नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून गहू खरेदीस प्रारंभ
अकोला, दि.७ (जिमाका)- हंगाम २०२१-२२ मज्ञे राज्यात विकेंद्रीत खरेदी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडील गव्हाची ऑनलाईन नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांकडील गहू खरेदीस दि. १ मे पासून जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. दि.३० जून पर्यंत ही खरेदी सुरु राहिल असे जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी कळविले आहे. ज्या शेतकऱ्यांना गहू खरेदीसाठी खरेदी केंद्रावर आणावयाचा असेल त्यांनी मालाची चाळणी करुन आणावा, १४ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता असता कामा नये, माल पूर्णपणे सुकवून आणावा, एफएक्यु दर्जाचा माल असावा, एफएक्यू दर्जाच्या गव्हाचा भाव १९७५ रुपये प्रतिक्विंटल आहे. माल खरेदीसाठी आणतांना सातबारा उतारा तसेच आधार ओळखपत्र तसेच बॅंक पासबुकाची झेरॉक्सप्रत आणावी,असेही जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा