886 अहवाल प्राप्त, 154 पॉझिटीव्ह, 574 डिस्चार्ज, 10 मृत्यू
अकोला,दि.27(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे 886 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 732 अहवाल निगेटीव्ह तर 154
जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 574 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 10
जणांचा उपचारा
दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.26) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 51 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 54792(41205+13410+177)
झाली आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी
दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 154 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 51= एकूण
पॉझिटीव्ह- 205.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 261698
नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 258657
फेरतपासणीचे 390 तर
वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2651 नमुने होते. आजपर्यंत एकूण 261674 अहवाल
प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 220469
आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
154 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 154 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्यात 75 महिला व 79 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-18, अकोट-56, बाळापूर-सहा, बार्शीटाकळी- सहा, पातूर-तीन, अकोला-65. (अकोला
ग्रामीण-21, अकोला मनपा
क्षेत्र-44), दरम्यान काल (दि.26) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या
अहवालात 51 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण
संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
574 जणांना
डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 27, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील तीन, अकोला
ॲक्सीडेंट येथील दोन, सुर्यचंद्र
हॉस्पीटल येथील दोन, देवसार
हॉस्पीटल येथील दोन, क्रिस्टल
हॉस्पीटल येथील पाच, यकीन
हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील चार, इनफिनीटी
हॉस्पीटल येथील तीन, गोयंका
गर्ल्स हास्टेल तीन, पीकेव्ही
जॅम्बो हॉस्पीटल येथील दोन, थोटे
हॉस्पीटल येथील तीन, समर्पण
हॉस्पीटल येथील एक, जिल्हा
स्त्री रुग्णालय येथील पाच, आयकॉन
हॉस्पीटल येथील सात, ओझोन
हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल
रिजेन्सी येथील पाच, बिहाडे
हॉस्पीटल येथील एक, आधार
हॉस्पीटल येथील एक, सहारा
हॉस्पीटल येथील एक, इंदिरा
हॉस्पीटल येथील दोन, फातेमा
हॉस्पीटल येथील एक, देशमुख
हॉस्पीटल येथील दोन, अर्थव
हॉस्पीटल येथील दोन, अवघाते
हॉस्पीटल येथील दोन, काळे
हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल
स्कायलार्क येथील सहा, भैस्कार
हॉस्पीटल येथील एक, तर
होम आयसोलेशन मधील 470 असे एकूण 574 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती
जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
10 जणांचा
मृत्यू
आज दिवसभरात 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात,
हिंगणा ता.पातूर येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 25 रोजी दाखल झाले होते.
खिरपुरी येथील 74 वर्षीय महिला असून या पुरुष दि. 25 रोजी दाखल केले होते.
मुर्तिजापूर येथील 52 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 25 रोजी दाखल केले होते.
गौलखेडी ता.मुर्तिजापूर येथील 80 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 18 रोजी दाखल केले होते.
अजनी ता.बार्शीटाकळी येथील 48 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 25 रोजी दाखल
केले होते.
पाथर्डी ता. तेल्हारा येथील 63 वर्षीय रुग्ण असून या रुग्णास दि. 22 रोजी दाखल
केले होते.
बाळापूर येथील 65 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 23 रोजी दाखल केले
होते.
दिनोडा ता.अकोट येथील 45 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल
केले होते.
सुकोडा येथील 80 वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. 25 रोजी दाखल केले
होते.
पातूर येथील 60 वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. 26 रोजी मृतावस्थेत दाखल
केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात
आली.
5296 जणांवर
उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 54792(41205+13410+177) आहे. त्यात 1047 मृत झाले आहेत. तर 48449 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5296 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा