अकोला,दि. 5 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी
जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.4) दिवसभरात झालेल्या 1779 चाचण्या झाल्या त्यात 205 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा
रुग्णालयातून देण्यात आली.
काल
दिवसभरात अकोला
येथे 36 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल
पॉझिटीव्ह आले, अकोट येथे 57 चाचण्या
झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आला, बाळापूर येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी
येथे 41 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, पातूर येथे 23 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तेल्हारा येथे 80
चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 258
चाचण्या झाल्या त्यात 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे 1081 चाचण्या झाल्या
त्यात 75 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला
आयएमए येथे 18 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात
58 चाचण्या झाल्या त्यात 24 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 98 चाचण्या झाल्या त्यात 40 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले. जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 20 चाचण्या
झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे 1779 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 205 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 17 हजार 314 चाचण्या झाल्या पैकी 9955 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा