पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लॉकडाऊन ३१ जुलै पर्यंत कायम -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

अकोला , दि.३० ( जिमाका)- महाराष्‍ट्र शास नाच्या महसूल व वन विभा गाच्याआदेशानुसार दि . ३१ जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊन चा कालावधी वाढविण्‍यात आला असून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आल्‍या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर  यांनी यासंदर्भात   दि . ०२ जून २०२० रोजी पारीत केलेले आदेश  दिनांक  ३१ जूलै  २०२० चे मध्‍यरात्रीपर्यंत  कायम ठेवण्‍यात येत असल्याचे आदेश आज निर्गमित केले आहेत . हे आदेश दिनांक ०१/०७/२०२० चे ००.०० वा. पासून ते दिनांक ३१/०७/२०२० चे २४.०० वा.   पर्यंत संपूर्ण अकोला   शहर व जि ल्ह्या तील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील. १.       रात्रीची   संचारबंदी - संचारबंदीच्या आदेशाचे पालन करतांना कुठल्याही व्यक्ती , नागरिंकांना हालचाल करण्याकरीता व मुक्‍त संचार करण्‍याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत   रात्री ९.०० ते सकाळी ५.०० वा . पर्यंत सक्त मनाई करण्यात आली आहे. २.       या कार्यालयाचे दिनांक २७.०६.२०२० च्‍या आदेशान्‍वये   केशकर्तनालय ( कटींग) सलून आणि ब्‍युटीपार्लरची दुकाने विहीत अटी व शर्तीनुसार सकाळी ९.०० ते सायंकाळी ०५.

२६२ अहवाल प्राप्तः १४ पॉझिटीव्ह, ५२ डिस्चार्ज, दोन मयत

अकोला , दि.३० ( जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे   २६२ अहवाल प्राप्त झाले . त्यातील २४८ अहवाल निगेटीव्ह तर १४ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १५५० झाली आहे. आज दिवसभरात ५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले.तर दोन जणांचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे.आजअखेर ३२६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ११०२१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १०६६०, फेरतपासणीचे १४४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २१७ नमुने होते. आजपर्यंत एकूण १०९५२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ९४०२ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १५५० आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. आज १४ पॉझिटिव्ह आज दिवसभरात   १४   जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व सात पुरुष आहेत.   त्यातील दोघे बाळापूर येथील, दोघे अकोट येथील, तर चिखलग

संदिग्ध व जोखमीच्या व्यक्तिंचा प्रत्येक गावनिहाय आढावा घ्या- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

इमेज
         अकोला , दि.३० ( जिमाका)- कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण जिल्ह्यात वाढत असतांना आता त्याचा ग्रामिण भागातही शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत संदिग्ध वाटणारे रुग्ण, अन्य व्याधींनी ग्रस्त असणारे ज्येष्ठ नागरिक असे जोखमीच्या व्यक्तिंचा प्रत्येक गावनिहाय आढावा घ्या,  दैनंदिन तपासणी व  चाचण्यांवर भर द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  सर्व यंत्रणांना दिले.   जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी ग्रामिण भाग तसेच जिल्ह्यातील अन्य नगरपालिका क्षेत्रात राबवावयाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी   जिल्हा नियोजन सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पोलीस अधिक्षक जी. श्रीधर,   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी जिल

भारत वृक्ष क्रांती मोहिम; कडु लिंब बीजारोपण उपक्रम यशस्वी करा- जिल्हाधिकारी पापळकर

अकोला , दि.३० ( जिमाका)-   भारत वृक्ष क्रांती मिशन या संस्थेमार्फत ए . एस . नाथन ( समाजसेवक ) संस्थापक यांच्या मार्फत  जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या संकल्पाचा भाग म्हणून  या वर्षी प्रत्येक नागरिकाने आपापल्या गावात, शेतात, घराजवळ कडु लिंबाच्या बिजाचे रोपण करा,असे  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अधिनस्त यंत्रणांना कळविले आहे. भारत वृक्ष क्रांती मिशन अंतर्गत   सन २०१५ पासून अकोला जि ल्ह्या त एक विद्यार्थी एक वृक्ष , एक जन्म एक वृक्ष ही वृक्षारोपणाची मोहिम राबविली . या मोहिमेला ‘ अकोला पॅटर्न ’ म्हणुन प्रसि द्धी मिळाली आहे . आता वृक्ष रोपणाचा एक भाग   म्हणून संपुर्ण अकोला जि ल्ह्या तील प्रत्येक गावात निंबाच्या झाडाचे बिजांचे रोपण करण्याचा मिशनचा प्रयत्न आहे.             या उपक्रमाअंतर्गत अकोला जि ल्ह्या तील सर्व नागरि कांनी निंबाच्या झाडाच्या बिया गोळा करुन आपआपल्या शेताच्या बांधावर ७ ते १०   फुट अंतरावर दोन इंचाचे खड्डे करुन त्यात दोन बिया रोपण कराव्यात . तसेच आपआपल्या घराजवळील परिसरात असलेल्या मोक ळ्या मैदान