पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लसीकरणाला उत्स्‍फुर्त प्रतिसाद; 12 ते 14 वयोगटातील एकाच दिवसी 4 हजार 600 मुलांचे लसीकरण

इमेज
  अकोला दि.31(जिमाका)- जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहिम वेगाने सुरु असून नागरिक व विद्यार्थ्यांच्या उस्त्फुर्त प्रतिसादामुळे आज(दि.31) रोजी   एकूण 20 लक्ष डोसचे टप्पा पार केला आहे. तसेच 12-14 वयोगटातील मुलांचे एकाच दिवसी(दि.31रोजी) 4 हजार 618 पेक्षा जास्त लसीकरण झाले   असल्याची माहिती जिल्हा परिषदचे जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी दिली.   12-14 वयोगटातील विद्यार्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण वेगाने सुरु असून ज्यानी दुसरा डोस घेणे बाकी आहे त्यांना कॉलिंग सेंटरव्दारे कॉल करून दुसरा डोस घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावी व अशाच प्रकारे सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार,   जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले,   माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, लसीकरण सनियंत्रक उमेश ताठे यांनी केले आहे. 00000

कोविडःआरटीपीसीआर व रॅपिड अहवाल शुन्य

अकोला दि.31(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 58 अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दरम्यान काल (दि.30) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.   त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65179(49169+15038+972) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. शून्य व खाजगी शून्य) शून्य   + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 00. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 371484 तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 367367 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3707 नमुने होते. आजपर्यंत एकूण 371484 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 322315 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे

उष्णतेची लाटः मुकआपत्ती खबरदारीने स्वतःचा बचाव हीच युक्ती

  साधारणपणे एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात तापमान मोठ्याप्रमाणावर वाढलेले दिसते. या काळात अनेकदा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो. यंदा मात्र मार्च महिन्यापासूनच   तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उष्णतेची लाट व त्याच्या परिणामांपासून करावयाचा बचाव याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान हे तीन अंश सेल्सियसने अधिक असेल किंवा सलग दोन दिवस 45 अंश सेल्सियस पेक्षा अधिक तापमान असेल अशा स्थितीला उष्णतेची लाट असे संबोधले जाते. वातावरणातील बदलांमुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते आहे. भारताच्या उत्तर भागात दरवर्षी उष्णतेच्या पाच ते सहा लाटा येतात. हे प्रमाणही वाढते आहे. 1992 ते 2015 या काळात आपल्या देशात 22 हजार 562 लोकांना उष्णतेच्या लाटेमुळे जीव गमवावा लागला आहे. या सोबतच पक्षी, प्राणि, वनस्पती यांची हानीही मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे उष्णतेची लाट ही एक मुक आपत्ती मानली जाते. त्यामुळे होणारे नुकसानही मोठे असते. वातावरणाचे तापमान 37 अंश सेल्सियस असेपर्यंत   मानवाला काही त्रास होत ना

कोविडःआरटीपीसीआर व रॅपिड अहवाल शुन्य

  अकोला दि.30(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 121 अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दरम्यान काल (दि.29) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.   त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65179(49169+15038+972) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. शून्य व खाजगी शून्य) शून्य   + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 00. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 371426 तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 367309 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3707 नमुने होते. आजपर्यंत एकूण 371426 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 322257 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आह

शासकीय कार्यालयात येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट आवश्यक; 61 जणांवर कारवाई

इमेज
  अकोला ,   दि. 30 (जिमाका)-   परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शासकीय विभागात येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्यानुसार, विना हेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारावर आज  विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात विना हेल्मेट येणाऱ्या 61 दुचाकीस्वारांकडून   दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली. वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून   अत्यंत महत्वाचे आहे. दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी किंवा मृत पावणारे वाहनस्वार हे विना हेल्मेट प्रवास करणारे असतात.   हेल्मेट वापरासंबंधीत प्रबोधनात्मक व अंमलबजावणी व्हावी याकरीता तपासणी मोहिमेची सुरुवात आजपासून करण्यात आली. ही मोहिम जिल्हाभर राबविण्यात येणार आहे.   ही मोहिम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी स्वतः उपस्थित राहून जिल्हाधिकारी कार्यालयात होत असलेल्या कारवाईची माहिती घेतली. उप प्रादेशिक परिवहन कार

शेतकऱ्यांशी संबंधित योजनांबाबत तक्रारी, आक्षेपांविषयी दर सोमवारी घेणार आढावा

  अकोला ,   दि. 30 (जिमाका)-   दर सोमवारी शेतकऱ्यांशी संबंधित योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना, पीएम किसान योजना, लघु उद्योग संबंधीत कर्ज इत्यादी बाबतचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येतो. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  संबंधीत योजना किंवा कर्जासंबंधीत तक्रारी, आक्षेप असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथे दर सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी 

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशवी निर्मिती, वितरण, खरेदी व विक्रीस बंदी

                अकोला दि . 30 ( जिमाका)-   75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकच्या पिशव्यांमुळे निर्माण होणारा कचरा व प्रदुषण व पर्यावरणास होणारा धोका टाळण्यासाठी  75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची आयात, साठवणूक, निर्मिती, वितरण तसेच खरेदी विक्री यावर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज निर्गमित केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात दि.1 एप्रिल 2022 पासून करण्यात यावी,असेही आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी  तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था व प्रतिष्ठाने यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी  मनपा आयुक्त, उपप्रादेशीक अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी फिरते भरारी पथक तयार करावे. त्यात सेव्ह बर्ड संस्था अकोला या संस्थेच्या प्रतिनिधींचा समावेश करावा. पोलीस अधीक्षकांनीही स्वतंत्र फिरते भरारी पथक तयार करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. 000000

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; कोविड निर्बंध:सभा, संमेलन, समारंभातील उपस्थिती संख्येवरील मर्यादा हटवली

                अकोला दि . 30 ( जिमाका)-   जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून  दैनंदिन रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे गुरुवार दि.31 मार्च पासून कोविड निर्बंधांमध्ये खालील प्रमाणे सवलत देण्याबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात दि.31 मार्चच्या मध्यरात्री पासून  सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, उत्सव, विवाह तसेच इतर मंडळ इ. ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या व्यक्तिंच्या संख्येवर कोणतीही मर्यादा राहणार नाही. मात्र कोविड अनुरुप वर्तनाचे पालन बंधनकारक असेल. मिरवणूक, रॅली इ. बाबत संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे बंधनकारक असेल. ध्वनीक्षेपक, वाद्य इ. बाबतही पोलीस विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असेल असेही आदेशात म्हटले आहे. 000000

प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तिच्या निर्मिती, वितरण व विक्रीस बंदी :केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनांची अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

                अकोला दि . 30 ( जिमाका)-   पीओपीच्या वापरामुळे होणाऱ्या जल व वायु प्रदुषणाचा संभाव्य धोका लक्षात घेवून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच   पर्यावरण संरक्षण कायदा अधिनियम 1986 मधील तरतूदीनुसार प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्तिचे उत्पादन, वितरण व विक्रीस शुक्रवार दि. 1 मे 2022 पासून प्रतिबंध   करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज  निर्गमित केले. पर्यावरण संरक्षण कायदा अधिनियम 1986 मधील तरतूदीनुसार हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने   प्लास्टर ऑफ पॅरीस हद्दपार होण्याच्या दृष्टीने निर्गमित केलेल्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी सन 2022 च्या गणेशोत्सवापासून करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. आदेश याप्रमाणे :   1.        अकोला जिल्ह्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसची (पीओपी) मुर्ती निर्मिती, वितरण, खरेदी व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. 2.         2.         ज्या मुर्तिकारांकडे पीओपीच्या मुर्ति असतील त्यांना दि.30 एप्रिल 2022 पर्यंत विक्री करण्याची मुभा देण

जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनी निमंत्रित; ‘परीक्षा पे चर्चा’कार्यक्रमात पंतप्रधान साधणार संवाद ऑनलाईन सहभागाचे आवाहन

                अकोला दि .30( जिमाका)-   येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या चार बालचित्रकार असलेल्या   विद्यार्थिनींना ‘परीक्षा पे चर्चा’ या   कार्यक्रमासाठी   निमंत्रण आले आहे. या कार्यक्रमाचे भेट प्रसारण होणार असून देशातील समस्त विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता थेट संवाद साधणार आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रमात आपण आपले प्रश्न , मत व विचार https://drive.google.com/ drive/u/ 1/ folders/ 1 eL 6 _ 3 UqLtRnKM 0 gAmj 5 gSNQVVnLTJp 52 या पोर्टलवर अपलोड करुन नोंदवू शकता. ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम दुरदर्शन व आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्या , शिक्षा मंत्रालयाचे अधिकृत यूट्युब चॅनलवर एकाच वेळी प्रसारित करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था , विद्यार्थी , पालक व शिक्षकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा , असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले. ०००००

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दि.31 पर्यंत ऑनलाईन अर्ज करा

               अकोला ,   दि. 30 (जिमाका)-   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्र, अकोला या कार्यालयासह अमरावती विभागातील वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केला आहे. रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर, पदविका व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी 300 पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली. अमरावती विभागाच्या सर्व जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in   या संकेतस्थळावर सेवायोजना कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्या लॉगीन मधुन शैक्षणीक पात्रेतेनुसार ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील रिक्तपदाकरीता दि.31 पर्यंत आवेदन करुन शकतो. तसेच ज्या उमेदवारांनी अद्याप सेवायोजन कार्ड नोंदणी केलेली नाही त्यानी संकेतस्थळावर तात्काळ नोंदणी करुन आनलाईन आवेदन करावे. ऑनलाईन अप्लॉय केलेल्या उमेदवारांची कंपनी, उद्योजक, एच.आर.प्रत

कोविडःआरटीपीसीआर व रॅपिड अहवाल शुन्य

  अकोला दि.29(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 125 अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दरम्यान काल (दि.28) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.   त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65179(49169+15038+972) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. शून्य व खाजगी शून्य) शून्य   + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 00. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 371305 तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 367188 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3707 नमुने होते. आजपर्यंत एकूण 371305 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 322136 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त(पुर्व) परीक्षेसाठी 29 केंद्रांवर व्यवस्था; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

               अकोला, दि.29(जिमाका)-   महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त (पुर्व) परिक्षा रविवार दि.3 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. अकोला शहरातील   एकूण 29 उपकेंद्रावर सकाळी 11 ते 12 या वेळेत ही परीक्षा होणार आहे.   ही परीक्षा   शांततेच्या वातावरणात पार पाडावी यासाठी सर्व परीक्षा केंद्र परिसरात   प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.             यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटल्यानुसार  परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये रविवार   दि. 3 एप्रिल रोजी सकाळी सहा ते सायंकाळी आठ यावेळात सर्व 29 परीक्षा केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरील लागून 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. उपकेंद्राचे नाव व पत्ता : 1.         प्रभात किड्स, वाशिम रोड, अकोला 2.         जागृती विद्यालय व उच्च माध्य. विद्यालय, रणपीसे नगर. 3.         शिवाजी आर्ट, कॉमर्स अन्ड सायन्स कॉलेज मोर्णा बिल्

व्हॉलीबॉल खेळाडुंकरीता ‘‘टॅलेंट सर्च’’; प्रशिक्षण शिबीरांचा लाभ घेण्याचे आवाहन

  अकोला दि.29(जिमाका)-   व्हॉलीबॉल खेळ व खेळाडुंसाठी जिल्ह्यात ‘‘टॅलेंट सर्च’’ प्रक्रियेतून 16 वर्षाखालील 30 मुलांसाठी 20 दिवसांचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे एप्रिल/मे मध्ये करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीरात नोंदणी पात्र खेळाडुंनी गुरुवार दि. 30 मार्च रोजी दुपारी दोन वाजेपर्यत स्वत: उपस्थित राहुन करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले.  व्हॉलीबॉल खेळामध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडु निर्माण व्हावे याकरीता   प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी तामिळनाडुचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी.सी. पांडियन यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच विविध स्पर्धामध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होऊन भविष्यात या खेळाडुंना परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. पात्रता : खेळाडु 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील असावा, उंची सहा फुट, शाळेत शिकत असलेला किंवा नसलेला खेळाडु शिबीरासाठी पात्र ठरणार आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सन 2019-20 या वर्षात आयोजित क

जिल्ह्यात उष्णेतेची लाट; दक्षता घेण्याचे आवाहन

  अकोला दि.29(जिमाका)- भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्या संदेशानुसार शनिवार दि. 2 एप्रिल 2022 पर्यंत जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे, शारीरीक श्रमाची कामे टाळावीत अशक्तपणा स्थुलपणा, डोकदुखी, चक्कर येणे ही उष्माघात होण्याची प्राथमिक लक्षणे आहेत. त्यानुसार याबाबत तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी. उष्णेतेच्या लाटेच्या अनुषंगानी सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याचे सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

दिव्यांगांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे-पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

इमेज
                अकोला दि . 29 ( जिमाका)-   दिव्यांगांना फिरते विक्री केंद्र म्हणजेच ई- ट्रायसिकल  वाटप हे  दिव्यांगांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी राबविण्यात येत आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून दिव्यांगांच्या विकासासाठी वेगळे धोरण, संकल्पना आकारास येईल,असे प्रतिपादन राज्याचे   जलसंपदा व लाभक्षेत्र विकास ,   शालेय शिक्षण ,   महिला व बालविकास ,   इतर मागासवर्ग ,   सामाजिक व शैक्षणिक    मागास प्रवर्ग ,   विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष   मागास प्रवर्ग कल्याण ,   कामगार राज्यमंत्री    तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू क डू यांनी आज येथे केले. महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात दिव्यांगांना फिरते विक्री केंद्र वाटप करण्यात आले.   या कार्यक्रमास कुलगुरु डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ शुक्ला, माविमच्या अकोला समन्वयक वर्षा खोब्रागडे, उमेदचे गजानन महल्ले आदी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात 119 ट्रायसिकल अर्थात फिरते विक्री केंद्र दिव्यांगांना वाटप करण्यात आले होते. या दुसऱ्या टप्प्या