पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 'शिवार फेरी'चा शुभारंभ शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यासाठी कृषी विद्यापीठाने संशोधन व मार्गदर्शन करावे - केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

इमेज
  अकोला, दि. २९ : शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढण्यासाठी उत्पादनखर्चात घट, उत्पादनात वाढ व शेतमालाला भाव मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जागतिक बाजारपेठेचा वेध घेऊन पीक पद्धतीत बदल, शेतीत विकसित वाणाचा अवलंब व्हावा. यादृष्टीने संशोधन व सातत्यपूर्ण मार्गदर्शनासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.   डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे आजपासून १ ऑक्टोबरपर्यंत तीनदिवसीय शिवार फेरी व थेट पीक प्रात्यक्षिकांचे उद्घाटन श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री धनंजय मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, विप्लव बाजोरिया, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आदी उपस्थित होते. सर्वप्रथम मंत्री श्री.  गडकरी यांनी शिवार पाहणी व विविध पीक प्रात्यक्षिकांचे अवलोकन करून तज्ज्ञांकडून विविध पिकांवरील संशोधनाची माहिती घेतली. केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात चार मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात चार मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित अकोला, दि. 28 : विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रमात अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील 347 मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली. त्यात मतदारांची संख्या वाढल्याने चार मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली. विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात नविन मतदार नोंदणी सुरु असून, त्यात विशेष शिबिरे आयोजित करण्‍यात येत आहेत. मतदारसंघातील 347 मतदान केंद्रांच्या पाहणीअंती दीड हजारांहून अधिक मतदार असलेल्या केंद्रांचे दोन भाग करण्याचा प्रस्ताव करण्यात आला. त्यानुसार चार केंद्रे नव्याने निर्माण करणे प्रस्तावित आहे.             त्यात भौरद येथील मांगीलाल शर्मा विद्यालय खोली क्र 4 या मतदान केंद्र क्र. 234 मधील मतदार संख्‍या दीड हजारांवर जाण्‍याची शक्‍यता लक्षात घेऊन केंद्राचे विभाजन करुन 234 व 235 ही नवी केंद्रे प्रस्तावित आहेत. मांगीलाल शर्मा कनिष्ठ महाविद्यालय खोली क्र 1 या केंद्र क्र. 236 मधील मतदार संख्‍या वाढल्याने क्र. 237  व 238 ही केंद्रे प्रस्तावित आहेत. मांगीलाल शर्मा कनिष्ठ

महाआरोग्य मेळाव्याच्या पूर्वतयारीला वेग

  महाआरोग्य मेळाव्याच्या पूर्वतयारीला वेग अकोला, दि. 28 : जिल्ह्यात नियोजित महाआरोग्य मेळाव्याच्या पूर्वतयारीला आरोग्य प्रशासनाकडून वेग देण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी आज विविध विभागप्रमुख, डॉक्टर, अधिकारी व कर्मचा-यांची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय येथे दि. 7 व 8 ऑक्टोबर रोजी दोनदिवसीय महाआरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. 7 ऑक्टोबर रोजी मेळाव्याचा शुभारंभ होईल. महाआरोग्य मेळाव्यात विविध प्रकारच्या आजारांबाबत तपासणी, निदान करण्यासाठी 15 हून अधिक कक्ष समाविष्ट असतील. आवश्यक तपासण्या व निदानानंतर संबंधितांना योग्य उपचारही मिळवून देण्यात येणार आहेत. महाआरोग्य मेळाव्याची माहिती विविध माध्यमांतून सर्वदूर पोहोचवावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय याबरोबरच इंडियन मेडिकल असोसिएशन व विविध आरोग्य संस्थांचे सहकार्य या मेळाव्याला लाभले आहे, असे डॉ. वारे यांनी

श्वान पाळणा-यांनी श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण करून घ्यावे जागतिक रेबीज दिनानिमित्त डॉ. बुकतारे यांचे आवाहन

श्वान पाळणा-यांनी श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण करून घ्यावे जागतिक रेबीज दिनानिमित्त डॉ. बुकतारे यांचे आवाहन   अकोला, दि. 28 : रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी 36 टक्के मृत्यू एकट्या भारतात होतात. भारतात 95 टक्के प्रकरणात माणसांना रेबीज होण्यामागे कुत्रा कारणीभूत आहे. त्यामुळे कुत्रा पाळणा-या कुटुंबांनी श्वानांमधील अँटी रेबीज लसीकरण पूर्ण करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी आज येथे केले.      जागतिक रेबीज दिवसानिमित्त माहिती देताना ते म्हणाले की,   रेबीज पशुसंक्रमित मानवी आजार असून जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार , कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. जगभरात दरवर्षी 59 हजारपेक्षा जास्त लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात. आशिया आणि अफ्रिकेत रेबीजचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतात 95 टक्के प्रकरणात कुत्र्यामुळे , 2 टक्के प्रकरणात मांजर आणि 1 टक्के प्रकरणात कोल्हा किंवा मूंगूसामुळे रेबीज पसरतो. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी श्वानांमधील अॅन्टी रेबीज लसीकरण प्रभाव

मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रकिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रकिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अकोला, दि. 27: मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया या राज्यपुरस्कृत योजनेत प्रकल्प उभारणीसाठी प्रकल्प किमतीच्या 30 टक्के अर्थसाह्य मिळते. जास्तीत जास्त शेतकरी, महिला व तरूण उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.   अन्नधान्य प्रक्रिया ,  कडधान्य प्रक्रिया ,  फळ प्रक्रिया ,  भाजीपाला प्रक्रिया ,  बेकरी ,  बेदाणा निर्मिती ,  मसाले उत्पादने ,  राईस मिल ,  काजु प्रक्रिया ,  गुळ उत्पादन ,  तेलबिया प्रक्रिया आदी प्रकारच्या 645 कोटी रू. च्या 148 प्रकल्पांना राज्यस्तरीय बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांना प्रकल्प उभारणीनंतर प्रत्येकी पात्र प्रकल्प किमतीच्या ३०   टक्के किंवा  जास्तीत जास्त                50 लक्ष रू. अर्थसहाय्य देण्यात येणार आहे . राज्यातील कृषि व अन्नप्रक्रिया उद्योगांचे उभारणीस चालना देऊन     शेतकरी बांधवांना मूल्यवर्धनाद्वारे जास्तीचे उत्पन्न मिळून देण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना व मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ जास्तीत जास्त श

जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त रविवारी कार्यक्रम

  जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त रविवारी कार्यक्रम अकोला, दि. 27 : समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयातर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रम दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शिवापूर येथील मातोश्री वृध्दाश्रमात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त एम. डब्ल्यू. मुन यांनी केले आहे.    ०००

जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवारी होणार

  जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवारी होणार अकोला, दि. 27 : जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी दु. 3 वाजता लोकशाही सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांनी प्रलंबित तक्रारींच्या अनुपालन अहवालासह उपस्थित राहावे, असे निर्देश विविध विभागांना देण्यात आले आहेत. ०००

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना

  अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी   मार्जिन   मनी   योजना   अकोला, दि. 27 : केंद्र शासनाच्या ‘स्टॅन्ड अप इंडिया’ उपक्रमांतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी   मार्जिन   मनी   योजना सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त मंगला मून यांनी केले आहे. नवउद्योजकांची   मार्जिन   मनी   भरण् याची क्षमता नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थ्यांना एकूण उद्योग प्रकल्पाच्या 25 टक्के स्वहिस्स्यातील जास्तीत जास्त 15 टक्के   मार्जिन   मनी   शासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेत राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांना 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के रक्कम शासनामार्फत देण्यात येते.  योजनेचा शासन निर्णय   www.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.              या योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करुन

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी पोलीस लॉन येथे दि. 3 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय कार्यक्रम

  दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी पोलीस लॉन येथे दि. 3 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय कार्यक्रम अकोला, दि. 26 : विविध प्रवर्गातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दु. 4 वा. दरम्यान पोलीस लॉन येथे आयोजित करण्यात आला आहे. शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी निपटारा करण्यात येणार आहे. अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.     कार्यक्रमात विविध विभागांचे कक्ष उपलब्ध राहतील. का र्यक्रमाच्या दिवशी प्रातिनिधिक स्वरुपात दिव्यांग लाभार्थ्यांना लाभाचे वितरण केले जाईल. आवश्यक दाखले, कागदपत्रे विविध कक्षांद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील.   लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच कक्षांच्या माध्यमातून अनेक योजनांची माहितीही देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी आवश्यक मनुष्यबळ, वाहन व्यवस्था,

अद्ययावत शेती तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविणार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे तीन दिवसीय शिवार फेरी - कुलगुरू डॉ. शरद गडाख

  अद्ययावत शेती तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविणार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे तीन दिवसीय शिवार फेरी -          कुलगुरू डॉ. शरद गडाख अकोला, दि. 26 : अद्ययावत शेती तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे दि. 29, 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर रोजी तीनदिवसीय शिवार फेरी व थेट पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.   केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दि. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.कृषी मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती धनंजय मुंडे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. विविध लोकप्रतिनिधी, विद्यापीठांचे कुलगुरू, कार्यकारी परिषद सदस्य आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. थेट पीक प्रात्यक्षिके हे शिवारफेरीचे वैशिष्ट्य असून एकूण 20 एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी प्रत्येकी एक गुंठा क्षेत्रावर विविध पीकांची एकूण २२५

अवेळी पावसामुळे नुकसानग्रस्तांसाठी मदत निधीला मान्यता

  अवेळी पावसामुळे नुकसानग्रस्तांसाठी मदत निधीला मान्यता   अकोला, दि. 26 : अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठीचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय महसूल विभागाने सोमवारी निर्गमित केला. विविध जिल्ह्यांत मार्च, एप्रिल व मे या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले. शेतीपिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास 2 हेक्टर मर्यादेत निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. त्यानुसार अकोला जिल्ह्यात मार्च- एप्रिल या कालावधीतील अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी मदत निधी देण्यात येणार आहे. त्यानुसार 430.12 हे. बाधित क्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील 595 नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना एकूण 78.35 लक्ष रू. वितरित करण्यात येणार आहे. ०००  

श्री गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने दंडाधिका-यांच्या नियुक्त्या

  श्री गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने दंडाधिका-यांच्या नियुक्त्या अकोला, दि. 26 :  शहरातील श्री गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी  कार्यकारी दंडाधिकारी व कर्मचा-यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केला. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वा. नेमून दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे व शेवटची मिरवणूक संपेपर्यंत ठिकाण सोडू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. जयहिंद चौक, दगडी पूल, मामा बेकरी, माळीपुरा चौक, अकोट स्टँड चौक, तेलीपुरा चौक, कमेटी हॉल, ताजनापेठ, कोठडी बाजार, सिटी कोतवाली, गांधी चौक, जैन चौक आदी शहरातील विविध परिसरात प्रत्येकी पाच सदस्यांचा समावेश असलेली 6 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री यांच्यासह विविध अधिका-यांवर संनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी सो

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर अकोला, दि. 26 : पुढील वर्षात मुदत संपणा-या व नव्याने स्थापित होणा-या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तालुका व ग्रा. पं. स्तरावर ठळक प्रसिद्धी करावी व टप्पेनिहाय अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिका-यांना दिले आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणा-या व नव्याने स्थापित ग्रा. पं. निवडणुकांसाठी हा कार्यक्रम अंमलात येत आहे. कार्यक्रमानुसार, तहसीलदारांनी गुगल अर्थचे नकाशे सुपरइंपोज करून प्रत्येक गावाचे नकाशे दि. 6 ऑक्टोबरपर्यंत अंतिम करण्याचे आदेश आहेत. तलाठी व ग्रामसेवकांना दि. 16 ऑक्टोबरपूर्वी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग सीमा निश्चित करण्याचे आदेश आहेत. त्यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी यांचा समावेश असलेली समिती प्रभाग रचनेची तपासणी करेल. रचनेचा प्रस्ताव दि. 3 नोव्हेंबरपूर्वी उपविभागीय अधिका-यांमार्फत जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात येईल

पुढील ३ दिवस पावसाची शक्यता

अकोला, दि. २५ : नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने आजपासून दि. २८ सप्टेंबरपर्यंत अकोला जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. वीज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्‍यात यावा. अशास्थितीत झाडाखाली आश्रय घेउु नये. पुरस्थितीत पुलावरुन पाणी वाहत असतांना पुल/रस्‍ता ओलांडु नये. नदी-नाला काठावर सेल्‍फी काढण्‍याचा मोह करु नये. पुरस्थितीत उंच ठिकाणी आश्रय घ्‍यावा, अशी सूचना नदीकाठच्या गावांना देण्यात आली आहे.                                                                                             ०००

खरेदी प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांचे आज प्रशिक्षण

अकोला, दि. २५ : कार्यालयीन खरेदीसाठी सोपी प्रक्रिया पार पाडण्यासाठी 'जेम' पोर्टलबाबत सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण उद्या दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत नियोजनभवन येथे आयोजित करण्यात आले आहे.

गोरेगावमधील एका जनावरात लंपी प्रादुर्भाव आढळला

अकोला, दि. 25 :  मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव या गावातील एका बैलात लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळल्याने तेथील संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे. बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. संसर्ग केंद्राच्या ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण १०० टक्के पूर्ण यावे, असे आदेश   पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. ०००

सुधारीत :- गणेशोत्सवाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक विसर्जन मार्गावर आवश्यक सुविधा उभारा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
अकोला, दि. २१ :       गणेशविसर्जन मिरवणूका शांततेत पार पडण्यासाठी पुरेसा बंदोबस्त व भाविकांना आवश्यक सुविधा उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने     बैठक नियोजनभवनात जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधिक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक     अभय खंडारे, सार्वजनिक गणेशोत्सव अध्यक्ष मोतिसिंह मोहता, महासचिव सिध्दार्थ शर्मा, महानगरपालीका   उपायुक्त प्रशासन गीता वंजारी शहर अभियंता नीला वंजारी विविध गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, महावितरण तसेच आरोग्य विभाग यांच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. विसर्जन मार्गावर पुरेसा बंदोबस्त असावा. रस्त्यावर खड्डे असल्यास तत्काळ दुरूस्ती करावी. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मार्गावर नागरिकांना आवश्यक पेयजल, स्वच्छतागृहे आदी सुविधा ठेवाव्यात. रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक पुरेश्या औषधसाठ्यासह उपलब्ध ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभा

गणेशोत्सवाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक विसर्जन मार्गावर आवश्यक सुविधा उभारा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. २१ :     गणेशविसर्जन मिरवणूका शांततेत पार पडण्यासाठी पुरेसा बंदोबस्त व भाविकांना आवश्यक सुविधा उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने    बैठक नियोजनभवनात जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधिक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक    अभय खंडारे, सार्वजनिक गणेशोत्सव अध्यक्ष मोतिसिंह मोहता, महासचिव सिध्दार्थ शर्मा, विविध गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, महावितरण तसेच आरोग्य विभाग यांच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. विसर्जन मार्गावर पुरेसा बंदोबस्त असावा. रस्त्यावर खड्डे असल्यास तत्काळ दुरूस्ती करावी. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मार्गावर नागरिकांना आवश्यक पेयजल, स्वच्छतागृहे आदी सुविधा ठेवाव्यात. रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक पुरेश्या औषधसाठ्यासह उपलब्ध ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी दिले. या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी 'महावितरण&

आयटीआय (मुलींची )अकोला येथे उत्साह आणि जल्लोषात संपन्न झाला ' कौशल्य दीक्षांत ' समारंभ.

अकोला दि.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( मुलींची) अकोला येथे कौशल्य दीक्षांत समारंभ अत्यंत उत्साह आणि जल्लोषात  संपन्न  झाला.  औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची )अकोलाचे  प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कौशल्य दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदाचा प्रदीर्घ अनुभव असलेले जेष्ठ प्राचार्य शरद झोडपे हे  उपस्थित होते. तद्वतच अकोला जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी  (माध्यमिक) डॉ.सुचिता पाटेकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी विचारपीठावर , गटनिदेशिका रेखा रोडगे, मुख्य लिपिक जयंत गनोजे उपस्थित होते. तसेच विविध व्यवसायातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान गुणवत्तेनुसार मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थींनीचे पालक  यावेळी विशेषत्वाने उपस्थित होते. दीक्षांत समारंभाचे प्रास्ताविक करीत असताना संस्थेच्या गटनिदेशिका रेखा रोडगे यांनी संस्थेच्या एकूणच वाटचालीचा आढावा याप्रसंगी सादर केला. दीक्षांत सोहळ्याला उपस्थित  सन्माननीय  अध्यक्ष आणि प्रमुख  अतिथी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला   सावित्री आई फुले तद्वतच  भगवान विश्वकर्मा यांच्या

*हिंगणा रोड येथील एका जनावरात लंपी प्रादुर्भाव आढळला*

  अकोला, दि. २० : येथील हिंगणा रोड परिसरातील एका नर वासरात लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळल्याने तेथील संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे. तसा आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी विजय पाटील यांनी आज निर्गमित केला. बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. संसर्ग केंद्राच्या ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण १०० टक्के पूर्ण यावे, असे आदेश पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. ०००  

प्रबोधनकार ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

इमेज
  प्रबोधनकार ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन   अकोला, दि.१८ : समाजसुधारक, पत्रकार, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. नायब तहसीलदार शिव हरी ठोंबे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पूष्पहार अर्पण केला. यावेळी ज्योती नारगुंडे, योगेश इंगळे आदी उपस्थित होते. ०००

वैद्यकीय महाविद्यालयाला कार्डियाक रुग्णवाहिकेची देणगी

इमेज
        डॉ. शकुंत ला गोखले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वैद्यकीय महाविद्यालयाला कार्डियाक रुग्णवाहिकेची देणगी जिल्हाधिका-यांचे हस्ते रुग्णवाहिका सुपुर्द अकोला, दि. 18 : डॉ. शकुंतला गोखले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला कार्डियाक रुग्णवाहिकेची देणगी देण्यात आली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते आज रूग्णवाहिका महाविद्यालयाला सुपुर्द करण्यात आली. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी जिल्हाधिका-यांच्या हस्ते रूग्णवाहिकेचा स्वीकार केला. महाविद्यालयातील विभागप्रमुख, डॉक्टर, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयाला डॉ. शकुंतला गोखले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोलाची मदत मिळाली आहे. ही रुग्णवाहिका रुग्णसेवेच्या कार्यात उपयुक्त ठरणार आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यावेळी सांगितले.   हृदयरोगाशी संबंधित रुग्णाला ने-आण करण्यासाठी सर्व वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध असणारी कार्डियाकॲम्बुलन्स रुग्णालयाकडे असणे अत्यंत आवश्यक होते. ती प्राप्त झाल्याने रुग्णसेवेचा दर्जा निश्चित उंचावेल, असे डॉ. गजभिये यांनी सांगितले. आरोग्य

अमृत कलश यात्रेला खेडोपाडी उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
      अमृत   कलश   यात्रेला खेडोपाडी उत्स्फूर्त प्रतिसाद     अकोला, दि. 18 : स्वातंत्र्याच्या   अमृत   महोत्सवाच्या सांगतेनिमित्त 'मेरी माटी मेरा देश' उपक्रमांतर्गत अमृत   कलश   यात्रेला जिल्ह्यात विविध शहरांप्रमाणेच खेडोपाडीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्ध, महिलाभगिनी अत्यंत उत्साहात उपक्रमात सहभागी होत आहेत.   स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये, पंचायत समित्यांबरोबरच   महिला बचत गट, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांद्वारे ठिकठिकाणी वाजतगाजत अमृत कलश यात्रा काढण्यात येत आहेत. अकोला शहरात महापालिकेतर्फे विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. लाखपुरी येथे ग्रामपंचायत व नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी जाऊन माती गोळा करण्यात आली. जिल्ह्यात प्रत्येक घर, वॉर्ड आणि गावातून माती किंवा तांदूळ   कलशांमध्ये गोळा करण्यात येत आहे.   तालुका स्तरावर आणि पालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा यांच्या स्तरावर ही सर्व गोळा केलेली माती आणि तांदूळ एकत्र आणून मोठ्या   कलशामध्ये एकत्र करण्यात येतील. त्यानंतर तालुका पातळीवरचे हे   कलश   मुंबईत एकत्र आणण्यात येतील. वि