रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 1866 चाचण्यात 60 पॉझिटीव्ह
अकोला,दि.30 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी
जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.29) दिवसभरात झालेल्या 1866 चाचण्या झाल्या त्यात 60 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोट येथे 14 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर
येथे 17 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, पातूर येथे 27 चाचण्या झाल्या
त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा
येथे 54 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर
येथे 120 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला महानगरपालिका
येथे 1519 चाचण्या झाल्या त्यात 15
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला
आयएमए येथे 10 चाचण्या झाल्या त्यात दोंघाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 43 चाचण्या झाल्या त्यात चार
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, हेगडेवार
लॅब येथे 46 चाचण्या झाल्या त्यात 19 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर आरोग्य
कर्मचाऱ्यांचे 16 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1866
जणांच्या चाचण्या होऊन त्यात 60 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 52 हजार 963 चाचण्या झाल्या पैकी 13672 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा