पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निवृत्तीवेतनधारकांनी हयात प्रमाणपत्र तात्काळ सादर करा - जिल्हा कोषागाराकडून आवाहन

  निवृत्तीवेतनधारकांनी हयात प्रमाणपत्र तात्काळ सादर करा   - जिल्हा कोषागाराकडून आवाहन अकोला दि. २७ : जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक , कुटुंब निवृत्तीवेतनधारक , माजी आमदार तसेच इतर सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी नोव्हेंबर २०२३ मधील निवृत्तीवेतनासाठी आपल्या बँकेत जाऊन हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी. बँकेत त्यासंबंधीची यादी उपलब्ध आहे , असे आवाहन जिल्हा कोषागारातर्फे करण्यात आले आहे.             निवृत्तीवेतनधारकांनी या यादीमध्ये आधारकार्ड , पॅनकार्ड , दुरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे अनिवार्य आहे. त्याशिवाय डिसेंबर २०२३ चे निवृत्तीवेतन काढता येणार नाही. करपात्र उत्पन्न असणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांना जुन्या करसंरचनेप्रमाणे प्राप्तीकर गणना करावयाची असल्यास तसा अर्ज कोषागार कार्यालय , अकोला येथे सादर करावा अन्यथा नव्या प्रणालीनुसार प्राप्तीकर कपात करण्यात येईल. वयाची ८० वर्ष   पूर्ण करणा-या किंवा त्यावरील निवृत्तीवेतन धारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनात १० टक्के वाढ मिळाली नाही त्यांनी तात्काळ आधारकार्ड तसेच बँक पासबुक घेऊन कोषागार कार्यालय , अकोला

आयुष्मान कार्ड काढणे आता अधिक सोपे; करा ॲपचा वापर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत पाच लाख रू. पर्यंत विनामूल्य उपचाराचा लाभ - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
  आयुष्मान कार्ड काढणे आता अधिक सोपे; करा ॲपचा वापर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत पाच लाख रू. पर्यंत विनामूल्य उपचाराचा लाभ -           जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 27 : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत गरजूंना पाच लाख रू. पर्यंत विनामूल्य उपचाराचा लाभ मिळतो. जिल्ह्यात आरोग्य केंद्रे, सामाईक सुविधा केंद्रांच्या ठिकाणी आयुष्मान कार्ड वितरित करण्यात येत आहेत. ॲपच्या साह्याने हे कार्ड स्वत:ही काढणे शक्य असून, अधिकाधिक नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.            केंद्र शासनाची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसह राबवली जात आहे. या योजनेत 1 हजार 359 गंभीर आजारांवर पाच लक्ष रु. पर्यंतची शस्त्रक्रिया व उपचार अंगीकृत शासकीय आणि खासगी रुग्णालयातून पूर्णतः विनामूल्य केले जातात. आरोग्य विमा कवच प्रति कुटुंब, प्रति वर्ष पाच लक्ष रुपये अशा स्वरूपात मिळते. जिल्ह्यातील 3 लक्ष 40 हजार 834 पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जनआरो

जिल्‍हा निवडणूक अधिकारी कार्यालय अकोला यांच्‍या वतीने आयोजीत पत्रकार परिषद मुद्दे

  ०१.०१.२०२४ या अर्हता   दिनांकावर   आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍दी दिनांक   २७/१०/२०२३ च्‍या अनुषंगाने जिल्‍हा निवडणूक अधिकारी कार्यालय अकोला यांच्‍या वतीने आयोजीत पत्रकार परिषद              लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा , असे आवाहन अकोला जिल्‍हयाचे जिल्‍हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण , शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रम दिनांक २७ ऑक्टोबर ते दिनांक ०९ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबवला जाणार आहे. दिनांक ०१ जानेवारी २०२४ रोजी किंवा त्या आधी वया

विविध मान्यवरांच्या सहभागासह सायकल रॅलीद्वारे मतदार जनजागृती

इमेज
विविध मान्यवरांच्या सहभागासह सायकल रॅलीद्वारे मतदार जनजागृती   अकोला, दि. 27 :  जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदार जनजागृतीसाठी शहरात आज सायकल रॅली काढण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.   जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून  रॅलीचा शुभारंभ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे,  उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव,   महापालिका उपायुक्त गीता वंजारी आदी यावेळी उपस्थित होते.     रॅलीत ‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, ‘मी मतदार नोंदणी केली आहे. आपण केली का’ अशा फलकांसह व घोषणा नोंदविलेले टी शर्ट परिधान करून मान्यवर सहभागी झाले होते. ही रॅली अशोकवाटिका, नेहरू पार्क चौक, सिव्हिल लाईन चौक, दुर्गा चौक, अग्रसेन चौक, टॉवर चौक, बसस्थानक चौक, गांधी रोड मार्गाने पंचायत समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन समारोप झाला.   आगामी काळातील निवडणूका लक्षात घेऊन नवमतदार, दिव्यांग,