पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

३१ अहवाल प्राप्तः३० निगेटीव्ह तर एक पॉझिटीव्ह; तिघांना घरी सोडले

इमेज
अकोला , दि . ३० ( जिमाका )- आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे ३१  अहवाल प्राप्त झाले . त्यातील ३० अहवाल निगेटीव्ह आले आहेत . तर बैदपूरा येथील फतेह चौक भागातील एका ६१ वर्षीय व्यक्तीचा पॉझिटीव्ह अहवाल आला आहे. दरम्यान बैदपूरा येथील तीन रुग्णांना पुर्ण बरे झाल्यानंतर आज घरी सोडण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ६८२ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६४८ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ६२० अहवाल निगेटीव्ह २८ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व   ३४ अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत एकूण ६८२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५३४, फेरतपासणीचे ८७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ६१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६४८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५०० तर फेरतपासणीचे ८७ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ६१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६२० आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २८   आहेत. आज प्राप्त झालेल्या ३१ अहवालात ३० अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर एक अहव

चार लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत खरीपाच्या नियोजनास मान्यता

इमेज
अकोला , दि . ३० ( जिमाका )- जिल्ह्यात एकूण चार लाख ८२ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.  त्यात सर्वाधिक  क्षेत्रावर कापूस व सोयाबीन  प्रत्येकी एक लाख ६० हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. तसेच बियाणे उपलब्धता, खते, किटकनाशके यांच्या आवंटनांची उपलब्धता याबाबतच्या नियोजनासाह खरीप हंगाम २०२०चे नियोजनास आज राज्याचे   जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण , महिला व बालविकास , इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक   मागास प्रवर्ग , विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण , कामगार राज्यमंत्री   तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन भवनातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शारीरिक अंतर राखत ही सभा पार पडली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई   भोजने, विधानपरिषद सदस्य आ. डॉ. रणजित पाटील, आ. गोपिकिशन बाजोरिया,आ. गोवर्धन शर्मा, आ. नितीन देशमुख, आ. रणधीर सावरकर आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच जिल्

बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांच्या तपासणीचे नियोजन करा-पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

इमेज
अकोला , दि . ३० ( जिमाका )- कोरोना संसर्गामुळे लॉक डाऊन कालावधीत अन्यत्र अडकलेल्या लोकांना आता त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था करण्याबाबत दिशानिर्देश आले आहेत. तथापि, हे लोक आपापल्या गावी परतल्यानंतर त्यांच्या पोहोचण्याची, आरोग्य तपासणी, अलगीकरण आदी व्यवस्थांचे परिपूर्ण नियोजन करा, असे निर्देश राज्याचे   जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण , महिला व बालविकास , इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक   मागास प्रवर्ग , विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण , कामगार राज्यमंत्री   तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. येथील जिल्हा नियोजन सभागृहात आज कोरोना विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा आज पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी घेतला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई   भोजने, विधानपरिषद सदस्य आ. डॉ. रणजित पाटील, आ. गोपिकिशन बाजोरिया,आ. गोवर्धन शर्मा, आ. नितीन देशमुख, आ. रणधीर सावरकर आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधि

सर्दी-खोकला, तापासाठी औषध घेतांना दुकानदाराला माहिती द्यावी: अन्न औषध प्रशासन विभागाचे आवाहन

अकोला , दि . ३० ( जिमाका )- कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी  अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या संसर्गाचा शोध घेण्यासाठी  व वेळीच उपचार करता यावे यासाठी  जिल्ह्यातील सर्व मेडीकल दुकानदारांनी  त्यांच्याकडे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांसाठी औषधे घेणाऱ्या ग्राहकांनी दुकानदारांना माहिती देणे आवश्यक आहे. त्याकरीता ग्राहकांनी आपला संपर्क क्रमांक, पत्ता मेडीकल दुकानदाराकडे नोंदवावा. अशा नोंदींचा दररोजचा अहवाल मेडीकल दुकानदारांकडून दररोज प्रशासनाकडे मागविण्यात येतो. तरी नागरिकांनी याबाबत मेडीकल दुकानचालकास आपली माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहा. आयुक्त औषधे हे. य. मेतकर यांनी केले आहे.

पालकमंत्री ना. बच्चू कडू शुक्रवारी (दि.१ मे) फेसबुक लाईव्हद्वारे जिल्ह्यातील जनतेशी साधणार संवाद

अकोला , दि . ३० ( जिमाका )-   राज्याचे   जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण , महिला व बालविकास , इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक   मागास प्रवर्ग , विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण , कामगार राज्यमंत्री   तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शुक्रवार दि . १ मे रोजी सकाळी नऊ वाजता जिल्ह्यातील जनतेशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत . त्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय , अकोला यांचे फेसबुक पेजवर या https://www.facebook.com/dioakola/ लिंकवर जाऊन आपण हा संवाद ऐकू व पाहू शकाल , असे आवाहन जिल्हाप्रशासनातर्फे करण्यात आले आहे .

महाराष्ट्र दिनानिमित्त आज(दि.१ मे) जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण

अकोला , दि . ३० ( जिमाका )- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन  शुक्रवार दि. १ मे रोजी होणार आहे. यंदा कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी  महाराष्ट्र दिन सोहळा  अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.  त्यानुसार हा सोहळा  केवळ जिल्हाधिकारी कार्यालय , अकोला येथे शुक्रवार दि. १ मे रोजी सकाळी आठ वाजता राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण , महिला व बालविकास , इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक   मागास प्रवर्ग , विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण , कामगार राज्यमंत्री   तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू   यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास  केवळ पालकमंत्री,  जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद  यांनीच उपस्थित रहावे असे  निर्देश दिले असून जिल्ह्यातील सर्व विभागांचे मुख्यालय, उप विभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय  येथे कोठेही कार्यक्रम आयोजित करु नये,  मुख्यालयात आयोजित कार्यक्रमासही  अन्य अधिकारी- कर्मचारी यांनी उपस्थित राहू नये. जिल्हाधिकारी कार्यालय वगळता जिल्ह्यात अन्यत्र कोठेही 

प्रतिबंधित क्षेत्रातील मृत्युची माहिती कळविणे बंधनकारक

अकोला , दि . २ ९ ( जिमाका )- कोरोना विषाणू संसर्गित भागाला प्रतिबंधित करण्यात आले आहे. अशा या भागांमध्ये कुणाचाही कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याची माहिती प्रशासनाला कळविणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यातील   तथा शहरातील ज्या ज्या भागात   कोरोना बाधीत रुग्ण आढळले ते ते क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहेत. या क्षेत्रात कोणाही व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्या घटनेची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही माहिती महानगरपालिका हद्दीत मनपा यंत्रणेमार्फत, नगरपालिका हद्दीत तालुका यंत्रणेमार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास कळविणे बंधनकारक आहे. माहिती न देणाऱ्यांविरुद्ध   कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.

आणखी पाच नवे पॉझिटीव्ह; एका महिलेचा मृत्यू

अकोला , दि . २ ९ ( जिमाका )- आज सायंकाळी सात वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे ३५  अहवाल प्राप्त झाले . त्यातील ३० अहवाल निगेटीव्ह तर पाच अहवाल पॉझिटीव्ह आहेत आले. नव्याने पॉझिटीव्ह आढळेल्या पाच पॉझिटीव्ह रुग्णात एका मयत महिलेचा समावेश असून अन्य चार हे दीपक चौक परिसरातील   रहिवासी आहे. हे चौघे एकाच कुटूंबातील सदस्य आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ६४ ९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६२२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ५९५ अहवाल निगेटीव्ह २ ७ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व   ३ २ अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत एकूण ६४९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५२१ , फेरतपासणीचे ८ ७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ४१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६२२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४ ९६ तर फेरतपासणीचे ८५ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ४१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५ ९ ५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २ ७   आहेत. आज प्राप्त झालेल्या ३५ अहवालात ३

आजचे ३० अहवाल निगेटीव्ह

अकोला , दि . २ ९ ( जिमाका )-  आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ३०  अहवाल प्राप्त झाले.   ते ३० अहवाल निगेटीव्ह आले. त्यातील आठ अहवाल हे सिंधी कॅम्प मधील रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ६४ ९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६१७ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ५९५ अहवाल निगेटीव्ह २२ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व   ३ २ अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत एकूण ६४९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५२१ , फेरतपासणीचे ८ ७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ४१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६१ ७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४ ९१ तर फेरतपासणीचे ८५ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ४१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५ ९ ५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २२  आहेत. आज प्राप्त झालेल्या ३० अहवालात सर्व ३ ० अहवाल निगेटीव्ह आले आहेत . त्यात सिंधी कॅम्प मधील रुग्णाच्या संपर्कातील आठ जणांच्या अहवालाचाही समावेश

सीसीआयकडील कापूस खरेदी नोंदणीस १० मे पर्यंत मुदतवाढ

अकोला , दि . २ ९ ( जिमाका )-   सीसीआय कडील कापूस खरेदी साठी शेतकऱ्यांनी करावयाची नोंदणी करण्यासाठी  येत्या १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून  शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कापूस नोंदणी करुन  विक्री करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे यांनी केले आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्या कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व सचिवांना कळविले आहे की, लॉक डाऊनच्या काळात सुरु करण्यात आलेली कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. जिल्ह्यातील बाजार समितींच्या मागणीनुसार जिल्ह्यात सीसीआय या संस्थेमार्फत   कापूस खरेदी करण्यासाठी कापूस खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे.   यासंदर्भात महाप्रबंधक केंद्रीय कापूस निगम अकोला यांच्याशी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांनी चर्चा करुन सीसीआय कापूस खरेदी नोंदणी ही   गुरुवार दि.३० नंतरही सुरु ठेवण्यास सहमती दर्शविली आहे. त्यानुसार येत्या   रविवार दि.१० मे पर्यंत कापूस खरेदीसाठी नोंदणी करता येणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आगामी पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता आपल्याकडील काप

पालकमंत्री ना. बच्चू कडू शुक्रवारी (दि.१ मे) फेसबुक लाईव्हद्वारे जिल्ह्यातील जनतेशी साधणार संवाद

अकोला , दि . २ ९ ( जिमाका )-   राज्याचे   जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण , महिला व बालविकास , इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक   मागास प्रवर्ग , विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण , कामगार राज्यमंत्री   तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शुक्रवार दि. १ मे रोजी सकाळी नऊ वाजता जिल्ह्यातील जनतेशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, अकोला यांचे फेसबुक पेजवर या https://www.facebook.com/dioakola/ लिंकवर जाऊन आपण हा संवाद ऐकू व पाहू शकाल, असे आवाहन जिल्हाप्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ८२ हजार रुपये

अकोला , दि . २ ९ ( जिमाका )-   अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ८२ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला.  जिल्हा समन्वय व मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी यासाठी मदत निधी जमा करुन ८२ हजार रुपयांचा निधी जमा केला आणि तो धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी दिली.

सेवाकार्य करु इच्छिणाऱ्या डॉक्टर्सना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अ कोला , दि . २८ ( जिमाका )- कोरोना विषाणू  संसर्गाच्या पार्श्वभुमिवर जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य यंत्रणा  परिस्थितीचा मुकाबला करीत आहे. तथापि या कार्यात ज्या डॉक्टर्सना स्वतः हून सेवा कार्य म्हणुन मदत करावयाची असेल त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. त्यासाठी डॉक्टर्सनी आपली नावे जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडे द्यावीत. जेणे करुन त्यांच्या सेवेचा लाभ हा कोवीड उपचारासाठी करता येईल. बाहेरगावाहून आलेल्यांची माहिती तात्काळ कळवा सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर लॉकडाऊन असून जिल्ह्याच्या सिमाही बंद आहेत. तथापि आडमार्गाने कुणीही व्यक्ती बाहेरगावाहून वा अन्य शहरातून आपल्या गावात दाखल झाल्यास त्याबाबत तात्काळ ग्रामस्तरीय समितीने त्याची माहिती घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करावयाची असून त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावयाची आहे. याबाबत जर हेतू पुरस्कर माहिती दडवण्याच्या प्रयत्न झाल्यास ग्रामस्तरीय समितीस जबाबदार धरुन कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे.

परस्परांमधील अंतराबाबत दुकानदार ग्राहकांसाठी नियमावली- जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; भंग झाल्यास कारवाईचा इशारा

अ कोला , दि . २८ ( जिमाका )- कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर  लागू असलेल्या संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सुरु ठेवण्यास सुट देण्यात आली आहे.  तथापि या दुकानांमध्ये वस्तूंचे आदानप्रदान होतांना दोन व्यक्तींमधील परस्पर अंतराचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी  कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी परस्पर अंतर राखण्याबाबतच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश जारी करुन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार,  दुकानदार व ग्राहकांनी परस्परांमधील अंतर पाळणे अनिवार्य आहे.  हे अंतर न पाळणारे दुकानदार, ग्राहक, मालक  यांना किमान  एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल.  दोन वेळ दंडनिय कारवाई करुनही सुधारणा न झाल्यास  संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल.  दुकानात मालाची हाताळणी करणारे व्यक्ती, मालक, नोकर आदींनी मास्क व हॅण्ड ग्लोव्हज वापरणे आवश्यक आहे. दुकानदारांनी दुकानात सॅनिटायझर व अन्य साहित्य ग्राहकांना  हात धुण्यासाठी ठेवणे आवश्यक आहे. एका वेळी पाच व्यक्तीच दुकानासमोर राहतील व त्या व्यक्तींनीही परस्परांमधले अंतर र

आज प्राप्त ४५ अहवालांपैकी पाच ‘नवे पॉझिटीव्ह’

अकोला , दि . २८ ( जिमाका )-  आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ४५  अहवाल प्राप्त झाले.  त्यातले ३९ अहवाल निगेटीव्ह तर अन्य सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातील एक अहवाल हा फेरतपासणीचा असून उर्वरित पाचही जणांचे प्राथमिक अहवाल आहेत. आता पॉझिटीव्ह  अहवालांची संख्या २२ झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ५९९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ५८७ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ५६५ अहवाल निगेटीव्ह २२ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व   १२ अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत एकूण ५९९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४७३, फेरतपासणीचे ८५ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ४१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५८७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४६४ तर फेरतपासणीचे ८५ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३८ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५६५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २२   आहेत. आज प्राप्त झालेल्या ४५ अहवालात ३९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर