2647 अहवाल प्राप्त, 531 पॉझिटीव्ह, 488 डिस्चार्ज, ११ मृत्यू

 अकोला,दि.7(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2647 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2116  अहवाल निगेटीव्ह तर 531  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान  488   जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 11 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.6) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 183 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 44515(34107+10231+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 531+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 183= एकूण पॉझिटीव्ह- 714.

         शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 221298 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 218371 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2540 नमुने होते. आजपर्यंत एकूण 221162  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 187055   आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

531 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात 531 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 209 महिला व 322 पुरुषांचा समावेश आहे.

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-मुर्तिजापुर-22, अकोट-116, बाळापूर-37, तेल्हारा-28, बार्शी टाकळी-38, पातूर-49, अकोला-241. (अकोला ग्रामीण-88, अकोला मनपा क्षेत्र-153)

काल (दि.6) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 183 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, त्यांचाही समावेश एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

11णांचा मृत्यू

आज दिवसभरात 11 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात उरल येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 1 मे रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य बाळापूर येथील 71 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 28 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, डाबकी रोड येथील 74 वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. 17 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, पातूर येथील 60 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 28 रोजी दाखल करण्यात आले होते, तर मोठी उमरी येथील 56 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 30 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट फैल येथील 62 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 29 रोजी दाखल करण्यात आले होते. खदान येथील 80 वर्षीय महिला  असून या रुग्णास दि. 2 मे रोजी दाखल करण्यात आले होते.  रणपिसे नगर येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 4 मे रोजी दाखल करण्यात आले होते. अकोट येथील 50 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 29 रोजी दाखल करण्यात आले होते, तर म्हैसपूर येथील 75 वर्षीय महिला रुग्णास दि. 3 रोजी दाखल करण्यात आले होते, डोंगरगाव येथील 60 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

  488 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 35, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील चार, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, आधार हॉस्पीटल येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, पाटील हॉस्पीटल येथील दोन, काले हॉस्पीटल येथील एक, सोनोने हॉस्पीटल येथील एक,युनिक हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील  दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील दोन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, यकीन हॉस्पीटल येथील दोन, उशा हॉस्पीटल येथील एक, इनफिनिटी हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 410 असे एकूण 488 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

6402 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 44515(34107+10231+177)  आहे. त्यात 765 मृत झाले आहेत. तर 37348 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6402 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ