मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी कोणत्याही बाह्यसंस्थेची नेमणूक नाही: समाजमाध्यमांवरील माहितीवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे आवाहन

 अकोला, दि.१८ (जिमाका)- समाजमाध्यमांमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) या योजनेसंदर्भात माहिती पसरविण्यात येत आहे. या संदेशात चुकीची माहिती देण्यात आली आहे. या माहितीवर कुणीही विश्वास ठेवू नये., तसेच या योजनेच्या कामासाठी  कोणत्याही खाजगी संस्थेची वा व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली नाही, तरी नागरिकांनी अशा माहितीपासून सावध रहावे, असे जिल्हा उद्योग केंद्र, अकोला मार्फत कळविण्यात आले आहे.

 CMEGP  या योजनेसंदर्भात काहीही काम असल्यास त्यासाठी नागरिकांनी व लाभार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, भुविकास बॅंक इमारत, पहिला मजला, एस. पी. ऑफिसच्या  बाजूला, अकोला (दूरध्वनी- ०७२४-२४३०८८०) येथे संपर्क साधावा,असे आवाहन महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र, अकोला यांनी केले आहे.

यासंदर्भातील महत्त्वाच्या योजना व त्यांची माहिती याप्रमाणे उपलब्ध होईल.

१)     प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना (PMEGP)- ही योजना केंद्र पुरस्कृत योजना असून  उत्पादन उद्योगासाठी २५ लाख रुपये तर सेवा उद्योगासाठी १० लाख रुपयांचे कर्ज बॅंकांमार्फत मंजूर होऊ शकते. विविध प्रवर्गांसाठी  १५ ते ३५ टक्के अनुदानही मिळते. या योजनेची सर्व कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने  www.kviconline.gov.in या संकेतस्थळावरुन होते.

२)     मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP)- ही योजना राज्यपुरस्कृत असून  उत्पादन उद्योगासाठी ५० लाख रुपये तर सेवा उद्योगासाठी  १० लाख रुपये कर्ज बॅंकेमार्फत उपलब्ध होऊ शकते. या योजनेतही विविध प्रवर्गानुसार  १५ ते २५ टक्के अनुदान मिळते. या योजनेसंदर्भात सर्व कार्यवाही  ऑनलाईन पद्धतीने  www.maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावरुन होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :