अकोला, दि.25 (जिमाका)- कोवीड -१९ महामारीमुळे दोन्ही पालक
गमावलेल्या बालकांना त्यांचे पालनपोषण, यथायोग्य संरक्षण व संगोपनाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमार्फत अशा बालकांचा शोध घेण्यासाठी जनजागृती राबविण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोविड संसर्गामध्ये अडचणीत सापडलेल्या
बालकांची माहिती देणारे बॅनर व स्टीकरचे जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
यावेळी महिला व बालविकास अधिकारी विलास
मरसाळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. पल्लवी कुळकर्णी,
चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर,
संगिता ठाकुर, सुनिल सरकटे, विद्या
उमरकर आदी उपस्थित होते.
सद्यस्थितीत कोरोनाचा विषाणूचा वाढलेला संसर्ग आणि
त्यामुळे कोवीड-१९ बाधीत व्यक्तींचे व मृत्युचे वाढलेले प्रमाण विचारात घेता, त्याचा बालकांच्या जीवनावर परिणाम होत आहे. त्यात काही बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. या
बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता असते तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या
गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता असते. बालकांचे शोषण होवू नये व त्यांचे संरक्षण
व पालनपोषण व्हावे याकरीता अधिनियमान्वये कृती दल गठीत करण्यात आले आहे. या कृती
दलामार्फत पालक गमावलेल्या बालकांचे पालनपोषण व संरक्षण करण्यात येणार आहे. जिल्हा
व तालुकास्तरावर अशी बालके आढळुन आल्यास चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या टोल फ्री
क्रमांकावर किंवा बालकल्याण समितीच्या अध्यक्ष सौ.पल्लवी कुळकर्णी (९७६३२८८८७०),
संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर (८७६७७३१०७८), चाईल्ड
लाईन समन्वयक हर्षाली गजभिये(९१४६६४४३५८), जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर (९४२१४६४५६६)
यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा