2517 अहवाल प्राप्त, 561 पॉझिटीव्ह, 845 डिस्चार्ज, 14 मृत्यू
अकोला,दि.13(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2517 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1956 अहवाल निगेटीव्ह तर 561 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 845 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 14 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.12) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 195 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 48553(36993+11383+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे
एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 561+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 195= एकूण पॉझिटीव्ह- 756.
शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 234743 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 231778
फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2575 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 234621 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 197628 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे.
561 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 561 अहवाल
पॉझिटीव्ह आले. त्यात 245 महिला व 316
पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-44,
अकोट-24, बाळापूर-63, तेल्हारा-110,
बार्शी टाकळी-34, पातूर-76, अकोला-210. (अकोला ग्रामीण-56, अकोला मनपा क्षेत्र-154)
दरम्यान काल (दि. 12)
रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 195 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण
संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
845 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 37, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, देवसर हॉस्पीटल येथील दोन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील
एक, यकीन हॉस्पीटल येथील एक, गोयका
हॉस्पीटल येथील आठ, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील दोन,
आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल
येथील चार, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे
हॉस्पीटल येथील पाच, आधार हॉस्पीटल येथील नऊ, के.एस. पाटील हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल
येथील एक, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, काळे
हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील 10, मुलाचे वसतीगृह मुर्तिजापूर येथील एक, ठाकरे
हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील आठ,
समाज कल्याण वसतीगृह येथील पाच, कोविड केअर
सेंटर तेल्हारा येथील चार, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील
एक, सोनोने हॉस्पीटल येथील एक, तर होम
आयसोलेशन मधील 728 असे एकूण 845 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती
जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
14 जणांचा मृत्यू
आज दिवसभरात 14
जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खेतान नगर येथील 76 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 3 मे रोजी दाखल
करण्यात आले होते. तर अन्य दहिहांडा ता. अकोट येथील 75 वर्षीय
महिला असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते,
किनखेड ता. अकोट येथील 71 वर्षीय महिला असून
या रुग्णास दि. 12 रोजी
दाखल करण्यात आले होते, घोडेगाव ता. तेल्हारा येथील 65
वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 11 रोजी
दाखल करण्यात आले होते. पातूर येथील 55 वर्षीय महिला असून या
रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते, तर काळेगाव ता. तेल्हारा येथील 82 वर्षीय पुरुष असून
या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते. राजंदा ता. बार्शीटाकळी येथील 58 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल
करण्यात आले होते, शिवर येथील 64 वर्षीय
पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते,
गोरेगाव येथील 39 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 11 रोजी
दाखल करण्यात आले होते, डाबकी रोड येथील 65 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 4 एप्रिल रोजी
दाखल करण्यात आले होते, निराट वैऱ्हाट येथील पुरुष रुग्णास
दि. 8 मे रोजी दाखल करण्यात आले होते, न्यु
तापडीया नगर येथील 83 वर्षीय महिलाअसून या रुग्णास दि. 8
रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 34
वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 12 रोजी
दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी येथील 68 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल
करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात
आली.
6709 जणांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा