पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ओमायक्रॉनः सुधारीत निर्बंध जारी

  अकोला दि . ३१ ( जिमाका)- ओ माय क्रॉन प्रकाराच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्‍ती व्यवस्थापन , मदत आणि पुनर्वसन यां च्या दि. ३० डिसेंबर रोजीच्या सुधारीत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. यासुचना संपुर्ण अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता  आज (दि.३१ डिसेंबर)पासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत. ` सुधारीत नियमावलीः- १.       लग्‍नसोहळा व लग्‍नसंमारंभाच्‍या बाबतीत , बंदिस्त जागा , हॉल , मेजवानी/मॅरेज हॉल इ. तसेच    खुल्‍या जागेकरिता   उपस्थितांची मर्यादा ५० पेक्षा जास्‍त ठेवता येणार नाही. २.       इतर सामाजिक , राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत , जेथे उपस्थितांची उपस्थिती बंद जागेसाठी आणि खुल्या जागेसाठी ५०   पेक्षा जास्‍त ठेवता येणार नाही. ३.       अत्‍यंविधी करिता २० व्‍यक्‍ती मर्यादीत राहतील. ४.     जि ल्ह्या च्‍या कोणत्याही भागात जी पर्यटन स्थळे आहेत किंवा इतर ठिकाणे आहेत जी मोठ्या प्रमाणात लोकांच्या गर्दीला आकर्षित करतात अशा सर्व प्रकारच

दिव्यांग सर्व्हेक्षणःऑनलाईन ॲपद्वारे घर बसल्या नोंदणी शक्य; दि.१ ते १० जानेवारी विशेष अभियान

इमेज
  अकोला दि . ३१ ( जिमाका)- जिल्ह्यात  सुरु असलेल्या दिव्यांग सर्व्हेक्षणासाठी ‘दिव्यांग सर्व्हे अकोला’ हे ऑनलाईन ॲप तयार करण्यात आले असून त्याद्वारे दिव्यांग व्यक्ती घरबसल्या आपली नोंदणी करु शकणार आहे. या नोंदणीसाठी शनिवार दि.१ ते सोमवार दि.१० जानेवारी २०२२ या दरम्यान विशेष नोंदणी अभियान राबविले जाणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तिंनी आपापल्या ॲन्ड्रॉईड फोनद्वारे नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.   दिव्यांग सर्व्हेक्षण अकोला हे ॲप प्ले स्टोअर वर उपलब्ध असून तेथून ते आपल्या ॲन्ड्रॉईड फोन मध्ये डाऊन लोड करावे. दिव्यांग व्यक्तीकडे मोबाईल नसल्यास कुटुंबातील   वा अन्य कुणाच्याही फोनवरुन ते करुन घेता येईल. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकून रजिस्ट्रेशन करावे.   या ॲपवर आपले आधार कार्ड स्कॅन   करुन अपलोड करावे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे या कॉलम मध्ये   दिलेली कागदपत्रे ‘असल्यास’ ती आपल्या स्वाक्षरीसहित अपलोड करावे (अनिवार्य नाही).   त्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये काही प्रश्नावलीची उत्तरे द्यावयाची आहेत. ही संपूर्ण माहिती अपलोड केल्यावर   टोकन क्रमां

ओमायक्रॉनः जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक:१५ते १८ वयोगटातील ९५ हजार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन

इमेज
  अकोला दि . ३१ ( जिमाका)- जिल्ह्यात ओमायक्रॉन चा एक रुग्ण आतापर्यंत आढळला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापार्श्वभुमिवर जिल्हा प्रशासनही सतर्क असून यासंदर्भात आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुसऱ्या डोसचे लसीकरणाची गती वाढवणे तसेच येत्या सोमवार (दि.३ जानेवारी) पासून १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या नियोजनावर चर्चा झाली. जिल्ह्यात या वयोगटातील ९५ हजार लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यासह जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, डॉ. नितीन अंभोरे, डॉ. अस्मिता पाठक, डॉ. मनिष शर्मा, डॉ. अनुप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. सुचेता पाटणकर, डॉ. मनिषा ठग तसेच अन्य व

कोविडमुळे मृत झालेल्या व्यक्तिंच्या वारसांना सानुग्रह अनुदान; ४५० जणांचे अर्ज मंजूर

अकोला दि . ३१ ( जिमाका)- कोविड १९ या आजारामुळे मृत झालेल्या व्यक्तिंच्या वारसांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी  ऑनलाईन पोर्टलही विकसित केले आहे. जिल्ह्यात आजअखेर यासंदर्भात ४५० जणांचे अर्जांना मंजूरी देण्यात आली आहे, जिल्हास्तरावरुन मंजूरी दिलेल्या अर्जांना  आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय यांच्या वतीन तपासणी करुन थेट बॅंक खात्यात  (डीबीटी) वारसांना अनुदान वितरीत होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे. हे अनुदान मिळविण्यासाठी मृत व्यक्तिंच्या निकट नातेवाईकांनी mahacovid19relief.in व https://epassmsdma.mahait.org/login.htm या लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी. ही भरलेली माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, मनपा वैद्यकीय अधिकारी यांच्या लॉगईन वर जातात. तेथे ते त्या अर्जांची छाननी करतात. तेथून ते जिल्ह्याच्या लॉगईन वर येतात. या अर्जांच्या छाननी व मंजूरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने   निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दोन तहसिलदार, मंडळ अधिकारी, माहिती तंत्रज्ञान सहाय्यक व का

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना: पंतप्रधानांच्या हस्ते लाभ वितरणाचा आज (दि.१ जानेवारी) ऑनलाईन कार्यक्रम; शेतकऱ्यांना ऑनलाईन सहभागाचे आवाहन

  अकोला दि . ३१ ( जिमाका)- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत  पात्र लाभार्थ्यांना १० व्या हप्त्याच्या वितरणाचा कार्यक्रम शनिवार दि.१ जानेवारी रोजी होणार आहे. हा कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमात सहभागासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.  या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डी.डी. किसान, डी. डी. नॅशनल(दूरदर्शन) या वाहिन्यांवर होणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे थेट वेबकास्ट pmindiawebcast.nic.in  वर उपलब्ध असणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ०००००

तीन दिवसीय राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषद: पशुरोगांच्या निदान व उपचारासाठी नवतंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक- डॉ.दक्षिणकर

इमेज
  अकोला दि . ३१ ( जिमाका)- कोरोना सारख्या साथी च्या आजाराच्या पार्श्वभूमीवर , पशू आणि मानव यांच्यातील सामा ई क रोगाचा फैलाव लक्षात घेता , पशुंमध्ये वारंवार उद्भवणा ऱ्या विविध रोगां चे वेळीच निदान व अनुरूप औषधोपचा रासाठी   पशुवैद्यकांनी नवतंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन वासुदेव चंद्रकर कामधेनु विश्वविद्यालय , दुर्ग चे कुलगुरु प्रा. डॉ. नारायण दक्षिणकर यांनी केले . महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ , नागपूर अंतर्गत अकोला येथील घटक महाविद्यालय स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था यांचे वतीने दिनांक २७ ते २९ डिसेंबर दरम्यान तीन दिवसीय आभासी राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषदेचे उद्घाटन डॉ. दक्षिणकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते . महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञा न विद्यापीठ , नागपूर चे कुलगुरु प्रा. डॉ. कर्न ल आशिष पातूरकर यांच्या मार्गदर्शनात स्ना.प.प.संस्था अकोला येथे ‘ पशुवैद्यक क्षेत्रातील वारंवार उद्भवणार्‍या रोगांचे निदान आणि औषधोपचारमधील नवनवीन पद

कोविडः आरटीपीसीआर आणि रॅपिड ॲन्टीजेन 'निरंक'

  अकोला दि . ३१ ( जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून   ( सायंकाळी पाच वाजेपर्यंत)   कोरोना संसर्ग   तपासणीचे   ( आरटीपीसीआर)   ३५२   अहवाल प्राप्त झाले.   त्यात   कुणाचाही पॉझिटीव्ह   आला नाही ,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.   दरम्यान   काल (दि.३०) रॅपिड ॲटीजेन टेस्ट   मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.    त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या   ५७९१४ ( ४३३०१ + १४४३६ + १७७ )   झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.   आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर   शून्य   + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य   = एकूण पॉझिटीव्ह शून्य. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण   ३४४१०७   नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे   ३४०४५१   फेरतपासणीचे   ४०२   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे   ३२५४   नमुने होते. आजपर्यंत एकूण   ३४४१०७   अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या   ३००८०६ आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्