रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 1352 चाचण्यात 146 पॉझिटीव्ह



अकोला,दि.23 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.22) दिवसभरात झालेल्या 1352 चाचण्या झाल्या त्यात 146  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोट येथे 62 चाचण्या झाल्या त्यात 19 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर येथे 16 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  बार्शी टाकळी येथे 11 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. पातूर येथे 10 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे  130 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  मुर्तिजापूर येथे 221 चाचण्या झाल्या त्यात 27 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला महानगरपालिका येथे 708 चाचण्या झाल्या त्यात 30 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे सात चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 22 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 81 चाचण्या झाल्या त्यात 19 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 84 चाचण्या झाल्या त्यात 27 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. असे 1352 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 146  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 43 हजार 801 चाचण्या झाल्या पैकी 13130 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ