्रशासन सज्ज झाले आहे. याच अनुषंगाने करण्यात आलेल्या लॉक डाऊन कालावधीत  कोणीही व्यक्ती अन्न धान्य विना राहू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आपल्या टास्क फोर्सला दिल्या. या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.   या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस,अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे,   जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले,उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा उपनिबंधक डॉ प्रवीण लोखंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ तसेच टास्क फोर्स मधील सर्व अधिकारी उपस्थित होते. गृहअलगीकरण आवश्यकच जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, जिल्ह्यात जे जे व्यक्ती बाहेरगावाहून आले आहेत त्यांचे गृहअलगीकरण करणे आवश्यक आहे. त्या

३१ पैकी ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह; एक प्रलंबित

अकोला , दि . ३० ( जिमाका )-   जिल्ह्यात आज अखेर एकही कोरोना विषाणू संसर्गित रुग्ण नाही. दरम्यान आजपर्यंत दाखल ३१ जणांपैकी ३० जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणि एका जणाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. जिल्ह्यात आजतागायत विदेशातून आलेल्या १३२ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ४५ जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. तर ८५ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी   पूर्ण झाला आहे. तर एक जणाला विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. ०००००

कोरोना शेजारी दाखल; आता घरातच रहा! जिल्हा प्रशासनाचे कळकळीचे आवाहन

अकोला , दि . २९ ( जिमाका )-   शेजारच्या बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीताचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे अकोला जिल्हाप्रशासन अत्याधिक दक्ष झाले आहे. आता शेजारच्या जिल्ह्यातच कोरोना प्रादुर्भाव झाला आहे. निदान आता तरी अकोला जिल्ह्यातील रहिवाशांनी आपल्या घरातच थांबावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे. आज बुलडाणा येथे एका कोरोनाबाधीत व्यक्तीचा मृत्यू झाला.   या व्यक्तीने परदेश प्रवास केलेला नव्हता. तो स्थानिक रहिवासीच होता. याचा अर्थ आता कोरोना विषाणू प्रादुर्भावाची सामुहिक प्रसाराची स्थिती अर्थात टप्पा तीन आला आहे.   त्यामुळे लोकांनी आता घरातच थांबणे अत्यंत गरजेचे आहे, असे या परिस्थितीची समूह वैद्यकीय पार्श्वभूमि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले की, या टप्प्यावर कोरोना विषाणू चा संसर्ग फैलावतो. त्यामुळे जे या संसर्गाला लवकर बळी पडू शकतात अशा घटकांतील लोकांनी उदा. गरोदर माता. लहान बालके, साठ वर्षा वरील वृद्ध, मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुस कमकुवत असणारे लोक वा प्रतिकार शक्ती कमी असणारे लोक यांनी

अडकलेल्या परप्रांतियांना आहे तेथेच थांबण्याचे आदेश- निवास, भोजन, उपचार सुविधा पुरविणार

अकोला , दि . २९ ( जिमाका )-   कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात जे परप्रांतीय मजूर, कामगार, कर्मचारी आदी अडकून पडले असतील त्यांनी आपल्या गावी परतण्याचा प्रयत्न करु नये, ते जेथे आहेत तेथेच त्यांनी थांबावे त्यांच्यासाठी आश्रय,भोजन व आवश्यकता भासल्यास  वैद्यकीय उपचार इ. सर्व सुविधा स्थानिक प्रशानाने पुरवाव्या, त्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी असे आदेश आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशान्वये जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी आपापल्या भागात लॉकडाऊन मुळे अडकून पडलेल्या   गरीब व गरजू लोकांसाठी आश्रयस्थानांची व्यवस्था करावी. त्यांच्या जेवणासाठी सेवा भावी संस्थांमार्फत व्यवस्था करावी. या सर्व लोकांची स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत   आरोग्य विषयक तपासण्या करुन त्यांना तेथेच अलगीकरण करुन ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. घरमालकांसाठीही निर्देश याशिवाय ज्या ज्या ठिकाणी असे लोक किंवा कामगार हे भाड्याने दिलेल्या निवासस्थानी रहात असतील, अशा घरमालकांनी   या लोकांना आपल्या जागेतून बाहेर पडण

शेतीमालाच्या वाहतुकीसाठी कृषि विभागाशी संपर्क साधावा

अकोला , दि . २९ ( जिमाका )-   कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर देशात लागू असलेला लॉक डाऊन पाहता शेतकऱ्यांना आपला शेतीमाल  फळे , भाजीपाला इ. वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध होत नसल्यास त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी वा कृषि विभागाच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.  शेतीमालाचे नुकसान होऊ न देणे व त्यांना विक्रीसाठी बाजारापर्यंत पोहोचविणे ह्या सेवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी  शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत.

कोरोना मुकाबल्यासाठी जिल्हाप्रशासनाचा‘टास्क फोर्स’

अकोला , दि . २९ ( जिमाका )-   कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर देशात लागू असलेला लॉक डाऊनमुळे शासनाने निर्धारित केलेल्या नागरिकांना द्यावयाच्या अत्यावश्यक सेवा सुविधांवर नियंत्रण ठेवून त्यांचे नियमन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाप्रशासनाचा ‘टास्क फोर्स’ गठीत केल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या समितीत एकूण ११ अधिकाऱ्यांचा समावेश असून  त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी असे निर्देश दिले आहेत. या समितीत अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्याकडे आरोग्य विभागाशी संबंधित आराखडा तयार करणे जिल्हा आरोग्य यंत्रणा समन्वय, रक्ताची उपलब्धता,औषध पुरवठा सुरळीत राखून साठेबाजी रोखणे,खाजगी डॉक्टर्सचे दवाखाने सुरु ठेवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कलम १४४च्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हा पोलीस दलाशी समन्वय,   वाहने अधिग्रहण, मंत्रालयाशी समन्वय, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचलन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले व जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे यांनी जीवनावश्यक वस्तू, किराणा माल, भाजीपाला, पेट्रोल डिजेल वितरण, गॅस सिलिंडर उपलब्धता, शिवभोजन योजना अंम

पिककर्ज व्यवहारास ३१ मे पर्यंत मुदतवाढ

अकोला , दि . २९ ( जिमाका )-   कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर  किसान क्रेडीट कार्ड या योजनेद्वारे पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पिक कर्जाचे खाते व्यवहार पूर्ण करण्यास ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक तरोनिया यांनी दिली आहे. या संदर्भात केंद्रीय कृषि मंत्रालयाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पीककर्ज परतफेड तसेच व्याजाच्या वसूलीसही  ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे कळविण्यात आले आहे.

शुभ वर्तमानः दाखल शून्य, रुग्ण शून्य , अकोलेकरांना घरात थांबण्याचे आवाहन

अकोला , दि . २८ ( जिमाका )-   कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात आज नव्याने कोणीही संशयित वा प्रवासी म्हणून दाखल झाले नाही. त्यामुळे अकोला जिल्ह्यासाठी शुन्य दाखल व रुग्णही शून्य ही गुड न्युज ठरली आहे. लोकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन असेच सुरु ठेवले तर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव आपण रोखू शकू असा विश्वास आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात आज अखेर एकही कोरोना संसर्गित व्यक्ती नाही. त्यात दररोज विदेशातून आलेले व संशयिल लक्षणांमुळे दाखल होणारे रुग्ण आज दाखल झाले नाहीत. आज एकही दाखल न झाल्याने आजचे इनकमिंग शून्य होते. आतापर्यंत २७ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले. त्यातील सर्व जणांचे अहवाल प्राप्त झाले असून   ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात विदेशातून १२४ लोक आले. त्यातील ४९ जण सध्या गृह अलगीकरणात आहेत. त्यांचेवर वैद्यकीय पथक नियमित लक्ष ठेवून आहेत. तर ७४ जणांचा गृह अलगीकरणाचा कालावधीही पूर्ण झाला आहे. सद्यस्थितीत विलगीकरण कक्षात एकही व्यक्ती दाखल नाही,असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे. आता लोकांन

कृषि सेवा व निविष्ठा केंद्र सुरु ठेवा- ना.धोत्रे यांचे निर्देश;जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश निर्गमित

इमेज
अकोला , दि . २८ ( जिमाका )-   कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर सुरु असलेल्या संचार बंदी कालावधीत  जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्र व कृषि निविष्ठा केंद्र सुरु ठेवावीत असे निर्देश केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान ,   इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत. यासंदर्भात आज   केंद्रीय राज्यमंत्री ना. धोत्रे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी आ. रणधीर सावरकर उपस्थित होते. यावेळी   जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, निवासू उपजिल्हाधिकारी संजय   खडसे, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. ना. धोत्रे म्हणाले की, शेतकऱ्यांचे काम थांबू नये, त्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून यासाठी जिल्ह्यातील कृषि निविष्ठा   व कृषि सेवा केंद्र सुरु ठेवावे. जेणे करुन शेतकऱ्यांना सुविधा होईल. तसेच   जिल्ह्यातील   रेशन दुकानदारांनी   गोरगरिबांना तीन महिन्याचे अन

जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स प्रशासनासोबत -आयएमए पदाधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

इमेज
अकोला , दि . २८ ( जिमाका )-   कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील सर्व लहान मोठे डॉक्टर्स व  हॉस्पिटल्स हे प्रशासनासोबत असून आवश्यकता भासेल तेव्हा सर्व डॉक्टर्स आपली सेवा द्यायला तयार आहेत, तसेच जिल्ह्यातील डॉक्टर्स आपले दवाखानेही सुरु ठेवतील,असे निसंदिग्ध आश्वासन इंडीयन मेडीकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना आज दिले. यासंदर्भात आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेची आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,   निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध आदी प्रशासकीय अधिकारी   व आयएमए चे पदाधिकारी सदस्य डॉ. संतोष ठाकरे,   डॉ. अजयसिंग चव्हाण, डॉ. निलेश कोरडे, डॉ. राम शिंदे, डॉ. के .के. अग्रवाल, डॉ. रणजित देशमुख,   डॉ. प्रशांत लिबेकर, केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे   सुधीर वोरा, सचिव अंजुल जैन आदी उपस्थित होते.   कोरोना प्रादुर्भावाचा