कोविड चाचणीसाठी मोफत बस उपलब्ध

 



अकोला,दि. 5(जिमाका)-  येथील पावस ट्रॅव्हल्स  या संस्थेने  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आवाहनानुसार, कोविड चाचणीसाठी फिरते स्वॅब संकलन केंद्र कार्यान्वित करता यावे यासाठी त्यांच्या संस्थेची एक बस विनामूल्य उपलब्ध करुन दिली आहे. शनिवार दि.1 पासून ही बस कार्यान्वित असून  सद्यस्थितीत अकोला शहरात विविध ठिकाणी जाऊन लोकांचे स्वॅब संकलन करण्यासाठी या बसची मोलाची मदत होत आहे. या बसला आज जिल्हाधिकारी पापळकर यांनी भेट दिली व बस मधील आरोग्य पथकाशी चर्चा केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच पावस ट्रॅव्हल्स चे संचालक आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन