पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिवरखेड येथील रोजगार मेळाव्यास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
अकोला,   दि. 28 (जिमाका)-   नेहरू युवा केंद्र व आकांक्षा युवा मंडळ हिवरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा करियर मार्गदर्शन व रोजगार मेळावा दि. 26 फेब्रुवारी रोजी सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड ता. तेल्हारा   येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आली.               या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कारपोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्रातील कंपन्यानी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले. या मेळाव्यात ऑनलाईन नोंदणीव्दारे 288 तर प्रत्यक्षात 212 तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी 52 तरुणांचे प्राथमिक मुलाखती घेऊन 31 तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आली. या मेळाव्यात सीसीडी, एल.एफ. लॉजिस्टिक, युआयडीआयए प्रोजेक्ट, टेक महिंद्रा इत्यादी उद्योग कंपन्यांनी सहभाग घेतला.             मेळाव्यामध्ये मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन केले. यामध्ये राजीव खारोडे यांनी   स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व अधिकारी होण्यासाठी जिद्द, चिकाटी जोपासावी असे सांगितले. तर दीपिकाताई देशमुख यांनी फॅशन डिझायनिंग क्षेत्रात व्

पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थ निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा; विषय तज्ज्ञांव्दारे मार्गदर्शन

अकोला,   दि. 28 (जिमाका)-   कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) व स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थ निर्मिती’ या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शुक्रवार दि.3 मार्च रोजी सकाळी 10 वाजता सेमिनार हॉल, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, मूर्तिजापूर रोड अकोला येथे होणार आहे. या कार्यशाळेत विषय तज्ज्ञाव्दारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती स्नातकोत्तर पशुवैद्यक व पुशविज्ञान संस्थाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डि.जी. दिघे यांनी दिली.            प्रशिक्षण कार्यशाळा दि. 3 व 4 मार्च रोजी तर 13 ते 17 मार्च या कालावधीत स्नातकोत्तर पशु विज्ञान संस्था आणि आदर्श गोशाळा म्हैसपूर येथे होणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर तर भारतीय पशुकल्याण बोर्डचे सदस्य सुनिलजी मानसिंहका या विषय तज्ज्ञाव्दारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना आदर्श गोशाळा म्हैसपूर येथे प्रत्यक्ष प्रात्यशिकेव्दारे माहिती दिली जाणा

जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये 131 गावांची निवड; गावांचा अंतिम आराखडा तयार करा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

इमेज
अकोला,   दि. 28 (जिमाका)-   मृद व जलसंधारण विभागाच्या निर्देशानुसार जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जलयुक्त शिवार समितीव्दारे निकषानुसार पात्र गावांची निवड करण्यात आली आहे. निवड केलेल्या 131 गावांना आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली आहे. निवड झालेल्या गावांचा अंतिम आराखडा करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधित विभागांना दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियान अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे , जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हरिभाऊ गिते , भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाचे वरिष्ठ भुवैक्षणिक एन.बी.इंगळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मुरली इंगळे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा सदस्य सचिव, सामाजिक वनीकरण विभाग , कृषी विभाग , वरिष्ठ भूवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण विभाग , ग्रामीण पाणीपुरवठा विभाग , जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते.             जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी बैठक

निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणार्थ्यांनी नवसंकल्पना प्रत्यक्षात साकारावी- जिल्हाधिकारी निमा अरोरा

इमेज
अकोला दि.२७ (जिमाका)-   अंत्योदय अभियानातंर्गत अनाथ मुले व बालकामगारांच्या सक्षमीकरणासाठी दहा दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील २१ अनाथ व बालकामगार प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. उद्योजकता विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवसंकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची संधी प्रशिक्षणार्थ्यांना मिळाली. या संधीचा लाभ घेऊन प्रशिक्षणार्थ्यांनी उद्योग निर्मिती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राव्दारे जिल्ह्यातील अनाथ मुले व बालकामगारांच्या सक्षमीकरण व नवउद्योजक निर्माण होण्यासाठी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे दि.१६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण देण्यात आले. यात विविध उद्योगाची माहिती, उद्योगाची निवड, कर्जाच्या योजना, बाजारपेठ पाहणी, विक्री कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, व्यवस्थापन इत्यादीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, कामगा

जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समितीची बैठक ; अंमली पदार्थ विरोधात कारवाई सोबतच जनजागृती आवश्यक -पोलीस अधीक्षक संदीप घुगे

अकोला दि.२७(जिमाका)-   जिल्ह्यात अंमली पदार्थ   वाहतूक, विक्री तसेच सेवनाबाबत आळा घालण्यासाठी   पोलीस प्रशासन सज्ज आहे. जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समितीच्या माध्यमातून सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करुन   कारवाई व त्यासोबतच जनजागृतीवरही भर द्यावा,असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले. केंद्र शासनातर्फे   जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समिती स्थापित करण्यात आली आहे.   जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी व वापरावर आळा घालण्यासाठी ही समिती काम करते. या समितीची बैठक आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली. बैठकीस राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक   स्नेहा सराफ, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील डॉ. भावना हाडोळे, वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त एस.पी. बैस,   अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक संजय राठोड,   कृषी विभागाच्या ज्योती चोरे,   स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, सहायक डाक अधीक्षक सुनिल हिवराळे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री व सेवनास आळा घालण्यासाठी   जनजागृतीवर भर देण्यात यावा. प्रतिबंधित प

मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रजांच्या साहित्यात माणुसपणाचा शोध- श्रीमती सीमा शेट्ये

इमेज
  अकोला दि.२७ (जिमाका)-  ‘ मानवता हे एकच तत्व मानून मी जगतो’, असे तात्यासाहेब म्हणत, त्यांची जीवन निष्ठा हि माणसाशी निगडीत असल्याने कुसुमाग्रजांच्या साहित्यातून माणुसपणाचा हुंकार उमटतांना दिसतो. त्यांच्या साहित्यात नेहमीच माणसांचा आणि माणूसपणाचा शोध दिसतो, असे प्रतिपादन श्रीमती सीमा शेट्ये-रोटे यांनी आज येथे केले. ज्ञानपीठ विजेते साहित्यीक वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विदर्भ साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष श्रीमती सीमा शेट्ये रोठे यांचे व्याख्यान झाले. नियोजन भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मराठी भाषा अधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, मराठी भाषा समितीचे अशासकीय सदस्य सुरेश पाचकवडे, श्याम ठक, डॉ. विनय दांदळे, ॲड. मयुर लहाने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘कुसुमाग्रजांची प्रेरक जीवनदृष्टी’ या विषयावर श्रीमती शेट्ये यांनी आपले विचार व्यक्त केले.   श्रीमती शेट्ये म्हणाल्या की, राम गणेश गडकरी यां

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयात व्याख्यान

इमेज
अकोला दि.२६ (जिमाका)-   ज्ञानपीठ विजेते साहित्यीक वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त (दि.२७ फेब्रुवारी) मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. यानिमित्त सोमवार दि.२७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विदर्भ साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष श्रीमती सीमा शेट्ये रोठे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवार दि.२७ रोजी दुपारी साडेतीन वा. हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मराठी भाषा अधिकारी सदाशिव शेलार हे उपस्थित राहणार असून  महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, मराठी भाषा समितीचे अशासकीय सदस्य सुरेश पाचकवडे, श्याम ठक, डॉ. विनय दांदळे, ॲड. मयुर लहाने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. ‘कुसुमाग्रजांची प्रेरक जीवनदृष्टी’ या विषयावर श्रीमती शेट्ये आपले विचार व्यक्त करतील.  याच कार्यक्रमात  मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यात आयोजित विविध कार्यक्रमातील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण होईल. या कार्यक्रमास उपस्थितीच

कोवीडः आरटीपीसीआर चाचण्यात ‘एक’ पॉझिटीव्ह

  अकोला दि.२४ (जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ६७ अहवाल प्राप्त झाले.   त्यात एकाचा अहवाल   पॉझिटीव्ह आला,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दरम्यान दि.२३ रोजीही एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. १ व खाजगी ०)१+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ०=एकूण पॉझिटीव्ह १. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतील कोरोना संसर्ग तपासणी अहवालात दि. १४ ते २२ फेब्रुवारी कालावधीत कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नव्हता. तथापि गुरुवार दि.२३ रोजी व आज(दि.२४)   आरटीपीसीआर चाचण्यात एकाचा   असे एकूण दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दि.२३ रोजी एका महिला व दि.२४ रोजी एका पुरुष रुग्णाचा समावेश असून हे रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. सक्रिय रुग्ण ‘दोन’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६६०८२(४९९४९+१५१४२+९९१)आहे. सद्यस्थितीत जिल्ह

ग्रामपंचायत पोटनिवडणुक: प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध;हरकती घेण्यास दि.२ मार्च पर्यंत मुदत

  अकोला , दि. २४ ( जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणामुळे ग्रामपंचायतीतील सदस्य किंवा थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदार याद्यांच्या कार्यक्रम राबवावयाचा आहे. त्यासाठी मतदार यादी कार्यक्रम आयोगाने घोषित केला असून आज प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी  प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रापं/जिप/पंस. निवडणूक विभाग सदाशिव शेलार यांनी कळविले आहे. या याद्यांबाबत हरकत घ्यावयाची असल्यास त्यासाठी दि.२४ फेब्रुवारी ते दि.२ मार्च या कालावधीत संबंधित तहसिल कार्यालयात स्विकारण्यात येतील. त्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी दि.९ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध होईल,असेही कळविण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात ५८ ग्रामपंचायतींमधील ७२   सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी तर थेट सरपंचपदाच्या पाच पदांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यात तेल्हारा तालुक्यात ५ ग्रापंचे ५ सदस्य, अकोट तालुक्यात ६ ग्रापं चे १० सदस्य (एक सरपंचपद),   मुर्तिजापूर तालुक्यात १३ ग्रापं चे १६ सदस्य, अकोला तालुक्यात ११ ग्रापंचे १५ सदस्य (एक सरपं

आरोग्य विभागाचा उपक्रम; ५० निक्षयमित्रांनी घेतले ६१ क्षयरुग्ण दत्तक

इमेज
  अकोला , दि. २४ ( जिमाका)- उपचाराधीन क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना दरमहा कोरड्या आहाराचे पोषण किट पुरवून देशातून क्षयरोग हद्दपार करण्यात योगदान द्यावयाचे आहे. त्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘निक्षयमित्र’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ५० निक्षयमित्रांनी ६१ क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे, विशेष म्हणजे यात आरोग्य विभाग व प्रशासनातील अधिकाऱ्यांचा सहभाग आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांनी दिली. काय आहे निक्षयमित्र संकल्पना? क्षयरुग्णांना ‘सामुदायिक सहाय्य’ हा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा उपक्रम आहे. याद्वारे क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळते. समाजातील व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संस्था, व्यावसायिक संस्था , लोकप्रतिनिधी इ.यात सामाजिक उत्तरदायित्व म्हणून यात सहभागी होऊ शकतात. या उपक्रमाचा प्रारंभ राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी केला आहे. ह्या निक्षयमित्रांनी क्षयरुग्णांना सहा महिने ते तीन वर्षे कालावधीसाठी   कोरडा आहार (निक्षय पोषण किट) पुरवायचे आहे. जिल्ह्यातील अधिकारी- कर्मचारी झालेत निक्षयमित्र

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२ साठी मुदतवाढ; दि.८ मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

  अकोला, दि.२४(जिमाका)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिकांना दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पत्रकारांनी यासाठी अधिकाधिक प्रवेशिका दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने   https://dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पुरस्कारांची माहिती 1 अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय) 1,0