अकोला,दि.27 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात काल (दि.26) दिवसभरात
झालेल्या 304 चाचण्या झाल्या त्यात 51 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोट येथे 14 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, बार्शीटाकळी येथे पाच चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 36 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोला आयएमए येथे 13 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 86 चाचण्या झाल्या
त्यात 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, हेगडेवार लॅब
येथे 78 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, तर बाळापूर येथे आठ, मुर्तिजापूर येथे 45, आरोग
कर्मचाऱ्यांचे 19 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 304 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 51 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 48 हजार 228 चाचण्या झाल्या पैकी 13483 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा