पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

इमेज
  अकोला दि.30 ( जिमाका)-   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज   यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात   निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अधीक्षक मिरा पागोरे तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.    

जागतिक पशुवैद्यकीय दिन बालकांमध्ये प्राणीप्रेमाविषयी संस्कार होणे गरजेचे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

                अकोला दि .30( जिमाका)-   लहान बालकांमध्ये प्राण्याविषयी आपुलकी निर्माण करण्यासाठी बाल अवस्थेपासूनच त्यांच्यावर संस्कार होणे आवश्यक आहे.   याकरीता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जागतिक पुशुवैद्यक दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात केले.             पशुसंवर्धन विभाग व प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, जिल्हा परिषदचे पशुसंवर्धन समितीचे सभापती पंजाबराव वडाळ, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पुशुवैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार बावने, प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे सदस्य राखी वर्मा, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलींद दुसाने, प्राणी प्रेमी संस्थांचे कार्यकर्ते,   नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.             जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, प्रशासनासोबत खाजगी संस्थानी प्राण्याच्या संरक्षणाकरीता पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या उपस्थितीत तलावातील गाळ काढण्यास सुरुवात

इमेज
  अकोला दि .30( जिमाका)-   अकोला शहरालगत घुसर व अनकवाडी येथे  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत गाव तलावातील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली. जलसंधारण विभागाच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्याची सुरुवात घुसर व अनकवाडी या गावात अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या उपस्थितीत करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने या करीता एक जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिले आहे. तर गाळ शेतात वाहून नेण्यासाठी ग्रामस्थांनी एकूण ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहेत. गाळ काढण्यात आल्याने पाणीसाठ्यात १३ टीसीएम एवढी वाढ होईल,असे अनुमान आहे. तलावातील काढलेला गाळ हा शेती साठी उपयुक्त असून हा गाळ शेतकऱ्यांना शेती साठी देण्यात आला. गावकऱ्यांनी पीक बदलातून शेती व्यवसाय फायदेशीर केला आहे. गावात जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्यात आली आहेत. गावची पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी लोकसहभागातून प्रयत्न सुरू केले. पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले. तलावातील वाढते पाणी पाहून ग्रामस्थांचा उत्साह वाढला आहे. टंचाई कायमस्वरुपी दूर ह

ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर:जिल्ह्यातील 125 ग्रामपंचायतीतील 207 रिक्तपदांसाठी होणार पोटनिवडणूक

  अकोला दि .30( जिमाका)-   राज्‍य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार,निधन , राजीनामा , अनर्हता किंवा इतर अन्‍य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्‍त झालेल्‍या पदांच्‍या पोट निवडणूकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबवावयाचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील तेल्‍हारा , अकोट , मुर्तिजापूर , अकोला , बाळापूर , बार्शिटाकळी , पातूर या तालुक्‍यातील एकूण 125 ग्रामपंचायतीमधील 207 रिक्‍तपदाच्‍या पोट निवडणूका घेण्‍यात येणार आहे. त्‍याचा तपशिल याप्रमाणे अ.क्र. तालुक्‍याचे नाव ग्रामपंचायतीची संख्‍या रिक्‍त पदाची संख्‍या 1 तेल्‍हारा 06 9 2 अकोट 22 49 3 मुर्तिजापूर 35 61 4 अकोला 21 29 5 बाळापूर 12 16 6 बार्शिटाकळी 20 32 7 पातूर 9 11 ए

गुटखा विक्रीःअडगाव बु. येथील दुकानदारास अटक

                  अकोला दि .30( जिमाका)-   अडगाव बु. ता. तेल्हारा येथे प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारावर शुक्रवारी (दि.29) छापा टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईनुसार संस्कृती जनरल स्टोअर्स, अडगांव बु.ता. तेल्हारा या दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, तसेच 37 हजार 420 रुपयांचा प्रतिबंधित मालाचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांनी दिली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती या प्रमाणे की, शुक्रवार दि.29 रोजी अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी संस्कृती जनरल स्टोअर्स, अडगांव बु.ता. तेल्हारा, जि. अकोला या दुकानाची तपासणी करून मालक सुनिल केशवराव परळकर यांचेकडुन केसर युक्त विमल पानमसाला हिरवे पाकीट 35 नग, सुगंधीत तंबाखु हिरवे पाकीट 35 नग, केसर युक्त विमल पानमसाला निळे पाकीट 65 नग, सुगंधीत तंबाखु निळे पाकीट 15 नग, वाह पानमसाला 125 नग, डब्ल्यु सुगंधीत तंबाखु 138 नग किंमत असा एकुण 37 हजार 420रुपये किमतीचा साठा जप्त केला. याप्रकरणी दुकान मालक सुन

नोंदणी व मुद्रांक विभाग; शास्तीच्या रक्कमांवर सवलत

अकोला दि .29( जिमाका)-   मुद्रांक शुल्‍काच्‍या तुटीच्‍या भागावरील शास्‍तीची कपात करण्‍याकरीता महाराष्‍ट्र मुद्रांक अधिनियमातील विविध कलमातील तरतुदीनुसार मुद्रांक जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्‍या प्रकरणांमधील दि. 31 मार्चपूर्वी नोटीस मिळाली आहे अशा प्रकरणावरील देय असणाऱ्या शास्‍तीच्‍या रक्कमांवर सुट देण्‍यात आली आहे. या योजनेचा जास्‍तीत जास्‍त नागरीकांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्‍हाधिकारी दिलीप भोसले यांनी केले आहे. योजनेतील अर्ज दाखल करण्‍याची मुदत दि. 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2022 असेल. दि. 1 मे ते 31 जुलै   2022   या कालावधीसाठी दंड सवलत देय रकमेच्‍या 90 टक्‍के राहील, दि. 1 ऑगस्ट ते   30 नोव्हेंबर 2022 या कालावधीसाठी दंड सवलत देय रकमेच्‍या 50 टक्‍के राहील. योजनेचा अर्ज   www . igrmaharashtra.gov.in   या पोर्टलवर उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे. ऑनलाईन अर्जातील परिपूर्ण माहिती पोर्टलवर भरल्‍यानंतर त्‍याची छापील प्रत अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील, असे मुद्राक व नोंदणी विभागाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

रविवारी (दि.1 मे) सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर; लोकप्रतिनिधी/प्रशासकीय अधिकारी देणार योजनांची माहिती

  अकोला दि .28( जिमाका)- महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या वर्धापन दिनी रविवार दि.1 मे रोजी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर केला जाणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पत्रिका प्रत्येक झेंडा वंदनाच्या ठिकाणी माहिती पत्रिकांचे वाटप होणार आहे, तसेच ग्राम सभांमधून योजनांच्या माहितीचे वाचन होणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी दिली आहे. यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, येत्या 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्यायाचा जागर करण्यात येणार आहे. याबाबत निर्गमित शासन निर्णयानुसार दि. 1 मे, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सबंध राज्यात झेंडा वंदनाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहितीपत्रिका किंवा माहिती पुस्तिका वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री, ग्रामीण भागात लोकप्रितिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या मार्फत या योजनांचे संक्षिप्त स्वरूपात वाचन

जि.प.;ग्रा.पं.रिक्‍त जागांच्या पोटनिवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम

  अकोला दि .28( जिमाका)-   राज्‍य निवडणूक आयोगाने जिल्‍हा परिषद  व ग्रामपंचायतीतील रिक्‍त पदांच्‍या पोटनिवडणुकांकरिता राबवावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्‍यानूसार अकोला जिल्‍हा परिषद मधील 35-हातरुण निवडणुक विभागातील रिक्‍त पदांच्‍या पोटनिवडणुकांकरिता मतदार यादीचा कार्यक्रम याप्रमाणे- दि. 28 एप्रिल रोजी प्रारुप मतदार यादी तहसिलदार बाळापूर यांनी प्रसिद्ध केली आहे. दि.28 ते दि.5 मे 2022 पर्यंत प्रारुप मतदार यादीवर आक्षेप व हरकती घेता येतील.आक्षेप व हरकती तहसिल कार्यालय बाळापूर येथे स्विकारण्‍यात येतील. त्‍यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी दि.11 मे रोजी प्रसिद्ध करण्‍यात येईल. तसेच   अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत रिक्‍त पदांच्‍या पोटनिवडणुकांकरिता मतदार यादीचा कार्यक्रम नुसार दि.28 रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी सर्व संबंधित तहसिलदार यांनी प्रसिद्ध केली आहे. कार्यक्रमानुसार प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादीवर आक्षेप व हरकती घेण्‍याचा अंतिम दि.28 एप्रिल ते दि.4 मे पर्यंत असुन आक्षेप व हरकती संबंधित तहसिल कार्यालयात स्विकारण्‍यात येतील. त्‍यानंतर प्रभागनिहाय

मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सकाळी आठ वा.

                अकोला दि .28( जिमाका)-   महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा 62 वा वर्धापन दिनाचा (दि.1 मे) जिल्ह्याचा मुख्य ध्वजारोहण समारंभ  लाल बहादुर शास्त्री स्टेडीयम अकोला येथे होणार आहे. रविवार दि .1 मे रोजी सकाळी आठ वाजता हा समारंभ होईल. राज्यभरात हा समारंभ एकाच वेळी सकाळी आठ वाजता होणार आहे. मुख्य शासकीय समारंभात नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी सव्वा सात ते सकाळी 9 वा. दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी सव्वा सात वाजेच्या पूर्वी किंवा सकाळी 9 वा. नंतर करावा,असे शासनाचे निर्देश आहेत. अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7 वा. 10 मि. ध्वजारोहण समारंभ होईल. तर जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ लाल बहादुर शास्त्री स्टेडियम  अकोला येथे सकाळी आठ वा. होणार आहे. शासनाच्या अन्य विभागांनी आपापल्या कार्यालयांचे ध्वजारोहणाचे कार्यक्रम शासनाच्या निर्देशानुसार आयोजीत करावे,असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक यांनी कळविले

उष्णतेची लाट; दक्षता घेण्याचे आवाहन

                अकोला दि .28( जिमाका)-   भारतीय मौसम विभाग मुंबई यांच्या संदेशानुसार शुक्रवार दि.29 ते सोमवार दि.2 मे या कालावधीत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी या कालावधीत शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे. शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे ही उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत, अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील सर्व तसेच आरोग्य यंत्रणांनी दक्ष रहावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे. 00000

रविवारी (दि.1 मे) सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर; लोकप्रतिनिधी/प्रशासकीय अधिकारी देणार योजनांची माहिती

  अकोला दि .28( जिमाका)- महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या वर्धापन दिनी रविवार दि.1 मे रोजी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर केला जाणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पत्रिका प्रत्येक झेंडा वंदनाच्या ठिकाणी माहिती पत्रिकांचे वाटप होणार आहे, तसेच ग्राम सभांमधून योजनांच्या माहितीचे वाचन होणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी दिली आहे. यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, येत्या 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्यायाचा जागर करण्यात येणार आहे. याबाबत निर्गमित शासन निर्णयानुसार दि. 1 मे, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सबंध राज्यात झेंडा वंदनाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहितीपत्रिका किंवा माहिती पुस्तिका वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री, ग्रामीण भागात लोकप्रितिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या मार्फत या योजनांचे संक्षिप्त स्वरूपात वाचन

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ:शिक्षण,रोजगार- स्वयंरोजगारासाठी योजना

  महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागास वर्गीय घटकांसाठी शिक्षण, रोजगार स्वयंरोगारासाठी सहाय्य करणाऱ्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती करुन देणारा हा लेखः स्‍थापना महाराष्‍ट्र शासनाचा उपक्रम म्‍हणून 23 एप्रिल 1999 रोजी कंपनी अधिनियम 1956 अन्वये महामंडळाची स्‍थापना करण्‍यात आली तसेच नोंदणी कंपनी कायद्यान्‍वये नोंदणी करण्‍यात आली आहे. त्याच प्रमाणे शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग   आथिक विकास महामंडळाची स्‍थापना 18 जून 2010 रोजी महाराष्‍ट्र राज्‍य इतर मागासवर्गीय वित्‍त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्‍हणून करण्‍यात आली. उद्दिष्ट राज्‍यातील इतर मागासवर्गियांच्‍या कल्‍याण व विकासासाठी कृषी विकास , पणन , संस्‍करण , कृषी उत्‍पादनांचा पुरवठा आणि साठवण , लघुउद्योग , इमारत बांधणी , परिवहन या कार्यक्रमाची आणि अन्‍य व्‍यवसाय (वैद्यकीय , अभियांत्रिकी , वास्‍तुशास्‍त्रीय) व्‍यापार किंवा उद्योग यांची योजना आखणे , त्‍यांना चालना देणे , सहाय्य करणे , सल्‍ला देणे , मदत करणे , वित्‍त पुरवठा करणे. इतर