आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
आदिवासी विकास योजनांसाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अकोला, दि. १६ : आदिवासी विकास विभागातर्फे केंद्रवर्ती अर्थसंकल्प
(न्युक्लिअस बजेट) योजनेत समाविष्ट योजनांसाठी आदिवासी बांधवांनी ऑनलाईन अर्ज करून
त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनांत ८५ टक्के अनुदानावर
वनहक्कधारक आदिवासी लाभार्थ्यांना काटेरी तार, आदिवासी शेतकऱ्यांना काटेरी तार, आदिवासी
युवक-युवतींना पिठाची गिरणी, आदिवासी बेरोजगार युवक-युवतींना खाद्य स्टॉल, आदिवासी
शेतकऱ्यांना पावर डिलर, महिला-पुरुष बचत गटांना खाद्य स्टॉल, होजिअरी गारमेंटसाठी अर्थसहाय्य
आदींचा समावेश आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी https://www.nbtribal.in
या संकेतस्थळावर दि. १५ जुलैपूर्वी ऑनलाईन
पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्याकडून अकोला, बुलडाणा
व वाशिम जिल्ह्यातील पात्र व्यक्तींचे अर्ज मागविण्यात आले आहेत.
00000
Khelraja supports users with helpful cricket betting tips to improve their betting knowledge. These tips are easy to understand and suitable for beginners and regular players. By following smart strategies and match insights, users can enjoy betting more confidently. Khelraja focuses on responsible play and informed decision-making.
उत्तर द्याहटवा