पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोविडः चार पॉझिटीव्ह

                अकोला दि. 30 (जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 42    जणांचा अहवाल प्राप्त झा ला .   त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,   असे   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालया मार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 4   व खाजगी 0) 4 +रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 4 . आरटीपीसीआर ‘ चार ’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात   चार महिलांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर व अकोला महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी दोन प्रमाणे रहिवासी आहेत ,   अशी माहिती   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून   मिळाली. सक्रिय रुग्ण ‘26 ’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66208 (500 75 +15142+991)   आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 सक्रिय रुग्ण आहेत ,   अशी माहिती    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे. ०००००

कोविडः तीन पॉझिटीव्ह

                अकोला दि. 29 (जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर)   55   जणांचा अहवाल प्राप्त झा ला .   त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,   असे   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालया मार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 3   व खाजगी 0) 3 +रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 3 . आरटीपीसीआर ‘ तीन ’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक पुरुष व दोन महिलांचा समावेश असून हे रुग्ण बार्शीटाकळी येथील एक व उर्वरित दोन जण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत ,   अशी माहिती   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून   मिळाली. सक्रिय रुग्ण ‘22 ’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66204 (500 71 +15142+991)   आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात 22 सक्रिय रुग्ण आहेत ,   अशी माहिती    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे. ०००००

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना महाराष्ट्र दिनी मिळणार नियुक्ती प्रमाणपत्र

अकोला दि. 28 (जिमाका)-   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे घेण्यात आलेल्या परिक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दि. ‍1 मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे वस्तू व सेवा कर कार्यालयाचे   उपायुक्त एस.एस. बनकर यांनी कळविले आहे. अकोला जिल्ह्यातील नियुक्तीस पात्र उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि.1 मे रोजी सकाळी 7 वाजता उपस्थित राहावे. यासंदर्भात उमेदवारांना काही अडचण असल्यास वा अधिक माहितीकरिता वस्तू व सेवाकर कार्यालयाचे राज्यकर अधिकारी सुनिल गोलोकार यांच्या मो.क्र. 7588501532   वर संपर्क साधावा, असे आवाहन वस्तू व सेवाकर कार्यालयाचे उपायुक्त एस.एस.बनकर यांनी केले आहे. 00000

महाबीज वर्धापन दिन; ‘महाबीज’ शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे-कृषिमंत्री अब्दुल सत्तार

इमेज
अकोला दि.२८(जिमाका)-   महाबीज हे शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे आहे. ४७ व्या वर्धापन दिनी हा विश्वास अधिक दृढ व्हावा व तो उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा, अशा शब्दात राज्याचे   कृषीमंत्री, अल्पसंख्याक विकास व औकाफ तथा प्रतिकुलपती अब्दुल सत्तार यांनी महाबीज ला आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा अर्थात महाबीजचा वर्धापन दिन आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख,   व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्री, संचालक वल्लभराव देशमुख, डॉ. रणजीत सपकाळ तसेच महाबीजचे सभासद व बियाणे उत्पादक शेतकरी, अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आपल्या संबोधनात श्री. सत्तार म्हणाले की, बियाणे बाजारात शेतकऱ्यांना हमखास खात्रीचे बियाणे उपलब्ध व्हावे या हेतूने महाबीजची वाटचाल सुरु आहे. गेल्या ४७ वर्षात महाबीजने हा विश्वास अधिक बळकट केला आहे. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सक्षम करण्यात महाबीजचा मोलाचा वाटा आहे. बियाणे क्षेत्रातील तंत्र हे सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, अशी सुचनाही त्

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ‘प्रतापगड’ वसतीगृहाचे उद्घाटन शासनाच्या निर्णयांमुळे शेतकरी व कृषिक्षेत्राला पाठबळ-कृषिमंत्री अब्दुल सत्तार

इमेज
  अकोला दि.२८(जिमाका)-   राज्य शासन हे शेतकऱ्यांना आणि कृषीक्षेत्राला पाठबळ देत आहे. त्यासाठी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. आताही नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन   राज्याचे   कृषीमंत्री, अल्पसंख्याक विकास व औकाफ तथा प्रतिकुलपती अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ‘प्रतापगड’ या मुलांच्या वसतीगृहाचे उद्घाटन    श्री.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.   या समारंभाला कुलगुरु डॉ. शरद गडाख, विधानसभा तथा कार्यकारी परिषदचे सदस्य आ. रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप पाटील, जनार्दन मोगल, श्रीमती हेमलता अंधारे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी संचालक डॉ. श्यामसुंदर माने, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ.

कोविडः चार पॉझिटीव्ह

             अकोला दि. 28 (जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर)   87   जणांचा अहवाल प्राप्त झा ला .   त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,   असे   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालया मार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.4   व खाजगी 0)4+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 4. आरटीपीसीआर ‘चार’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक पुरुष व तीन महिलांचा समावेश असून हे रुग्ण पातूर येथील एक व उर्वरित तीन जण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत ,   अशी माहिती   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून   मिळाली. सक्रिय रुग्ण ‘19 ’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66201 (50068+15142+991)   आहे. तर एक   रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 19 सक्रिय रुग्ण आहेत ,   अशी माहिती    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे. ०००

अवकाळी पावसाचा इशारा; शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन

             अकोला दि.28(जिमाका)- प्रादेशीक हवामान विभाग नागपुर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार जिल्ह्यात मंगळवार दि. 2 मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. यादरम्यान ताशी 40-50 किमी याप्रमाणे वारा वाहणाची शक्यता आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. शेतमाल सुरक्षीत ठिकाणी साठवावा.    बाजार समितीतही विक्रीसाठी आणलेला माल सुरक्षीत ठेवावा. मालाचे नुकसान होणार नाही;याची काळजी घ्यावी. विजा व गारांपासून बचाव करावा. सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार एस.पी.ढवळे यांनी केले आहे.              मार्गदर्शक सूचना याप्रमाणे : हवामान   विषयक व विजेबाबत अद्यावत माहितीकरिता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थान प्राधिकरणाव्दारे निर्मित गुगल प्ले स्टोअरवरील दामिनी अँप डाऊनलोड करुन त्याचा वापर करावा. वादळी वारा विजा चमकत असताना घरातील खिडक्या व दरवाजा बंद ठेवावे. घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवाराऱ्याच्या ठिकाणी व मजबूत इमारतीमध्

सामाजिक न्याय पर्वानिर्मित्त सामाजिक न्याय विभागात उद्योजकता मार्गदर्शन कार्यशाळा

  अकोला , दि. २८ (जिमाका)-   सामाजिक न्याय विभागाव्दारे दि. 1 एप्रिल ते 1 मे 2023 दरम्यान "सामाजिक पर्व अभियानअंतर्गत" समाजकल्याण कार्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गुरुवार दि.27 एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन, अकोला येथे शासनाच्या योजनाची माहिती व उद्योजकता मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी नवउद्योजकतांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. उद्योजकता मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये तरुणांना उद्योग व्यवसायातील विविध संधी, शासनाच्या विविध योजना, उद्योग उभारण्यासाठी आवश्यक गोष्टी, तंत्रज्ञानाची आवश्यकता, कौशल्य विकसित करण्याच्या बाबी, मॅनपावर, विविध साधनसामुग्री, उद्योगाचे व्यवस्थापन, मशनरी यासह विविध विषयावर नवउद्योजक, लीड बॅकेचे अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी तसेच विविध महामंडळाचे प्रतिनिधीनी मार्गदर्शन केले. बहूजन समाजातील तरुणांनी आपल्या पूर्ण क्षमतांचा वापर करुन समाज उपयोगी उद्योग उभारावे. यासाठी   सामाजिक न्याय विभाग अशा तरुणांनाच्या नेहमीच पाठीशी उभी राहिल, अशी ग्वाही समाजकल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त डॉ.अनिता राठो

जड वाहन प्रवेश बंदी, शिथीलता करण्यासंदर्भात मालधक्का व जड वाहतूक संघटनेव्दारे हरकती मागविल्या; गुरुवारी उपस्थित राहण्याचे आवाहन

    अकोला , दि. २८ (जिमाका)-   शहरातील जड वाहन, प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस यांना पोलिस विभागाव्दारे निश्चित केलेल्या मार्गावर प्रवेश बंदी   शिथीलत करण्यासंबंधी अधिसूचना निर्गमित करावयाचे आहे. या संदर्भात मलाधक्का व जड वाहतूक संघटनेव्दारे हरकत/आक्षेप असल्यास जिल्हाधिकारी यांच्या दालतान गुरुवार दि. 4 मे रोजी दुपारी 1.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे करण्यात आले.             शहरातील मार्गावर जड वाहनांना वाहतुकी करीता रात्री 10 वाजता पासून सकाळी 8 वाजेपर्यंत मोकळीक देऊन ,   सकाळी आठ वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत पुर्णपणे प्रवेश बंदी करुन निवडक मार्गावर जिवनावश्‍यक/अत्‍यावश्‍यक वस्‍तुंची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना दुपारी दोन ते चार या कालावधीत शिथीलता देण्‍याची तसेच शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्‍झरी बसेस यांना प्रवासी चढ उतार करण्‍याकरीता निश्चित केलेल्या मार्गाचे वापर करण्‍याचे प्रस्ताव पोलिस विभागाने प्रस्तावित केले आहे. प्रस्तावित वेळापत्रक याप्रमाणे : अ.क्र अकोला महानगराचे बाहेरुन येणारे मार्ग प्रस्‍ता