1858 अहवाल प्राप्त, 413 पॉझिटीव्ह, 552 डिस्चार्ज, 10 मृत्यू
अकोला,दि.11(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे 1858 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1445 अहवाल निगेटीव्ह तर 413 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. दरम्यान 552 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 10
जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत
कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.10) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 241 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 46930(35758+10995+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे
एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 413+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 241= एकूण पॉझिटीव्ह- 654.
शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 229415 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 226461
फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2564 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 229281 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 193523 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे.
413 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 413 अहवाल
पॉझिटीव्ह आले. त्यात 172 महिला व 241
पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-59, अकोट-नऊ, बाळापूर-51, तेल्हारा-पाच,
बार्शी टाकळी-29, पातूर-50, अकोला-210. (अकोला ग्रामीण-40, अकोला मनपा क्षेत्र-170)
दरम्यान काल (दि. 10)
रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 241 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण
संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
552 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 27, केअर हॉस्पीटल येथील
चार, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील दोन, ओझोन
हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील 13, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील आठ, बिहाडे
हॉस्पीटल येथील चार, लोहाना हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील 28, हॉटेल रिजेन्सी
येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा
हॉस्पीटल येथील एक, फातेमा हॉस्पीटल येथील दोन, अवघते हॉस्पीटल येथील तीन, अर्थव हॉस्पीटल येथील तीन,
अकोला ॲक्सीडेंट येथील एक, उशाई हॉस्पीटल
येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 445 असे
एकूण 552 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
10 जणांचा मृत्यू
आज दिवसभरात 10
जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात रेणूका नगर येथील 41 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 30 एप्रिल रोजी
दाखल करण्यात आले होते. तर अन्य वाडेगाव ता. बाळापूर येथील 45 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 7 मे रोजी दाखल
करण्यात आले होते, बोरगाव मंजू येथील 62 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.
7 रोजी दाखल करण्यात आले होते, अन्वी
मिर्झापूर येथील 80 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 2
रोजी दाखल करण्यात आले होते. पिकेव्ही क्वॉटर येथील 51 वर्षीय पुरुष
असून या रुग्णास दि. 9 मे रोजी दाखल करण्यात आले होते,
तर पिंपरी खुर्द येथील 75
वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 27 एप्रिल
रोजी दाखल करण्यात आले होते. तर डाबकी रोड
येथील 58 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 मे रोजी दाखल करण्यात आले होते, मलकापूर येथील 72
वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल
करण्यात आले होते, दगडपारवा ता.बार्शीटाकळी येथील 65 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 3 रोजी दाखल करण्यात आले होते,
गांधीग्राम येथील 28 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
6539 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात
एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 46930(35758+10995+177) आहे. त्यात 827 मृत झाले आहेत. तर 39564 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6539 जणांवर उपचार
सुरु आहेत, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा