अकोला,दि.31 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात काल (दि.30) दिवसभरात
झालेल्या 2160 चाचण्या झाल्या त्यात 43 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला
येथे 90 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले, अकोट येथे 363 चाचण्या
झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 72 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला महानगरपालिका
येथे 1424 चाचण्या झाल्या त्यात 10
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 63 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले, हेगडेवार लॅब येथे 36 चाचण्या
झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर बाळापूर येथे 74, तेल्हारा येथे 23, अकोला आयएमए येथे दोन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 13 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 2160
जणांच्या चाचण्या होऊन त्यात 43 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 55 हजार 123 चाचण्या झाल्या पैकी 13715 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून
देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा