पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मिशन बिगेन अंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी ; शहरासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता सुधारित आदेश जारी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

       अकोला , दि. 31 (जिमाका)- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचने नुसार ‘ मिशन बिगेन ’ अंतर्गत दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.   त्यानुसार अकोला शहरासह जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात 31 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहील. बाजारपेठा , दुकाने , भाजीपाला , फळे यार्ड , पेट्रोल पंप , सलून , बँका आदी सर्व बाबतीत यापूर्वी लागू असलेले आदेश 31 ऑगस्टपर्यंत कायम राहतील.   ऑगस्ट महिण्याच्या प्रत्येक रविवार कडक संचारबंदी लॉकडाऊन लागू राहिल. या पुर्वीच्या आदेशानुसार निर्बंधामध्‍ये देण्‍यात आलेली   सुलभता व टप्‍पानिहाय लॉकडाऊन उघडण्‍याबाबतचे आदेश   कायम ठेवून सुधारीत आदेश संपूर्ण अकोला शहर व जिल्‍हातील शहरी व ग्रामीण क्षेत्राकरिता लागू राहतील. 1.     सर्व प्रकारच्‍या अत्‍यावश्‍यक सेवा अंतर्गत असेलली प्रतिष्‍ठाने , दुकाने व ज्‍यांना यापूर्वी सुरु ठेवण्‍यास परवानगी देण्‍यात आलेली आहे ती यापूढे सुध्‍दा नि

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 577 चाचण्या, 14 पॉझिटिव्ह

        अकोला , दि. 31 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 577 चाचण्यामध्ये 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न    झाले , अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.             आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण भागात   आज येथे 104 चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. अकोट येथे 64 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला . बाळापूर येथे चाचण्या झाल्या नाहीत . बार्शीटाकळी येथे   126 चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. पातूर येथे   चाचण्या झाल्या नाहीत. तेल्हारा येथे 104 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला . मुर्तिजापूर येथे 95 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला .   तसेच अकोला मनपामध्ये 46 चाचण्या झाल्या त्यात आठ पॉझिटिव्ह आले आहे, अकोला जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 36 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे,   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन ज

328 अहवाल प्राप्त; 15 पॉझिटीव्ह, 26 डिस्चार्ज

अकोला , दि. 31 (जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 328 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 313 अहवाल निगेटीव्ह तर   15 अहवाल पॉझिटीव्ह आले.   आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2623 ( 2276+347 ) झाली आहे. आज दिवसभरात 26 रुग्ण बरे झाले. आता 422 जणांवर उपचार सुरु आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 19810 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 19241, फेरतपासणीचे 167 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे   402   नमुने होते. आजपर्यंत एकूण 19708 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या   17432     आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2623 ( 2276+347 ) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज 15 पॉझिटिव्ह आज दिवसभरात 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले . आज सकाळी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात   एक महिला व चार पुरुष आहेत. त्यातील   सिंधी कॅम्प, माना, न्यू भ

मुगावरील विषाणुजन्य रोग लिप क्रिंकल विषाणुची लक्षणे व उपाययोजना

अकोला , दि. 31 (जिमाका)- या वर्षीच्या हंगामामध्ये मुंग पिकावर या रोगाचा प्रादु र्भाव हा रस शो ष क कि डीमार्फत होत अस तो.   सर्वप्रथम कि डींची लक्षणे नविन आलेल्या पानावर आढळून येता त व त्यामुळे पाना ती ल हरी त द्रव्य कमी   झालेले आ ढळून येते व पानाचा भाग हिरवा , पि व ळा दिसुन येतो. काही पाने दुमडल्याप्रमाणे किं वा पर्णगुच्छ झाल्यासा रखे होतात. पानाच्या कडाखालच्या बा जुला व ळतात. पानाच्या शिरा खालच्या बाजूने लाल रं गाच्या होतात. पेरणीपासून ५ आठव ड्या त लक्षणं दिसु लागतात , त्यामुळे झाडांची वा ढ खुंटते व जास्त प्रा दु र्भावग्रस्त झाडे जागीच सुकून वाळू लागतात. रोगाची लागण झा ल्यामुळे   पर्ण गुच्छ होवुन आठव ड्या भरात प्रादूर्भावग्रस्त झालेली झाडे सु कू न सदर रोगाचा प्रादुर्भा व पिकाची पुर्ण वाढ झाल्यावर पानाचा रंग हिरवट पिवळा होतो व झाड़े सूकत नसून हा रोग बियाण्यामुळे होतो. किं वा प्रादुर्भा व ग्रस्त पा ने सशक्त पानाच्या संपर्कांत आल्यामुळे होतो. या क रीता शेतकरी बं धूनी पुढील प्रमाणे उपाययोजना केल्यास निश्चितच प्रतिबंध केल्या जावु शकतो . शेतकऱ्यांनी   सुधारीत वानाचा वापर करा

एक विद्यार्थी, एक वृक्ष उपक्रम राबवा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

इमेज
        अकोला , दि. 31 (जिमाका)-   वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजनेतर्गत दि. 30 सप्टेंबर पर्यंत एक विद्यार्थी, एक वृक्ष उपक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेत.             गुरुवार (दि.30) रोजी नियोजन भवनात एक विद्यार्थी, एक वृक्ष उपक्रम राबविण्याकरिता नियोजन करण्यासाठी आढावा घेण्यात आला. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विजय माने, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडके, वृक्ष मित्र ए. एस. नाथन यांची प्रमुख उपस्थिती होती.             प्रत्येक शाळेत शिक्षकांनी पुढाकार घेवून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक वृक्ष लावण्यात यावा. यासाठी वृक्ष सामाजिक वनीकरण विभागाकडून मिळतील. सदर वृक्ष विद्यार्थ्याने लावून त्यांचे   संगोपन करावे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्षा बद्दल प्रेम निर्माण होवून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

राखी टपालासाठी रविवारी (दि. 2) रोजी खास वितरण व्यवस्था

        अकोला , दि. 31 (जिमाका)-   राखी हा सण भारतीय संस्कृतीत महत्वाचा उत्सव आहे. दरवर्षी राखी, टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षीदेखील राखी टपाल महाराष्ट्र राज्य पोस्टल सर्कलमधील पोस्ट ऑफिसवर बुक करावेत अशी अपेक्षा आहे.             राखीचा सण सोमवार (दि.3) रोजी असल्यामुळे रविवार (दि.2) रोजी सर्व वितरण पोस्ट कार्यालयामध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था करण्यात आली आहे.   राखी सणाचे महत्व गृहीत धरता बहिण भावंडांना कन्टेमेन्ट झोन किवा इमारत सिल झाल्यामुळे अशा विविध निर्बधांमुळे भेट घेता येणार नाही. या कारणाने कोविड काळात पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास प्राधान्य दिले आहे आणि स्पीडपोस्‍ट मुळे राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद निर्माण होणार आहे. तरी नागरिकांनी प्राधान्य क्रमाने व वेळेत वितरण होण्यासाठी स्पीड पोस्ट सेवेचा वापर करावा, असे आवाहन प्रवर अधिक्षक, अकोला मंडळ, अकोला यांनी केले आहे.   

शेतकऱ्यांनी आजच पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

अकोला,दि.30(जिमाका)- जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गंत खरीप हंगाम 2020 करिता पिकविमा काढण्याचे काम कॉमन सर्व्हिस सेंटर(सीएससी) व बँकेव्दारे सुरु असून  शेतकऱ्यांनी पिक विमाचा लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांनी आजच 31 जुलैपूर्वी सिएससी सेंटर किंवा बँक येथे भेट देवून पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी या योजनेला पात्र असून बँकांना पिक विमा योजनेचे प्रकरणे स्विकारण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती, किटकांचा प्रादुर्भाव किवा अचानक उद्भवलेल्या घटनेमुळे पिकांचे होणारे नुकसान यासाठी शेतकऱ्यांना विमाचे संरक्षण देणे आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणे हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा उद्देश आहे. यासाठी शेतकरी आणि भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांच्यासह सर्व शेतकरी संरक्षणास पात्र आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्डची प्रत, सातबारा, भाडेपट्टीने शेती करण्यारे यांचा करार, बँकेच्या पासबुकाची प्रत आणि प्रस्तावित पिकांची पेरणी करण्याचे स्व:तचे घोषणापत्र आदि कागदपत्राचा समावेश आहे.   प्

रुग्णवाहीकांचे सुधारित भाडेदर

         अकोला , दि. 30 (जिमाका)- मा. उच्च न्यायालयाने रुग्णवाहीकांचे भाडेदर ठरविण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानुसार अकोला जिल्ह्याकरीता सामान्य नागरिेकांच्या दृष्टीने तसेच   रुग्णवाहिकांच्या मालकाच्या दृष्टीने सोईचे व   हिताचे होईल त्याअनुषंगाने प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, अकोला यांनी रुग्णवाहिकांच्या सुधारित भाडेदर दिले आहेत.              मारुती व्हॅनचे महानगरपालीका क्षेत्राचे रुगणवाहिकांचे भाडेदर रु. 500/- प्रती एक फेरी(25कि.मी.पर्यंत), महानगरपालिका   क्षेत्र सोडून रु. 1000/- व जिल्हाबाहेर प्रती कि.मी. रु.11/- प्रमाणे. टाटा सुमो व मॅटडोरचे महानगरपालीका क्षेत्राचे रुगणवाहिकांचे भाडेदर रु. 600/- प्रती एक फेरी(25कि.मी.पर्यंत), महानगरपालिका   क्षेत्र सोडून रु. 1400/- व जिल्हाबाहेर प्रती कि.मी. रु.12/- प्रमाणे. टाटा 407 व स्वराज मझदाचे महानगरपालीका क्षेत्राचे रुगणवाहिकांचे भाडेदर रु. 700/- प्रती एक फेरी(25कि.मी.पर्यंत), महानगरपालिका   क्षेत्र सोडून रु. 1300/- व जिल्हाबाहेर प्रती कि.मी. रु.14/- प्रमाणे तर आय.सी.यु. अथवा वातानुकुलित वाहनात वातनुकूलीत यंत्रणा वाहनात बसविली असल

जुने सेवायोजना नोंदणी कार्ड धारकांनी नोंदणी 14 ऑगस्ट पुर्वी अद्यावत करा

अकोला , दि. 30 (जिमाका)-   कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत दिल्य जाणाऱ्या सर्व सुविधा ह्या ऑनलाईन करण्यात आल्या असून त्याकरिता या विभागामांर्फत www.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टलवर सुरु करण्यात आलेले आहे. या   पोर्टलवर रोजगार इच्छुक उमेदवारांकरिता नोंदणी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच जुने सेवायोजन नोंदणी कार्ड धारकांनी शुक्रवार दि. 14 ऑगस्ट पुर्वी आपली नोंदणी अद्यावत करावी, असे आवाहन प्रांजली बारस्कर, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्र, अकोला यांनी केले आहे. ही माहिती अपडेट करण्याकरिता आपणास कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या नोंदणी कार्डचे अपडेशन आपल्या मोबाईल, लॅपटॉप, सायबर कॅफे वरुन करु शकता. जर आपणास काही अडचण निर्माण झाल्यास आपण कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांकावर 0724-2433849 वर संपर्क साधून माहिती विचारु शकता. जर नोंदणी मधील डाटा अपडेट न केल्यास जून्या नोंदणी असलेल्या उमेदवारांची सेवायोजना नोंदणी 15 ऑगस्ट पर्यंत रद्द होणार आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्

अनुदान योजना व बिज भांडवल योजना; मातंग समाजातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ संपर्क साधावा

अकोला , दि. 30 (जिमाका)-   साहित्यरत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे विकास महामंडळला सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी मुख्यालयाकडुन अनुदान योजनेतर्गत 200 व बिज भांडवल योजनेअंतर्गत चारचे उद्दीष्टे प्राप्‍त झालेले आहे. जिल्ह्यातील मातंग समाज व त्यातील 12 पोटजातीतील ज्या अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त व 50 वर्षापेक्षा कमी आहे. तसेच यापुर्वी शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही. अशा अर्जदारास अनुदान व बीजभांडवल योजनेअंतर्गंत कर्ज मागणी अर्जाचे वाटप जिल्हा कार्यालयात चालू आहे. गरजु लाभार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, दोन फोटो, घर टॅक्स पावती किंवा नमुना आठ, व्यवसायासंबंधी कोटेशन, प्रकल्प अहवाल तसेच व्यवसायसंबंधी प्रमाणपत्रासह कर्ज मागणी अर्ज भरुन जमा करुन घेण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, आरोग्य नगर चौक, नालंदा नगरच्या बोर्डाजवळ, कौलखेड रोड, अकोला, येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,   असे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक   गंगाधर श्रीरामवार यांनी केले आहे.

मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; 10 ऑगस्ट पर्यंत संपर्क साधावा

        अकोला , दि. 30 (जिमाका)-   सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात 10 वी , 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विशेष 60 टक्के पेक्षा जास्त प्राविण्याने गुणवत्ता मिळवुन उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी/विद्यार्थ्यांना महामंडळाकडुन जेष्ठता व गुण क्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधिन राहुन मुख्यालय, मुंबईव्दारा अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती देण्यात येते. त्याकरीता पात्र विद्यार्थ्यांनी पुढील कागद पत्रांची पुर्तता करुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, आरोग्य नगर चौक, नालंदा नगरच्या बोर्डाजवळ, कौलखेड रोड, अकोला, येथे कार्यालयीन वेळेत सोमवार दि. 10 ऑगस्ट पर्यंत संपर्क साधावा. यानंतर अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.             शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागद पत्रे जातीचा दाखला, शाळेचा दाखला, गुणपत्रिका, रेशन कार्ड अथवा आधार कार्ड, दोन फोटो, पुढिल वर्गात प्रवेश घेतलेल्या पावतीची झेरॉक्स अथवा बोनाफाईट इत्यादीची आवश्यकता आहे, असे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थ

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 582 चाचण्या, 29 पॉझिटिव्ह

        अकोला , दि. 30 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 582 चाचण्यामध्ये 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न    झाले , अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.             आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण भागात   आज येथे 102 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला . अकोट येथे 59 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला . बाळापूर येथे चाचण्या झाल्या नाहीत . बार्शीटाकळी येथे   69 चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. पातूर येथे 41 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तेल्हारा येथे 87 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला . मुर्तिजापूर येथे 103 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला .   तसेच अकोला मनपामध्ये 93 चाचण्या झाल्या त्यात पाच पॉझिटिव्ह आले आहे, अकोला जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 18 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला

395 अहवाल प्राप्त; 37 पॉझिटीव्ह, 16 डिस्चार्ज, एक मयत

अकोला , दि. 30 (जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 395 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 358 अहवाल निगेटीव्ह तर  37 अहवाल पॉझिटीव्ह आले.   आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2579 ( 2261+318 ) झाली आहे. आज दिवसभरात 16 रुग्ण बरे झाले. आता 404 जणांवर उपचार सुरु आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 19463 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 18902, फेरतपासणीचे 167 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे   394   नमुने होते. आजपर्यंत एकूण 19380 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या   17119    आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2579 ( 2261+318 ) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज 37 पॉझिटिव्ह आज दिवसभरात 37 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले . आज सकाळी 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  18 महिला व 16 पुरुष आहेत. त्यातील मोठी उमरी येथील सात जण, वानखडे

अतिवृष्टीचा इशारा

अकोला , दि. 29 (जिमाका)-   हवामान विभाग ,   नागपूर यांच्या संदेशानुसार रविवार ( दि. 2 ऑगस्ट) पर्यंतच्या कालावधीत   जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी ,   वारा , वादळ ,   विज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे .   पुर्णा नदीवर असलेल्या घुंगशी बॅरेज प्रकल्पाचे पाण्याची पातळी 254.50 घ.मी. असुन   सद्यस्थितीत सर्व गेट मधुन पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीमध्ये होत आहे.   पुर्णानदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. तसेच दगडपारवा प्रकल्पामध्ये 81.05 टक्के व काटेपुर्णा प्रकल्पामध्ये 75.81 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तरी याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व संबधित अधिकारी / कर्मचारी / मंडळ अधिकारी / तलाठी / ग्रामसेवक कृषी सहायक ,   आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच पूरबाधित क्षेत्रातील लोकांची योग्य ती दक्षता घ्यावी , असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा;   जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन         अकोला , दि. 29 (जिमाका)- जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गंत खरीप हंगाम   2020   करिता पिकविमा काढण्याचे काम कॉमन सर्व्हिस सेंटर(सीएससी) व बँकेव्दारे सुरु असून आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 60 हजार 688 शेतकऱ्यांनी पिक विमाचा लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी सिएससी सेंटर किंवा बँक येथे भेट देवून पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.             कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी या योजनेला पात्र असून बँकांना पिक विमा योजनेचे प्रकरणे स्विकारण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती, किटकांचा प्रादुर्भाव किवा अचानक उद्भवलेल्या घटनेमुळे पिकांचे होणारे नुकसान यासाठी शेतकऱ्यांना विमाचे संरक्षण देणे आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणे हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा उद्देश आहे. यासाठी शेतकरी आणि भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांच्यासह सर्व शेतकरी संरक्षणास पात्र आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड