1829 अहवाल प्राप्त, 195 पॉझिटीव्ह, 430 डिस्चार्ज, नऊ मृत्यू
अकोला,दि.28(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1829
अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1624 अहवाल निगेटीव्ह तर 195 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. दरम्यान 430 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नऊ जणांचा उपचारा दरम्यान
मृत्यू झाला, असे जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.27) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 75 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 55062(41400+13485+177)
झाली आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 195 +
रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 75= एकूण पॉझिटीव्ह- 270.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 263578 नमुने तपासण्यात आले.
त्यात प्राथमिक तपासणीचे 260532 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2656 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 263503 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 222103 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
195 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 195 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्यात 82 महिला व 113 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-38, अकोट-27, बाळापूर-16, बार्शीटाकळी-
सहा, पातूर-नऊ, तेल्हारा-31 अकोला-68.
(अकोला ग्रामीण-14, अकोला मनपा क्षेत्र-54), दरम्यान काल
(दि.27) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात
75 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात
आला आहे, याची
नोंद घ्यावी.
430 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 10, युनिक हॉस्पीटल येथील चार,
अकोला ॲक्सीडेंट येथील एक, ठाकरे हॉस्पीटल
येथील दोन, इनफिनीटी हॉस्पीटल येथील एक, गोयंका गर्ल्स हास्टेल दोन, पीकेव्ही जॅम्बो
हॉस्पीटल येथील नऊ, थोटे हॉस्पीटल येथील पाच, हॉटेल इंद्रप्रस्त येथील एक,
ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल
रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, आधार हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक,
अवघाते हॉस्पीटल येथील दोन, काळे हॉस्पीटल
येथील एक, केअर हॉस्पीटल येथील चार, भैस्कार
हॉस्पीटल येथील एक, लोटस हॉस्पीटल येथील पाच, तर होम आयसोलेशन मधील 380 असे एकूण 430 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
नऊ जणांचा
मृत्यू
आज दिवसभरात नऊ जणांच्या मृत्यूची नोंद
झाली. त्यात,
बाळापूर येथील 58 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 22 रोजी दाखल झाले होते.
जिल्हा परिषद कॉलनी येथील 75 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 22 रोजी दाखल
केले होते.
मार्डी ता.अकोट येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 23 रोजी दाखल केले होते.
लहान उमरी येथील 75 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 22 रोजी दाखल केले होते.
तळेगाव पातुर्डा ता. तेल्हारा येथील 55 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26
रोजी दाखल केले होते.
कृषी नगर येथील 70 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले
होते.
मोठी उमरी येथील 80 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 27 रोजी दाखल केले
होते.
येरंडा ता.बार्शीटाकळी येथील 70 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 27
रोजी मृतावस्थेत दाखल केले होते.
अकोट येथील 65 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 25 रोजी दाखल केले होते,अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
5127 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 55062(41400+13485+177) आहे. त्यात 1056 मृत झाले आहेत. तर 48879 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5127 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा