पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार यांचा जिल्हा दौरा

  अकोला , दि. 31(जिमाका)- राज्याचे कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार  हे गुरुवार दि. 1 व 2 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- गुरुवार दि. 1 सप्टेंबर रोजी रात्री धारणी येथून अकोला येथे आगमन व विश्रामगृह , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ , अकोला येथे मुक्काम. शुक्रवार दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. महाराष्ट्र बियाणे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक स्थळ: महाबीज भवन , कृषीनगर अकोला.   दुपारी 12 वा. राखीव व दुपारी 12 वा.30 मि.नी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु , निबंधक , विविध महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचे समवेत संशोधन विषयक प्रकल्पांबाबत व प्रशासकीय कामकाजाबाबत बैठक. स्थळ: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ , अकोला. दुपारी 2 वा. 30 मि. नी अकोला येथून औरंगाबादकडे प्रयाण. 000000

कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत सहा पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज

        अकोला दि. 3 1 (जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 80 अहवाल प्राप्त झाले. त्या त सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला . तर दोन जणांला डिस्चार्ज देण्यात आले, असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 6 व खाजगी 0) 6 +रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य=एकूण पॉझिटीव्ह 6 . आरटीपीसीआर ‘ सहा ’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन   महिला व तीन पुरुषांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर येथील एक तर उर्वरित पाच जण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवाशी आहे , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. दोन डिस्चार्ज आज दिवसभरात दोन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. सक्रिय रुग्ण ‘ 23 ’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या

कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत पाच पॉझिटीव्ह, पाच डिस्चार्ज

      अकोला दि. 30 (जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 126 अहवाल प्राप्त झाले. त्या त पाच जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अहवाल पॉझिटीव्ह आला . तर पाच जणांला डिस्चार्ज देण्यात आले, असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 5 व खाजगी 0)5+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य=एकूण पॉझिटीव्ह 5. आरटीपीसीआर ‘पाच’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व चार पुरुषांचा समावेश असून हे सर्व रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवाशी आहे , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. पाच डिस्चार्ज आज दिवसभरात पाच रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. सक्रिय रुग्ण ‘ 19 ’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65 825 (49 6

प्रसाद, भंडारा वितरण करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना नोंदणी करण्याचे अन्न व औषध प्रशासनातर्फे आवाहन

अकोला, दि.३०(जिमाका)-   सार्वजनिक गणेश उत्सव बुधवार दि. ३१ पा सू न साजरा करण्यात येणार आहे. गणेश उत्सवानिमित्त विविध मंडळातर्फे भंडारा प्रसाद , अन्नदान इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात येतात. त्याअनुषंगाने सर्व सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे , त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन व वितरण करणारे अन्न व्यावसायि कांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार,प्रसाद वितरण करणाऱ्या मंडळांनी अन्न सुरक्षा कायद्यानुसार   www.foscos.fssai.gov.in या वेबसाईटवर नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे. प्रसाद करताना उत्पादनाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी. प्रसादासाठी लागणारा कच्चा माल , अन्नपदार्थ , परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा. तसेच प्रसाद बनविणाऱ्या केट र र्सची माहिती अद्यावत करुन ठेवावी , प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ , आरोग्यदायी व झाकण असलेली असावी , आवश्यक तेवढ्याच प्रसादाचे उत्पादन करावे , उरलेल्या शिळे अन्नपदार्थांची योग्य रि तीने विल्हेवाट लावावी , प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा क

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार

अकोला दि.३०(जिमाका)- राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दि.३१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. अकोला जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी यात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. असे आहेत पुरस्कार राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास पाच लाख रुपये, द्वितीय क्रमांकास दोन लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास एक लाख रुपये इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास २५ हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस गुरुवार दि. २ सप्टेंबर २०२२ असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सहभागासाठी अट या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. किंवा स्थानिक पोलिस स्थानक अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घ

अकोला बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्न; छत्तीसगड येथील हरवलेले बालक पालकांच्या स्वाधीन

अकोला दि.३०(जिमाका)-   झारखंड येथून हरवलेला एक बारा वर्षे वयाचा बालक हा सोमवारी (दि.२९) अकोला जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. अकोला रेल्वे स्थानकावर हा बालक भटकतांना आढळून आला होता. चाईल्ड लाईनच्या टीमने या बालकाला शोधून बाल संरक्षण कक्षाच्या स्वाधीन केले. येथील शासकीय निरीक्षण गृह व बालगृह येथे या बालकाचा आतापर्यंत सांभाळ करण्यात आला. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली की, अकोला रेल्वेस्टेशन येथे (दि.१९ जुलै रोजी) रात्री १२ वर्षीय हा बालक भटकताना निदर्शनास आला. रेल्वे स्टेशन येथील चाईल्ड लाईनच्या टिमने या बालकाला विचारपूस केली मात्र तो गोंधळलेल्या स्थितीत होता व बोलत नव्हता. चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या टिमने त्या बालकाला विश्वासात घेवून त्याच्या पालकांची शोध मोहिम सुरु केली.    जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांचे मार्गदर्शनाखाली शोध मोहिम राबविण्यात आली. परिवाराचा शोध लागेपर्यंत या बालकाला शासकीय निरीक्षणगृह व बालगृह

जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समिती; जादूटोना निर्मूलनासाठी जनजागृती मोहिम राबवा

इमेज
  अकोला ,   दि.३०(जिमाका)-   समाजात रुजलेल्या काही अनिष्ट , अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम जारी केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली   जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांनी जादूटोना विरोधी कायदाचा जिल्हा व ग्रामस्तरावर प्रचार व प्रसार करण्यासाठी जनजागृती मोहिम राबवावी , असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड , जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.टी. मुळे , शिक्षण विभाग , महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते. ०००००

जिल्हा बाल संरक्षण समितीची बैठक ‘पॉक्सो कायद्या’ची जनजागृती करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

इमेज
अकोला ,   दि.३०(जिमाका)-   बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी ‘पोक्सो’ कायदा अस्तित्वात आहे. या कायद्याची माहिती शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच जनसामान्य नागरिकांना व्हावा याकरीता जिल्हा व ग्रामस्तरावर प्रशिक्षण , कार्यशाळा व जनजागृती मोहिम राबवा , असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले. जिल्हा बाल संरक्षण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे , कामगार कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू गुल्हाने, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. अनिता गुरव , महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर ,   जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर , बाल कल्याण समिती सदस्य डॉ. विनय दांदळे, प्रांजली जयस्वाल, शिला तोष्णीवाल, बाल न्याय मंडळाचे सदस्य ॲड. वैशाली गावंडे, सारीका गिरवडेकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की , पॉक्सो कायद्याविषयी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना माहिती होणे आव

विशेष लेखः- जनावरांतील लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना

इमेज
  लम्पी त्वचा रोग ( लम्पी स्किन डिसीज ) हा रोग इ. स. १९२९ पासून १९ ७ ८पर्यंत मुख्यत्वे आफ्रिकेत आढळत होता. नंतर स भो तालच्या इतर देशात शिरकाव केला . मात्र सन २०१३ नंतर या रोगाचा वेगाने सर्वदूर प्रसार झाला आणि आता हा रोग अनेक युरोपीय आणि आशीयाई देशात पसरला आहे . भारतात लम्पी त्वचा रोगाची पहिली नोंद ऑगस्ट २०१९ मध्ये ओरिसा राज्यात झाली. त्या नंतर झारखंड , पश्चिम बंगाल , छत्तीसगड , तेलंगणा , आंध्रप्रदेश , कर्नाटक आणि केरळ राज्यात या आजाराचा शिरकाव झालेला आढळून आला. महाराष्ट्रात प्रथम या आजाराचा प्रसार गडचिरोली जिल्ह्यात (सिरोंचा) मार्च २०२० या महिन्यापासून झाला होता . नंतर विदर्भ आणि मराठवाडा भागातील काही जिल्ह्यात सुद्धा या रोगाचा   प्रादुर्भाव दिसून आला. या वर्षी तो गुजरात राज्यामधील काही जिल्ह्यामध्ये प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषतः गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये होऊ नये आणि त्याचा प्रसार महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत शेतकरी / पशुपालक यांना जागृत राहण