पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अकोला लोकसभा मतदारसंघ मतदानाला प्रारंभ

इमेज
  अकोला लोकसभा मतदारसंघ मतदानाला प्रारंभ अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजता पासून विविध मतदान केंद्रावर शांततेत मतदानाला सुरुवात झाली. विविध मतदान केंद्रांवर विविध थीम साकारण्यात आले असून महिला युवा दिव्यांग विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. उन्हाचा पारा कमी झाल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. मतदारांनी आपला हक्क बजावावा, असे आवाहन माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले सपत्निक मतदान

इमेज
  जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले सपत्निक मतदान अकोला दि २६ : जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी सीताबाई कला महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर  सकाळी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला.  जिल्हाधिका-यांसमवेत डॉ.जुईली अजित कुंभार यांनीही मतदान केले. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मतदान आपला महत्त्वाचा अधिकार असून प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी कुंभार यांनी सीताबाई कला महाविद्यालयातील मतदान केंद्रावरील सुविधांचा आढावा घेतला

मतदारसंघात 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग

इमेज
  मतदारसंघात 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग अकोला, दि. 25 : अकोला लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के   मतदान केंद्रांवर   वेब कास्टिंग   करण्यात येत आहे. एकूण 2 हजार 56 मतदान केंद्रांपैकी एकूण 1 हजार 38 मतदान केंद्रांवर   वेब कास्टिंग निश्चित आहे.   याअनुषंगाने नियोजनभवनात जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला असून, वेब कास्टिंग, जीपीएस कंट्रोल, पोल डे मॉनिटरिंग, ईव्हीएम मॉनिटरिंग आदी कार्यवाही स्वतंत्रपणे होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी आज या यंत्रणेची पाहणी करून सतर्क राहून कामे करण्याची सूचना दिली. आदर्श आचारसंहिता कक्षाचे रामदास सिद्धभट्टी, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले,जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, सहायक जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी आदी उपस्थित होते.   अकोट विधानसभा मतदारसंघात 168, बाळापूर मतदारसंघात 170, अकोला (पश्चिम) मतदारसंघात 160, अकोला (पूर्व) मतदारसंघात 177, मूर्तिजापूरमध्ये 193 व रिसोड मतदारसंघातील 170 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. याद्वारे मतदान केंद्रांवर थेट देखरेख ठे

लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान; पथके केंद्रांवर रवाना

मा.भारत निवडणूक आयोगाकडील दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्‍या संदर्भिय प्रेस नोट व्‍दारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला असून त्‍याअंतर्गत 06-अकोला लोकसभा मतदार संघाकरीता मतदान दिनांक 26/04/2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीतसंपन्‍न होणार आहे. त्‍याअनुषंगाने आज दिनांक 25/04/2024 रोजी 06-अकोला लोकसभा मतदार संघाअंतर्गत सर्व 6 विधानसभा मतदार संघामधील मतदान पथके रवाना झाली आहेत.             निवडणूक नियमानुसार दिनांक 24/04/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता निवडणूकीचा जाहीर प्रचार थांबला आहे. v   मतदान केंद्रे व मतदान पथकेः 06-अकोला लोकसभा मतदार संघाअंतर्गत 28-अकोट , 29-बाळापूर , 30-अकोला (पश्चिम) , 31- अकोला (पूर्व) , 32-मुर्तीजापूर (अ.जा.) व 33-रिसोड विधानसभा मतदार विभागातील एकूण 2056 मतदान केंद्रांकरीता नियुक्‍त मतदान पथके व वाहनांची माहिती खालीलप्रमाणे आहे.   अ.क्र. विधानसभा मतदार विभाग क्रमांक व नांव मतदान केंद्रांची संख्‍या नियुक्‍त मतदान पथके (राखीव सह) कर्मचारी संख्‍या 1