पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन

  अकोला , दि. 31( जिमाका)- जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते खराब झाल्याच्या तक्रारी आहेत.   त्यातही ज्या गावांना   इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते यांना जोडणारे रस्ते खराब आहेत व ज्यामुळे गावांशी संपर्क , दळण वळणास अडचणी येत आहेत , अशा रस्त्यांची माहिती ग्रामपंचायतींनी पालकमंत्री कार्यालयास कळवावी , असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण , महिला व बालविकास , इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक   मागास प्रवर्ग , विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण , कामगार राज्यमंत्री   तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे. त्यासाठी खराब रस्त्याच्या छायाचित्र शक्य झाल्यास व्हिडीओ व एक पत्र पालकमंत्री कार्यालय , जिल्हाधिकारी कार्यालय परिसर , अकोला येथे पाठवावे , असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात लवकरच   बैठक आयोजित करण्यात येणार असून त्याबैठकीत निर्णय घेऊन रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेणे शक्य होईल , असेही ना.कडू यांनी कळविले आहे. ०००००

412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह

अकोला , दि. 31( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 412   अहवाल प्राप्त झाले. त्यातील 408   अहवाल निगेटीव्ह तर चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आ ले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 30)   रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57764 ( 43180 + 14407 + 177 ) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर चार   + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य   = एकूण पॉझिटीव्ह चार . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 304963   नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 301419    फेरतपासणीचे 397   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3147   नमुने होते. आजपर्यंत एकूण 304951   अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 261771 आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 472 चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह

अकोला ,दि.31 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.30 )   दिवसभरात झालेल्या 472 चाचण्या झाल्या त्यात शून्य   जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.              काल दिवसभरात अकोला येथे तीन, अकोट येथे 10, बाळापूर येथे 28, बार्शीटाकली येथे एक, तेल्हारा येथे 11, मूर्तिजापूर येथे 57, अकोला महानगरपालिका येथे 287 , अकोला आयएमए येथे चार,   आरोग्य कर्मचाऱ्यांचे  23,  वैद्यकीय महाविद्यालय येथे 42, हेगडेवार लॅब येथे सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही ,   असे 472 जणांच्या चाचण्या होऊन त्यात  शून्य अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लक्ष  तीन हजार 589   चाचण्या झाल्या पैकी   14 467  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे. ०००००

३९३ अहवाल प्राप्त, ‘शून्य’ पॉझिटीव्ह, सहा डिस्चार्ज; रॅपिड चाचण्यात एक पॉझिटीव्ह

  अकोला , दि.३० ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर)   ३९३   अहवाल प्राप्त झाले. त्यातील   ३९३   अहवाल निगेटीव्ह तर   कुणाचाही   अहवाल पॉझिटीव्ह आला नाही , असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि.२९ )   रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये   एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या   ५७७६०(४३१७६+१४४०७+१७७) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर   शून्य   + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   एक   = एकूण पॉझिटीव्ह   एक. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण   ३०४५८१   नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे   ३०१०३७    फेरतपासणीचे   ३९७   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे   ३१४७   नमुने होते. आजपर्यंत एकूण   ३०४५३९   अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या   २६१३६३ आहे ,   अशी माहिती शासकीय

माळराजूरा येथे वनपर्यटनाचा आनंद घेण्याचे आवाहन

  अकोला, दि.३० (जिमाका)- अकोला वन विभागातील पातुर परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या माळराजूरा येथे वन पर्यटनाचा आनंद घ्यावा,असे आवाहन उपवन संरक्षक (प्रादेशिक) अर्जूना के.आर यांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माळराजूरा येथील निसर्ग पर्यटन   अकोला तसेच इतर ठिकाणच्या नागरिकांना खुले करण्यात आले असून. नागरीक तसेच शाळकरी मुले / मुली माळराजूरा स्थळामध्ये असलेल्या विविध वन्यप्राणी हरीण , रोही , काळविट , मोर इत्यादी   प्राण्यांचा अधिवास आहे. तसेच याबाबत मनमुराद आनंद घेऊन त्यांना या परिसरात असलेल्या वन्यप्राणी , पक्षी यांचे जवळून निरिक्षण करण्याची व बघण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच तेथे असलेल्या नैसर्गिक झाडे , विविध वनस्पती तसेच सिंचन विभागामार्फत बांधण्यात आलेल्या पातुर तलावाचे नयनरम्य दृष्य पाहावयास मिळू शकते. नैसर्गिक पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे उपवनसंरक्षक ( प्रादेशिक ) अर्जूना के.आर. यांनी केले आहे.

विभागीय आयुक्तांनी घेतला मदत, पुनर्वसन कार्याचा आढावा

इमेज
  अकोला , दि.३०(जिमाका)- जिल्ह्यात झालेल्या  अतिवृष्टीमुळे झ्गालेल्या नुकसानीनंतर जिल्ह्यात सुरु असलेल्या मदत पुनर्वसन  कार्याचा आढावा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे वाकोडे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त सिंह यांनी जिल्ह्यात झालेले शेतीचे नुकसान, विमाधारक शेतकऱ्यांची संख्या, त्यांचे झालेल्या पंचनाम्याचे प्रमाण,  पिक निहाय झालेले नुकसान, घरांची पडझड,  जिल्ह्यात सुरु झालेले सानुग्रह अनुदान वितरण याबाबत यंत्रणेकडून माहिती घेतली.

रेडक्रॉसतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरण: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने विभागात ऑक्सिजन वितरणाचे परिपूर्ण नियोजन -विभागीय आयुक्त पियुष सिंह

इमेज
  अकोला , दि.३०(जिमाका)- अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनात ऑक्सिजन वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. रेडक्रॉस सारख्या सेवाभावी संस्थांनी दिलेल्या योगदानामुळे या नियोजनाला अधिक बळकटी येईल,असे प्रतिपादन अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज येथे केले. इंडीयन रॅडक्रॉस सोसायटीच्या अकोला शाखेतर्फे   ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरीत करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम   पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, रेडक्रॉस अकोला शाखेचे उपाध्यक्ष डॉ. किशोर मालोकार, कोषाध्यक्ष ॲड. महेंद्र साहू,   ॲड. सुभाषसिंग ठाकूर, ॲड. सुभाष मुंगी,   मनोज चांडक, अमर गौड, पंकज पाटील, सचिव प्रभजितसिंग बछेर आदी उपस्थित होते.   यावेळी सर्पमित्र बाळ काळणे यांना सहयोग निधी   तसेच बी.एस. देशमुख यांना गौरवपत्र प्रदान करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तेल्हारा, अकोट, आबाजी थत्ते रुग्णोपयोगी स

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 549 चाचण्यात एक पॉझिटीव्ह

अकोला ,दि.30 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.29 )   दिवसभरात झालेल्या 549 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.              काल दिवसभरात  अकोला येथे सात, अकोट येथे 17, बाळापूर येथे 37, बार्शीटाकली येथे दोन, तेल्हारा येथे तीन, मूर्तिजापूर येथे 47, अकोला महानगरपालिका येथे 342, अकोला आयएमए येथे एक, आरोग्य कर्मचाऱ्यांचे  32, वैद्यकीय महाविद्यालय येथे 47, हेगडेवार लॅब येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही , तर   तेल्हारा येथे पाच चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे 549 जणांच्या चाचण्या होऊन त्यात  एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लक्ष  तीन हजार 117 चाचण्या झाल्या पैकी   14 467   जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे. ०००००

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम: तालुका व गावस्तरीय समित्या कार्यान्वित करा- अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांचे निर्देश

इमेज
  अकोला , दि.३०(जिमाका)- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  तालुकास्तरीय व गावस्तरीय समित्या लवकरात लवकर कार्यरत कराव्या, तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा अकस्मात भेटी देऊन कारवाई करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी दिले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा समन्वय समितीची सभा (दि. २९) आयोजित करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पवार , अन्न व औषध विभागाचे सहा. आयुक्त तेरकर , पोलीस विभाग प्रतिनिधी पो.नि. श्रीमती. इतापे , म.न.पा. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर मुद्गल , शिक्षण विभागाचे अरविंद जाधव , नंदकिशोर लहाने , समितीचे अशासकीय सदस्य प्रा.मोहन खडसे , प्रा.डॉ. संकेत काळे , प्रा.डॉ. राजेन्द्र पाटील , डॉ. योगेश शाहू , डॉ. दुष्यंत देशपांडे उपस्थित होते. यावेळी खंडागळे यांनी निर्देश दिले की,   शासकीय / निमशासकीय कार्यालयामध्ये तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थ खाणे व खाऊन थुंकण्यावर प्रत

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दि. ११ ऑगस्टला

  अकोला , दि. ३० (जिमाका)- जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा २०२१ ही येत्या बुधवार दि.११ ऑगस्ट रोजी होणार आहे. यापुर्वी ही परीक्षा १६ मे रोजी होणार होती. मात्र ती त्यावेळी कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा  मुख्य कार्यालय पुणे यांच्या आदेशानुसार बुधावार दि.११ ऑगस्ट रोजी होणार आहे. याबाबत  अधिक माहिती ही www.navodaya.gov.in https://navodaya.gov.in/nvs/en/Contact-Us/NVS-Hqrs www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/AKOLA-en/home संकेतस्थळ व लिंक्सवर प्रकाशीत करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ७९०८८८३८३५/८०८०४१८६५९/९८२२२३६१२२/९९९९३५०४२५/९४२३२८२२६०/९९२२९४१३७१ येथे संपर्क करावा, असे आवाहन प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय  बाभुळगाव (जहा) जि. अकोला यांनी केले आहे.

आरटीपीसीआरचे ३१० अहवाल प्राप्त ‘शून्य’ पॉझिटीव्ह

  अकोला , दि.२९ ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर)   ३१०   अहवाल प्राप्त झाले. त्यातील   ३१०   अहवाल निगेटीव्ह तर   कुणाचाही   अहवाल पॉझिटीव्ह आला नाही , असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि.२८ )   रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये   एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या   ५७७५९ ( ४३१७६+१४४०६+१७७ ) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर   शून्य   + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   एक   = एकूण पॉझिटीव्ह   एक. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण   ३०४२५९   नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे   ३००७१७    फेरतपासणीचे   ३९७   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे   ३१४५   नमुने होते. आजपर्यंत एकूण   ३०४१४६   अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या   २६०९७०   आहे ,   अशी माहिती शा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले

  अकोला , दि.२९(जिमाका)- सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी , १२ वी , पदवी , पदव्युत्तर , वैद्यकीय , अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमामध्ये मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थी , विद्यार्थिनी यांनी सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण घेवून उत्तीर्ण झाले असतील अशांना महामंडळाकडून गुणानुक्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधीन राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. तरी पात्र विद्यार्थी / विद्यार्थिनींनी जातीचा दाखला , उत्पन्नाचा दाखला , रेशन कार्ड , आधारकार्ड , फोटो , गुणपत्रक व पुढील वर्गात प्रवेश घेतल्याबाबतचा बोनाफाईड प्रमाणपत्र जोडून दि.१० ऑगस्ट पर्यंत जिल्हा व्यवस्थापक , साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. कौलखेड रोड , नालंदा नगरच्या बोडाजवळ , आरोग्य नगर चौक , अकोला येथे दोन   प्रतित अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा. उशिरा प्राप्त झालेला अर्जाचा विचार केला जाणार नाही , असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते विकास कामांचे भुमिपूजन, लोकार्पण

इमेज
  अकोला , दि. २९ (जिमाका)-   राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास ,   शालेय शिक्षण ,   महिला व बालविकास   इतर मागासवर्ग ,   सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग ,   विमुक्त जाती ,   भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण ,   कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ   बच्चू कडू यांच्या हस्ते अकोट तालुक्यात ग्रामपंचायत इमारतीचे भुमिपूजन, ग्रामपंचायत व व्यायामशाळा इमारतींचे लोकार्पण करण्यात आले. अकोट तालुक्यातील ग्रा.पं. तरोडा येथे ग्रामपंचायत सभागृह भुमिपूजन ना. कडू यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर लोतखेड येथे ग्रामपंचायत भवन इमारत व   व्यायामशाळा लोकार्पण   हे कार्यक्रमही ना. कडू यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी लोतखेड येथे दिव्यांग व्यक्तिंचे अनुदानाचे धनादेश तसेच शिधापत्रिकांचे वाटप ही   पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचेकडून पनोरी येथील बुटे कुटुंबाचे सांत्वन व मदतनिधी वाटप

इमेज
  अकोला , दि.२९(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण , महिला व बालविकास , इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक   मागास प्रवर्ग , विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण , कामगार राज्यमंत्री   तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी पनोरी ता.अकोट येथील दिवंगत मुरलीधर आनंदा बुटे यांच्या परिवारास सांत्वनपर भेट दिली. मुरलीधर आनंदा बुटे यांचे नुकतेच गावच्या नाल्याच्या पुरात बुडून निधन झाले. आज पालकमंत्री ना.कडू यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. कुटुंबियांचे सांत्वन केले. बुटे यांचा मुलगा महेश व मुलगी वैष्णवी असे दोघेच वारस आहेत. त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकूण चार लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदानाचा धनादेश पालकमंत्र्यांनी सुपूर्द केला. या कुटुंबाला अन्य योजनांमधून मदत मिळवून देऊ , तसेच त्यांचे घराचे पुर्णतः नुकसान झाले असून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देऊ. शिवाय मुलगा महेश याला शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वस्त केले. पनोरी गावच्या नाल्याचे खोलीकरण , तसेच गावच्या रस्त्याचे काम लवकरात लवकर जिल्हा नियोजन समितीच्