बालकांमध्ये कोविड प्रतिबंधासाठी बालरोग तज्ज्ञांचे कार्यदल स्थापन

             अकोला,दि.28 (जिमाका)- लहान बालकांमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावापासून बचाव, प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचे विशेष कार्यदल (टास्क फोर्स) स्थापन करण्याचे आदेश  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले असून या कार्यदलात 18 तज्ज्ञांचा समावेश आहे.           

 या कार्यदलाचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे असून अन्य सदस्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, बाल रोगतज्ञ अकोला अॅकेडमी ऑफ पेडीयाट्रीक तथा सदस्य सचिव डॉ.विनीत वरठे, डॉ. मनोज ठोकळ, डॉ.अनुप जोशी, डॉ.अंजली सोनोने, डॉ.एस.एस.काळे, डॉ.नरेंद्र राठी, डॉ.अनुप कोठारी, डॉ.नरेश बजाज, डॉ.विजय आहुजा, डॉ.पार्थसारथी शुक्‍ला, डॉ.किशोर ढोले, डॉ.अभिजीत नालट, डॉ.आशुतोष पालडीवाल, डॉ.शिरीष देशमुख, डॉ.विशाल काळे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

            गठीत करण्‍यात आलेल्‍या टास्‍क फोर्स समितीने कोविड संसर्गजन्‍य आजारावर आळा घालणे बाबत आवश्‍यक त्‍या प्रतिबंधात्‍मक  उपाययोजना कराव्‍यात. या रोगाने ग्रस्‍त, गंभीर व अतिगंभीर रुग्‍णांच्‍या बाबतीत रुग्‍ण व्‍यवस्‍थापन संहिता, योग्‍य औधोपचार, कोविड रुग्‍णालयात विशेषज्ञ डॉक्‍टर व पॅरामेडीकल स्‍टाफ यांची आवश्‍यकता इत्‍यादी सुनिश्चित करण्‍याकरीता स्‍थानिक प्रशासनाच्‍या मदतीने त्‍यांची अंमलबजावणी करण्‍यात यावी. तसेच प्रमुख बाल रोगतज्ञ तथा सदस्‍य सचिव यांनी गठीत करण्‍यात आलेल्‍या टास्‍कफोर्सची वेळोवेळी बैठक घेणे तसेच सर्व संबंधिताशी समन्‍वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे या आदेशात नमूद करण्यात  आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :