रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1607 चाचण्यात 183 पॉझिटीव्ह

 


 अकोला,दि. 7 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.6) दिवसभरात झालेल्या 1607 चाचण्या झाल्या त्यात 183 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

  काल दिवसभरात अकोला येथे 19 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आले, अकोट येथे 84 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर येथे 18 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी येथे 16 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, पातूर येथे 45 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तेल्हारा येथे 45 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 259 चाचण्या झाल्या त्यात 43 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे 880 चाचण्या झाल्या त्यात 36 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 33 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 99 चाचण्या झाल्या त्यात 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 85 चाचण्या झाल्या त्यात 41 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 24 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे 1607 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 183 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 20 हजार 443 चाचण्या झाल्या पैकी 10310 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

  1. दुसरी लाट पहीलीपेक्षा घातक आहे म्हणून घरी राहा आणि सुरक्षित रहा.घाबरु बिलकूल नका व बातम्या पाहूच नका.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ