2279 अहवाल प्राप्त, 484 पॉझिटीव्ह, 475 डिस्चार्ज, सहा मृत्यू

अकोला,दि.4(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2279 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1795  अहवाल निगेटीव्ह तर 484 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 475  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर सहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.3) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 234 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 42427(32579+9671+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 484   रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 234 असे एकूण पॉझिटीव्ह 718 आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 213367 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 210466 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2514 नमुने होते. आजपर्यंत एकूण 213213 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 180634  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

484 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात ४८४ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १९८ महिला व २८६ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-४८, अकोट-६२, बाळापूर-३०, तेल्हारा-३५, बार्शी टाकळी-२९, पातूर-तीन, अकोला-२७७. (अकोला ग्रामीण-६६, अकोला मनपा क्षेत्र-२११)

दरम्यान काल (दि.3) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 234 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

सहा जणांचा मृत्यू

आज दिवसभरात सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात पारस ता.बाळापूर येथील ४० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १ मे रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य पिंजर ता. बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १ रोजी दाखल करण्यात आले होते, बाळापूर येथील ४६ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २ मे रोजी दाखल करण्यात आले होते, पारस ता. बाळापूर येथील ४० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २४ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तर लहान उमरी  येथील ७५ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. २ रोजी दाखल करण्यात आले होते, वनी रंभापूर येथील ७३ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १९ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते., अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

  475 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३६, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील सहा, अकोला ॲक्सीडेंट येथील तीन, देवसार हॉस्पीटल येथील तीन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, यकीन हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील दोन, इनफिनिटी हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील पाच, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, नवजीवन हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, फातीया हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील पाच, खैर उम्मत हॉस्पीटल येथील दोन, लोहाणा हॉस्पीटल येथील चार, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी तीन, केअर हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील एक, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, तर होम आयसोलेशन मधील ३८० असे एकूण ४७५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

5692 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 42427(32579+9671+177) आहे. त्यात 737 मृत झाले आहेत. तर 35998 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5692 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन