1437 अहवाल प्राप्त, 163 पॉझिटीव्ह, 528 डिस्चार्ज, 13 मृत्यू
अकोला,दि.25(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1437
अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1274 अहवाल निगेटीव्ह तर 163 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. दरम्यान 528 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 13
जणांचा उपचारा
दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.24) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 125 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 54257(40799+13281+177) झाली आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 163 +
रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 125= एकूण पॉझिटीव्ह- 288.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 258417 नमुने तपासण्यात आले.
त्यात प्राथमिक तपासणीचे 255386 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2641 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 258375 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 217576 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
163 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 163 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्यात 75 महिला व 88 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-19, अकोट-20, बाळापूर-23, तेल्हारा-सहा,
पातूर-पाच, अकोला-90. (अकोला ग्रामीण-28,
अकोला मनपा क्षेत्र-62), दरम्यान काल (दि.24)
रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 125 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व
ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
528 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 35, उपजिल्हा रुग्णालय येथील एक,
युनिक हॉस्पीटल येथील तीन, सुर्यचंद्र
हॉस्पीटल येथील दोन, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील पाच, यकीन हॉस्पीटल
येथील एक, बबन
हॉस्पीटल येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील चार, इनफिनीटी हॉस्पीटल येथील तीन, गोयंका गर्ल्स हास्टेल
तीन, पीकेव्ही जॅम्बो हॉस्पीटल येथील दोन, थोटे हॉस्पीटल येथील तीन, समर्पण हॉस्पीटल येथील एक,
जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, आयकॉन
हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील एक,
आधार हॉस्पीटल येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील
एक, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, अर्थव
हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, काळे हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील नऊ,
तर होम आयसोलेशन मधील 425 असे एकूण 528 जणांना डिस्चार्ज देण्यात
आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
13 जणांचा
मृत्यू
आज दिवसभरात 13 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खाजगी रुग्णालयातील दोन
जणांचा समावेश आहे.
त्यात, दहिहांडा येथील 70 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 22 रोजी दाखल झाले होते.
पातूर येथील 53 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 22 रोजी दाखल केले होते.
मुर्तिजापूर येथील 35 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.
भौरद येथील 51 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.
कारली मुर्तिजापूर येथील 57 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 20 रोजी
दाखल केले होते.
खानापूर ता. पातूर येथील 80 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 20 रोजी
दाखल केले होते.
शास्त्री नगर येथील 71 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल
केले होते.
मोठी उमरी येथील 86 वर्षीय महिला
रुग्ण असून या महिलेस दि. 22 रोजी दाखल केले होते.
मलकापूर येथील 69 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 22 रोजी दाखल केले
होते.
अकोट येथील 60 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल केले
होते.
तेल्हारा येथील 50 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल केले
होते.
खालील रुग्णांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
बाबुळगाव ता. पातूर येथील पुरुष
रुग्णास दि. 25 रोजी दाखल केले होते.
सिंधखेड येथील 35 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल केले
होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
5875 जणांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा