पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुकाने, आस्थापना सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत सुरु राहणार: ‘ब्रेक द चेन’,अंतर्गत जिल्हाधिकारी पापळकर यांचे आदेश

  अकोला, दि.३१(जिमाका)- अकोला जि ल्ह्या त कोविड रुग्‍णांचा पॉझीटीव्‍हीटी रेट व ऑ क्सि जन बेडची उपलब्‍धता तसेच दैनंदिन आढळणा ऱ्या रुग्‍णांची परिस्थिती लक्षात घेता Break The Chain अंतर्गत अकोला जि ल्ह्या करिता   मंगळवार दि. १ जून चे सकाळी सात वाजल्यापासून ते मंगळवार दि.१५ जुनचे रात्री १२ वाजेपर्यंत   निर्बंधासह  आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित  केले आहेत . राज्‍यातील कोविड- १९ च्‍या दुस ऱ्या लाटे ची स्थिती लक्षात घेता , राज्याचे मुख्य सचिव यांनी सुधारीत सुचना निर्गमित केल्‍या असुन त्यानुसार राज्यातील निर्बंधांचा कालावधी   मंगळवार दि. १५ जून पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानिर्देशानुसार   आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यानंतर आदेश निर्गमित करण्यात आले. या आदेशात म्हटल्यानुसार, अ .    निर्बंधासह सुरु ठेवण्‍यात आलेल्‍या अत्‍यावश्‍यक / बिगर अत्‍यावश्‍यक सेवा. अ.क्र. बाब निश्चित करण्‍यात आलेली   वेळ १ सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने/किराणा/औषधी दुकाने/स्‍वस्‍त धान्‍य दुकाने सकाळी स

1004 अहवाल प्राप्त, 113 पॉझिटीव्ह, 411 डिस्चार्ज, चार मृत्यू

            अकोला , दि.31 ( जिमाका)-   आज दिवसभरात    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1004 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 891   अहवाल निगेटीव्ह तर 113   जणांचे अहवाल पॉझिटीव्ह    आले.   दरम्यान 4 11   जणांना    डिस्चार्ज    देण्यात आला ,   तर चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला ,   असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.                 त्याच प्रमाणे काल (दि. 30 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 43   जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.    त्यामुळे    आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण    संख्या 55 677 (41 837 +136 63 +177)  झाली आहे ,   अशी    माहिती शासकीय वैद्यकीय    महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 113 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 43 = एकूण पॉझिटीव्ह- 156.                           शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 268035 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 264978 फेरतपासणीचे 390   तर वैद्यकीय कर्मचाऱ्य

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ: वैयक्तिक व्याज परतावा योजनाःदोघा लाभार्थ्यांना ट्रॅक्टर वितरण

इमेज
  अकोला , दि.३१ ( जिमाका)-   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. अकोला तर्फे वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत  दोघा  लाभार्थ्यांना व्यावसायिक ट्रॅक्टर चे वितरण आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले.   येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला यांच्यातर्फे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ च्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत दोघा लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते लाभार्थी संजय देशमुख व गजेंद्र मते या दोघांना व्यावसायिक ट्रॅक्टर च्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र द. ल. ठाकरे, जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील महामंडळ, अकोला रोहित बारस्कर तसेच महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीचे वितरक तसेच कोटक महिंद्रा बँकचे अधिकारी उपस्थित होते. अशी आहे योजनाः- अण्णासाहेब