पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोविडःआरटीपीसीआर चाचण्यात ‘एक’ पॉझिटिव्ह; दोन डिस्चार्ज

अकोला दि.30 ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 69   अहवाल प्राप्त झाले.   त्यापैकी एकाचा अहवाल   पॉझिटीव्ह आला. तर दोन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला , असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह - आरटीपीसीआर(शा.वै.म. 1 व खाजगी 0 )1+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   0= एकूण पॉझिटीव्ह 1 . आरटीपीसीआर ‘एक’ पॉझिटिव्ह आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका महिलाचा समावेश असून हा रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. दोन डिस्चार्ज आज दिवसभरात दोन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. सक्रिय रुग्ण ‘ 35’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या   660 69 (49936+15142+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 35    सक्रिय रुग्ण आहेत ,   अशी माहिती    जिल्हा रुग्ण

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 24 मतदान केंद्रांची वाढ 1500 मतदारांवरील मतदान केंद्राचे विभाजन

इमेज
अकोला , दि. 30 (जिमाका)- अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 1500 मतदारांवरील मतदान केंद्राचे विभाजन करण्यात आले असून या मतदार संघात 24 मतदान केंद्राची भर पडल्याने आता येथे 307 मतदान केंद्र निर्माण झाली आहेत. तसेच या मतदार संघातील तीन मतदान केंद्रात बदल करण्‍यात आले आहेत. ब दल झालेले मतदार केंद्र 1. मतदान केंद्र क्रमांक दोन- मनपा प्रा.म.मुलांची शाळा क्र. 18 खो.क्र. 4 येथील मतदान केंद्राऐवजी मतदान केंद्र क्रमांक दोन व तीन - स्‍व. एस. एम. डामरे गुरुजी सर्वोदय विद्यालय,अकोला व श्रीमती शांताबाई रामभाऊ चीम सर्वोदय मराठी प्राथ. शाळा, दक्षिणेकडील भाग अकोला येथे. 2. मतदान केंद्र क्रमांक दोन- आयुर्वेदीक भवन मनपा अकोला ऐवजी मतदान केंद्र एक - स्‍व. एस. एम. डामरे गुरुजी सर्वोदय विदयालय, अकोला व श्रीमती शांताबाई रामभाऊ चीम सर्वोदय मराठी प्राथ. शाळा, दक्षिणेकडील भाग अकोला खोली क्र.दोन 3. मतदान केंद्र क्र. 11 ते 15- स्‍व. एस. एम. डामरे गुरुजी सर्वोदय विदयालय, अकोला व श्रीमती शांताबाई रामभाऊ चीम सर्वोदय मराठी प्राथ. शाळा, अकोला ऐवजी   मतदान केंद्र क्र. 16 ते 17 - कुबा उर्दु प्राथमिक शाळा नुर

सैनिकी मुलांच्या वसतीगृहात अधिक्षक पदाकरीता ८ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले

अकोला , दि. ३० (जिमाका)-: शहरातील माजी सैनिकी मुलांच्या वसतीगृहात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रति माह रूपये २९ हजार ८३५ मानधन तत्वावर निव्वळ कंत्राटी पध्दतीने वसतीगृह अधिक्षक पदावर भरतीसाठी   येत्या ८ डिसेंबरपर्यंत आवेदन मागविण्यात येत असल्याचे माजी सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.           वसतीगृह अधिक्षकपदासाठी माजी सैनिक प्रवर्गातून संरक्षण सेवेतील सैन्य दलातील जे.सी.ओ. सुभेदार पदावरील किंवा   त्या पदाच्या समकक्ष नौदल/ वायुदलातील जे.सी.ओ.   अर्ज करू शकतात. वसतीगृह अधिक्षक हे एकच पद भरती करायचे असून यासाठी ६० वर्ष वयाची अट आहे. या पदासाठी   इयत्ता दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता असून   उमेदवार एम.एस.सी.आय.टी   ही संगणक परीक्षा उत्तीर्ण असावा.             दिनांक ८ डिसेंबर २०२२ पर्यंत इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.                                                                         ००००    

समता पर्व;मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात आत्म संरक्षणाचे धडे

इमेज
         अकोला , दि. ३० (जिमाका)-: समतापर्वांतर्गत येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात आत्म संरक्षणासाठी कराटे, बॉक्सींग प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला.                     २६ नोव्हेंबर संविधान दिन आणि ६ डिसेंबर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणदिना दरम्यान राज्यात ‘ समता पर्व ’ साजरे होत आहे. अकोला जिल्ह्यातही समता पर्वा निमित्ताने विविध आयोजन करण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात आत्म संरक्षणासाठी   कराटे, बॉक्सींगचे   प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. क्रीडा परिक्षक सपना विरघट आणि स्वाती टेकाडे यांनी वसतीगृहाच्या विद्यार्थीनींना कराटे , बॉक्सींगचे प्रात्यक्षिके करून घेतली व मार्गदर्शन केले.                                                                         ०००००

आजपासून ‘जिल्हा स्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव’ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

इमेज
अकोला , दि. ३० (जिमाका)-: अकोला जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील निराधार मुलांसाठी आजपासून (१ डिसेंबर) येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर   जिल्हा स्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.                 अकोला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि बाल कल्याण समितीच्यावतीने जिल्हा स्तरावरील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत अकोला जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थांम धील पुनर्वसनासाठी दाखल असलेल्या निराधार,उन्मार्गी,एकल पालक व कोवीड   महामारीमध्ये अनाथ झालेल्या मुलां मधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व   त्यांच्यात सांघिक निर्माण होण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय ‘चाचा नेहरू बाल महोत्सवा’चे आयोजन करण्यात येत आहे.              डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर सकाळी १०.३० वा. आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटन   समारंभास जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,   महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. संज

समता पर्व; अकोट येथे जात वैधता प्रमाणपत्र माहिती शिबिर

इमेज
अकोला , दि. 29 (जिमाका)-: विज्ञान शाखेच्या ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थांना जात वैधता उपक्रम , जात वैधता प्रमाणपत्र मिळव ण्या साठी आवश्यक कागदप त्रांसह संपूर्ण प्रक्रि येची माहिती   होण्‍यासाठी आज अकोट येथील   श्री. शिवाजी   कनिष्ठ महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र माहिती शिबिराचे आयोजन करण्यात आले.             २६ नोव्हेंबर संविधान दिन आणि ६ डिसेंबर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणदि ना दरम्यान राज्यात समता पर्व साजरे होत आहे. या पर्वाचा एक भाग म्हणून समाज कल्याण आयुक्तालय , पुणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी , पुणे यांच्या निर्देशा नुसार तसेच अकोला येथील संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यां च्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यातील ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांना ‘ मंडणगड पॅटर्न ’ नुसार जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यासाठी अकोला जिल्ह्यात तालुकास्तरीय जात वैधता प्रमाणपत्र माहिती शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत अकोट येथे या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.        प्राचार्य स

कोविडःआरटीपीसीआर चाचण्यात ‘एक’ पॉझिटिव्ह; दोन डिस्चार्ज

अकोला दि.29 ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 54   अहवाल प्राप्त झाले.   त्यापैकी एकाचा अहवाल   पॉझिटीव्ह आला. तर दोन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला , असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह - आरटीपीसीआर(शा.वै.म. 1 व खाजगी 0 )1+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   0= एकूण पॉझिटीव्ह 1 . आरटीपीसीआर ‘एक’ पॉझिटिव्ह आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका पुरषाचा समावेश असून हा रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. दोन डिस्चार्ज आज दिवसभरात दोन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. सक्रिय रुग्ण ‘ 36’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या   660 68 (49935+15142+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 36    सक्रिय रुग्ण आहेत ,   अशी माहिती    जिल्हा रुग्ण

समता पर्व;पत्रकारांसाठी कार्यशाळा सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांचे योगदान मोलाचे-निवासी उपजिल्हाधिकारी खडसे

इमेज
अकोला , दि. २९ (जिमाका)- सामाजिक न्याय विभागाव्दारे राबविल्या जाणाऱ्या योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी आज पत्रकार कार्यशाळेत केले. सामाजिक न्याय विभागामार्फत दि.26 नोव्हेंबर ते दि.6 डिसेंबर या कालावधीत आयोजित समता पर्वानिमित्त आज पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड, समाज कल्याण विभागाचे अधीक्षक आर.एस.ठाकरे,वरीष्ठ समाज कल्याण निरिक्षक प्रदीप सुसतकर, उमा जोशी, जिल्हापरिषदचे समाजकल्याण निरिक्षक रुपेश हाडोळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, जात पडताळणी समितीचे विशाल राठोड, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी सिद्धार्थ शर्मा, श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अजय डांगे तसेच दैनिक, साप्ताहिक व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळेच्या प्रारंभी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण

संविधान दिनः मुलींच्या शासकीय वसतीगृहात निबंध, वक्तृत्व स्पर्धा

अकोला , दि. २९ (जिमाका)- मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह अकोला येथे   सामाजिक न्याय विभागामार्फत संविधान दिनानिमित्त   उद्देशिकेचे सामुहिक वाचन, तसेच वसतीगृहातील विद्यार्थिनींसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच आहार विषयक मार्गदर्शन व मानसिक स्वास्थ विषयक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांना डॉ. जगदीश खंदेतोड,   अशोक जाधव. समतादूत वैशाली गवई, वसतीगृहातील कर्मचारी आदी उपस्थित होते. ०००००

कोविड लसीकरणःउत्कृष्ट कार्य करणाऱ्या ‘आशा’ सेविका सन्मानित; चित्रकला व प्रश्‍न मंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

इमेज
  अकोला , दि. २९ (जिमाका)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने कोविड-१९ लसीकरणाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कोविड लसीकरणाच्या जनजागृतीचा भाग म्हणून जिल्ह्यातील उर्दु शाळांमध्ये  घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आज पारितोषिक वितरण करुन गौरविण्यात आले.  यावेळी सहभागी शाळांमधील प्रथम तीन विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले,  जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी  डॉ. विनोद करंजीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिष शर्मा या मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते आशा सेविका व विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी  सचिन उजवणे, उमेश ताठे, वाय आरजी केअर या संस्थेचे जिल्हा प्रकल्प समन्वयक मोहसिन मणीयार, रविकुमार मांजरे, समाधान क्षीरसागर, मिना इंगळे, विनोद सरदार यांनी परिश्रम घेतले. ०००००

कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’ पॉझिटिव्ह; तीन डिस्चार्ज

अकोला दि.28 ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 11   अहवाल प्राप्त झाले.   त्यापैकी कोणाचाही अहवाल   पॉझिटीव्ह आला नाही. तर तीन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला , असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह - आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0 ) 0 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   0= एकूण पॉझिटीव्ह 0 . आरटीपीसीआर ‘निरंक’ पॉझिटिव्ह आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. तीन डिस्चार्ज आज दिवसभरात तीन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. सक्रिय रुग्ण ‘ 37’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या   660 67 (49934+15142+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 37    सक्रिय रुग्ण आहेत ,   अशी माहिती    जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आह

शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धा; विजयी शाळा संघाचा निकाल जाहीर

इमेज
अकोला , दि.2 8 (जिमाका)-:   अकोला   जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्याल या च्या संयुक्त    विद्यमाने मनपा क्षेत्रातील   14   ते   19   वयोगटातील मुला-मुलींसाठी     आयोजित   जिल्हास्त रीय   शालेय मल्लखांब क्रीडा स्प र्धांचे निकाल जाहीर करण्यात आले.           येथील वसंत देसाई स्टेडियमवर   दि.   24   ते   25   नोव्हेंबर   दरम्यान या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.   या स्पर्धेत प्राविण्यप्राप्त मनपा व जिल्हा क्षेत्रातील विजेत्यांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आ ले असून विजेता खेडाळू याप्रमाणे : 14 वर्ष   आतील मुली   (मनपा) प्रथम- स्वरा आशिष   गुल्हाने, व्दितीय-प्रशांत सचिन दुबे, तृतीय- कृपा ललित सायानी, चतुर्थ- कनक राकेश अग्रवाल हे सर्व विद्यार्थी कोठारी कॉन्व्हेट, अकोला शाळेतील आहे.   17 वर्षा आतील मुली (मनपा) प्रथम- चार्वी   दिनेश कनोजीया(कोठारी कॉन्व्हेट, अकोला), व्दितीय- गार्गी सतीश महल्ले (कोठारी कॉन्व्हेट, अकोला), तृतीय- मानसी अजय माझोडकर(इंदिरा देवी मोहनलाल खंडेलवाल स्कुल, अकोला),   चतुर्थ- वैष्णवी अशेाक सपकाळ   (इंदिरा देवी मोहनलाल खंडेलवाल स्कुल, अकोला)