पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम;आकाशवाणी अकोला केंद्रावर आजपासून विशेष कार्यक्रम ‘प्रगतीची पाऊले’ द्वारे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य योजनांची माहिती

  अकोला , दि.२८ ( जिमाका)- जिल्हा नियोजन समितीच्या विशेष घटक योजना या अंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत साध्या सोप्या भाषेत पोहोचविण्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रावरुन मंगळवार दि.१ मार्च पासून ‘प्रगतीची पाऊले’ हा विशेष कार्यक्रम सुरु होत आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय अकोला यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी सहकार्य केले आहे. दि. १४ मार्च पर्यंत या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार दररोज सकाळी साडेआठ आणि रात्री नऊ वाजता प्रसारित होईल,असे आकाशवाणी अकोला केंद्राच्या वतीने कळविण्यात आले आहे. ०००००

कोविडःआरटीपीसीआर व रॅपिडमध्ये शुन्य पॉझिटिव्ह; एक मृत्यू तर आठ डिस्चार्ज;

अकोला दि .28( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून   ( सायंकाळी पाच वाजे पर्यंत)   कोरोना संसर्ग   तपासणीचे   ( आरटीपीसीआर)   38 अहवाल प्राप्त झाले.   त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह   आला . तसेच खाजगी लॅब मधून ए काचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आ ला. तर दिवसभरात आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला , असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दरम्यान   काल (दि. 27 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट   मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला.    त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65141 ( 491 4 4 + 15032 + 965 ) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.   आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर   (शा.वै.म. शुन्य व खाजगी 1 ) 01   +   रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य=   एकूण पॉझिटीव्ह 01 . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 368402 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 364247 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3705 नमुने होते. आजपर्यंत एकूण 36840

क्रीडा प्रबोधिनीमार्फत खेळाडूंचे ‘टॅलेंट सर्च’ ला मुदतवाढ

  अकोला , दि. 28 ( जिमाका) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे उद्देशाने संचालनालयाअंतर्गत ११ क्रीडा प्रबोधिनींची स्थापना केली आहे. या क्रीडा प्रबोधिनीमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे यासाठी शासनातर्फे कौशल्य प्राप्त खेळाडूची   ‘टॅलेंट सर्च’ मोहिम राबविली जात आहे. आता या मोही मेला मंगळवार दि. 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे. राज्यातील एकूण नऊ क्रीडा प्रबोधिनिमध्ये प्रवेशासाठी सरळ प्रवेश प्रक्रीया व कौशल्य चाचणी अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यासाठी शासनाच्या वतीने भरती प्रक्रीया सुरु करणार आहे. यासाठी विभागस्तरावर चाचण्यांचे आयोजन करून खेळाडूंची राज्यस्तर चाचणीकरीता निवड केली जाणार आहे. यामध्ये आर्चरी, ज्युदो, हॅण्डबॉल, ॲथलेटिक्स, बॉक्सींग, बॅडमिंटन, शुटींग, कुस्ती, हॉकी, टे

कळंबा(कसुरा), मुंडगाव, वडाळी(देशमुख) येथील वीज उपकेंद्रांचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते लोकार्पण

इमेज
  अकोला , दि.२८ ( जिमाका)- राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या बाळापूर तालुक्यातील कळंबा(कसुरा), अकोट तालुक्यातील मुंडगाव व वडाळी(देशमुख) येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यास अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, कार्यकारी अभियंता पायाभुत सुविधा यामिनी पिंपळे, अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट तसेच अशोक अमानकर, डॉ. प्रशांत वानखडे, राजेंद्र तरवाडे, प्रमोद डोंगरे, महेंद्र गवई आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कोनशीला अनावरण करुन उपकेंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. आपल्या संबोधनात डॉ. राऊत म्हणाले की, रब्बी हंगामाच्या काळात अनेकदा शेतकरी बांधवांना कमी दाबाने विजेचा पुरवठा होतो. शेतकरी बांधवांची समस्या लक्षात घेउन महावितरणने उच्च दाब वितरण योजनेत अकोला जिल्ह्यासाठी आठ नवीन वीज उपकेंद्रांना मंजुरी दिली होती. आपल्या भाषणात डॉ. राऊत यांनी सांगितले की, नवीन वीज उप केंद्रामुळे ३६ गावातील सुमारे ४ हजार वीज ग्राहकांना याचा लाभ

वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैव विविधता उद्यानांची निर्मिती करा- उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

इमेज
  अकोला , दि.२८(जिमाका)- प्रदूषण तसेच अन्य पर्यावरणीय समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून पारस सह राज्यातील सर्व वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैव विविधता उद्याने निर्माण करण्यात यावेत , त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून प्रस्ताव पाठवावे , असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले. पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे आज डॉ.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अकोला आणि वाशीम या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस महावितरणचे   अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये , महापारेषणचे   अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता   बी.टी. राऊत , महानिर्मितीचे पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे   मुख्य अभियंता   विठ्ठल खराटे तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याबैठकीत अकोला , बुलडाणा , वाशीम या जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. आढावा निर्मिती , पारेषण व वितरण या अनुषंगाने घेण्यात आला. डॉ.राऊत यांनी उपस्थितांना निर्देश दिले की , वीज निर्मिती प्रकल्पांच्या परिसरात प्रदूषण व अन्य पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना म्हणून जैवविविधता उद्यानांची निर्मिती करावी.

बोरगाव मंजू, घोटा आणि कोथळी येथील वीज उपकेंद्रांचे लोकार्पण ;शाश्वत आणि दर्जेदार सेवेसाठी कटीबद्ध-उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

इमेज
  अकोला , दि.२७ ( जिमाका)- शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शाश्वत वीज पुरवठा आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी शासनाचा उर्जा विभाग कटिबद्ध आहे,असे प्रतिपादन राज्याचे उर्जा मंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी केले. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू , बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा   येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,   कार्यकारी अभियंता पायाभुत सुविधा यामिनी पिंपळे,   अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट तसेच अशोक अमानकर, डॉ. सुभाष कोरपे, राजेंद्र तरवाडे, प्रमोद डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आपल्या संबोधनात डॉ. राऊत म्हणाले की, अकोला जिल्हा हा कृषी प्रवण जिल्हा म्हणुन ओळखला जातो. येथिल कृषी प्रवण भागात रब्बी हंगामाच्या काळात अनेकदा शेतकरी बांध

कोविडःआरटीपीसीआरमध्ये पाच पॉझिटिव्ह, सहा डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन एक पॉझिटीव्ह

अकोला दि .27( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून   ( सायंकाळी पाच वाजे पर्यंत)   कोरोना संसर्ग   तपासणीचे   ( आरटीपीसीआर)  225 अहवाल प्राप्त झाले.   त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह   आला . तसेच खाजगी लॅब मधून एक असे एकूण पाच जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले . तर दिवसभरात सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला , असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दरम्यान   काल (दि. 26 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट   मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.    त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65140 ( 491 4 4 + 15032 + 964 ) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.   आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर   (शा.वै.म. 4 व खाजगी 1 ) 05   +   रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 1=   एकूण पॉझिटीव्ह 06 . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 368374 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 364259 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3705 नमुने होते. आजपर्यं

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग; 7 हजार 157 परिक्षार्थ्यांनी दिली दुय्यम सेवा संयुक्त पुर्व परीक्षा

    अकोला , दि. 26   ( जिमाका)-   महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवारी   ( दि26 ) रोजी जिल्ह्यात   महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग   दुय्यम सेवा संयुक्त (पुर्व) परि क्षा 35 उपकेंद्रावर   सुरळीत पार पडली. परीक्षेकरीता एकुण 8 हजार 894 परिक्षार्थी   पैकी 7 हजार 157 परिक्षार्थी परिक्षेस उपस्थित होते. तर 1 हजार 797 परिक्षार्थी अनुपस्थित होते , अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.     एमपीएससी परिक्षेकरीता कोविड प्रतिबंधात्मक सर्व उपायोजना करण्यात आले होते. परिक्षेकरीता उपस्थित परिक्षार्थींना तसेच परिक्षेकरीता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हातमोजे , मास्क , सॅनिटायर , फेसशिल्ड   इत्यादी साहित्य पुरविण्यात आले होते. तसेच नियुक्ती अधिकारी यांना प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी पाच पीपीई किट पुरविण्यात आले. परिक्षाकरीता आलेल्या प्रत्येकांचे थर्मल स्कॅनिंग व परीक्षा केंद्र सॅनिटाईझ करण्यात आले होते. एमपीएससी परीक्षा यशस्वी करण्याकरीता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहिले. तर उ