जिल्ह्यातील २८ रुग्णालयांना ४९७ रेमडिसीविर इंजेक्शन्सचे वाटप

अकोला,दि.  (जिमाका)- जिल्ह्यातील २८ रुग्णालयांना ४९७ इंजेक्शन्सचे वाटप करण्यात  आले आहे.   वाटप करण्यात आलेल्या रेमडिसीविर इंजेक्शनस शासनाने निश्चित केलेल्या दराने वितरण करण्याचे आदेश संबंधित रुग्णालयांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

हॉटेल रिजेन्सी यांना २९, ओझोन हॉस्पिटल २२, सहारा हॉस्पिटल १४, बिहाडे हॉस्पिटल २४, इंदिरा हॉस्पिटल १८, आधार हॉस्पिटल सहा, नवजीवन मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल १७, देशमुख मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल १३, आयकॉन हॉस्पिटल ४४, स्कायलार्क हॉस्पिटल २०, हार्मोनी मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल १८, अवघाते हॉस्पिटल १२, देवसर हॉस्पिटल २०, यकीन मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल १७, सुर्यचंद्रा हॉस्पिटल नऊ, अकोल ॲक्सीडेंट हॉस्पिटल आठ, क्रिस्टल सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल सहा, युनिक हॉस्पिटल १६, ठाकरे हॉस्पिटल १६, के.एस. पाटील हॉस्पिटल २४, वोरा क्रिटीकल हॉस्पिटल २०, इनफिनीटी हेल्थ केअर ११,  आधार हॉस्पिटल ३६, बबन हॉस्पिटल सहा, उषाई हॉस्पिटल १५ व राजेंद्र सोनोने हॉस्पिटल २०, केअर हॉस्पिटल  २४,  काळे हॉस्पिटल १२ असे एकूण ४९७  रेमडिसीविर इंजेक्शनसचे वाटप करण्यात आले आहे.

रुग्णालयांना रेमडिसीवीर प्राप्त झाल्यानंतर रुग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्यानिशी  प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीनेच फोटो व ओळखपत्र घाऊक विक्रेताकडे सादर करुन औषधाचे वितरण मुदतीत व शासकीय दरात करावे. याबाबत कोणतेही सबब, दिरंगाई, टाळाटाळा व कसूर होणार नाही यांची दक्षता रुग्णालय  प्रशासन व घाऊक विक्रेतांनी घ्यावी.

कोरोना काळात फ्रंटलाईनवर काम करणारे (आरोग्यसेवा, महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस, महसूल, ग्रामविकास, नगरविकास, अन्न व औषध प्रशासन व परिवहनसह विविध आस्थापना इ.) अधिकारी व कर्मचाऱ्यांना रेमडिसीवीरचा १० टक्के कोटा राखीव ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध विभागाने दिले आहे. रुग्णालय निहाय वाटप करण्यात आलेले रेमडिसीवीर इंजेक्शनची यादी akola.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.  महानगरपालिका, जिल्हा परिषद, औषध व प्रशासन, संबंधित आरोग्य यंत्रणेचे आरोग्य अधिकारी यांनी रेमडिसीवीर औषधीचा योग्य वाटप होत असल्याची खातरजमा करुन अनियमीतता आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :