पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात ५२९ चाचण्या; ११ पॉझिटीव्ह

अकोला,दि. 31(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या ५२९ चाचण्या झाल्या त्यात ११ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात  अकोट येथे २२ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर बार्शिटाकळी येथे २१५, बाळापूर येथे ११५, तेल्हारा येथे १०२, मुर्तिजापूर येथे १३, अकोला आयएमए येथे तीन तर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २३ चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३६ चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात २९ हजार ४३३ रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी १९३७ पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

फुलोंके रंगसे...सदिच्छा, शुभेच्छांचे टोकन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या प्रांगणातील फुल शेतीला बहर

 

शासकीय वसतीगृहासाठी अकोट येथे खाजगी जागेची आवश्यकता

  अकोला , दि. 31 (जिमाका)- अकोट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहाकरीता खुल्या जमीनीची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील मागासवर्गीय मुलांमुलींचे शिक्षण सुखकर व सोयीचे व्हावे. तसेच त्यांना सोयीसुविधा व्हावी यासाठी अकोट शहरातील मोक्याच्या ठिकाणी बांधकाम करण्यायोग्य कमीतकमी दोन एकर खाजगी जमीन शासकीय   वसतीगृहासाठी आवश्यक आहे. इच्छुक जमीन मालकांनी व व्यक्तींनी अकोट शहरात किवा शहरालगत असलेली जमीनी विक्रीयोग्य आहे त्यानी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अकोला येथे संपर्क करावा.

फुलोंके रंगसे...सदिच्छा, शुभेच्छांचे टोकन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या प्रांगणातील फुल शेतीला बहर

इमेज
  अकोला , दि.३१ ( जिमाका)- फुलोंके रंगसे... दिल की कलम से... ! साहित्यिक, कविंपासून ते सामान्य नागरिकांना भुरळ घालणारी फुलं, ही निसर्गाची एक सुंदर रचना. नयनरम्य,सुंदर, सुवासिक, रंगीत   फुलांचे साऱ्यांनाच आकर्षण. म्हणूनच की काय फुलं ही सदिच्छा, शुभेच्छा, आशिर्वाद, भक्ती या भावनांचे ‘टोकन’ झाले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांच्या पुष्पशास्त्र व प्रांगण विकास विभागाच्या फुलशेतीच्या विविध प्रक्षेत्रातली बहरुन आलेली फुलशेती सध्या सर्वांनाच आकर्षित करीत आहे. सदिच्छा आणि शुभेच्छांचे ‘टोकन’ असलेल्या फुलांची शेती आणि त्यातून मिळणारे आर्थिक उत्पादन या व्यतिरिक्त फुलांची सजावट, विक्री, फुलमाळा बनवणे यातून एक मोठी   चलनवलनाची ‘माळ’ गुंफली जाते. शेवंती, गुलाब, निशिगंध, मोगरा, दहेलिया, गॅलार्डिया, ग्लॅडीओलस अशा अनेक देशी विदेशी फुलांनी   येथील डॉ. पंजाबराव देशमुख   कृषि विद्यापीठाच्या   पुष्पशास्त्र व प्रांगण विकास विभागाची फुलशेती सध्या बहरुन आली आहे. या विभागातून मिळणारे प्रशिक्षण, सेवा या जिल्ह्यात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे. सध्या शेवंती बहराला आह

230 अहवाल प्राप्त; 31 पॉझिटीव्ह, 16 डिस्चार्ज, तीन मयत

अकोला , दि. 31 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे   230 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 199 अहवाल निगेटीव्ह तर 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 16 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे .   दरम्यान आज तीन जणांचे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचेही जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 30 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आ ले होते . त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 10478 ( 8425 + 1876 + 177 ) झाली आहे , अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.              शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 70013 जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 68365 फेरतपासणीचे 285 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1363 नमुने होते. आजपर्यंत एकूण 69916 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 61491 तर पॉझिटीव्ह अहवाल 10478 ( 8425 + 1876 + 177

मिशनबिगीन अंतर्गत 31 जानेवारीपर्यंत आदेश कायम - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

           अकोला , दि.30(जिमाका)- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात   31 डिसेंबरपर्यंत आदेश लागू करण्यात आले होते.   महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हे आदेश कायम ठेवण्यात आले असून त्याची मुदत दि. 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापुर्वी प्रशासनाव्दारे लावण्यात आलेले निर्बंधामध्ये देण्यात आलेली सुलभता व टप्पानिहाय लॉकडाऊन उघडण्याबाबतचे आदेश कायम ठेवण्यात येत असल्याचे   जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे.   हे आदेश दि. 31 जानेवारीचे मध्‍यरात्रीपर्यंत संपूर्ण अकोला   शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील , असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

38 हजार 895 ची अवैध दारु जप्त; राज्य उत्पादन विभागाची कामगिरी

इमेज
  अकोला , दि. 30 (जिमाका)- ग्राम पंचायत निवडणूक तसेच नाताळ व नववर्षाचे अनुषंगानेअवैध मद्यविक्रीस आळा घालण्यासाठी अधिक्षक , राज्य उत्पादन शुल्क , अकोला   या कार्यालयाकडून दानापूर ता. तेल्हारा, माळसुळ व आलेगाव ता. पातुर, दुदलाम ता. अकोला तसेच पिंपळगाव चांभारे ता. बार्शिटाकळी   येथे विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत   आतापर्यंत सहा गुन्हे नोंदविण्यात आले असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अद्याप पर्यंत 38 हजार 895 चा मुद्देमाल   जप्त करण्यात आला असून हे धाडसत्र सुरु राहिल असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ यांनी कळविले आहे. दानापूर ता. तेल्हारा, माळसुळ व आलेगाव ता. पातुर, दुदलाम ता. अकोला तसेच पिंपळगाव चांभारे ता. बार्शिटाकळी   याठिकाणी ही कारवाई आज करण्यात आली.   या विशेष मोहीममध्ये मुंबई दारूबंदी कायदा 1949 च्या विविध कलमाखाली एकुण सहा गुन्हे नोंद करण्यात आले. या कारवाईत एकुण तीन आरोपीना अटक करून त्यामध्ये 4.5 लि. देशी दारू , हातभट्टी दारू 10 लि. व 1660 लि. मोहा रसायन असा एकुण 38 हजार 895 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्हा अन्वेषण क

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 287 चाचण्या; दोन पॉझिटीव्ह

अकोला , दि. 30 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 287 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात   अकोट येथे 17 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोट येथे 75, बार्शिटाकळी येथे 25, तेल्हारा येथे 59, मुर्तिजापूर येथे 16, अकोला आयएमए येथे 55, हेडगेवार लॅब येथे सहा, तर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 10 चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 24 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 28   हजार 904 रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी 1926 पॉझिटीव्ह आले आहेत ,   असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे .  

243 अहवाल प्राप्त; 13 पॉझिटीव्ह, 109 डिस्चार्ज

  अकोला , दि. 30 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे   243 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 230 अहवाल निगेटीव्ह तर 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 109 जणांना   डिस्चार्ज देण्यात आला आहे , असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 29 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आ ले होते . त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 10445 ( 8394 + 1874 + 177 ) झाली आहे , अशी   माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.              शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 69747 जणांचे   अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 68105 फेरतपासणीचे 279 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1363 नमुने होते. आजपर्यंत एकूण 69686 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 61292 तर पॉझिटीव्ह अहवाल 10445 ( 8394 + 1874 + 177 ) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

रेडक्रॉसच्या ‘मास्क वाटप’अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ

इमेज
  अकोला , दि.२९ (जिमाका)-   कोविड १९ च्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी मास्क वापरणे हा एक प्रभावी उपाय आहे. या पार्श्वभुमिवर  इंडियन रेडक्रॉस संस्थेच्या अकोला शाखेच्या वतीने मास्क वाटप हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम स्तुत्य असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. आज रेडक्रॉस या संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मास्क वाटप करण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. किशोर मालोकार, ॲड. महेंद्र साहू,  प्रभजितसिंह बछेर, राजाभाऊ देशमुख, अरुंधतीताई शिरसाट, ॲड. सुभाष मुंगी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

  अकोला , दि.२९ (जिमाका)-   जिल्ह्याकरीता जानेवारी २०२१ करीता लक्ष्यनिर्धारित  सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य / नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचे परिमाण निश्चित करण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.   वाटप परिमाणे व दर याप्रमाणे- प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना गहू- प्रति व्यक्ती   तीन किलो (दोन रुपये प्रति किलो), प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ- प्रति व्यक्ती दोन किलो (तीन रुपये प्रति किलो), अंत्योदय योजना गहू- १५ किलो प्रति कार्ड ( दोन रुपये प्रति किलो), अंत्योदय योजना तांदूळ- २० किलो प्रति कार्ड ( तीन रुपये प्रति कार्ड),   एपीएल शेतकरी कुटूंब लाभार्थ्यांना गहू – चार किलो प्रति व्यक्ती(दोन रुपये प्रति किलो),   एपीएल शेतकरी कुटूंब लाभार्थ्यांना तांदूळ – एक किलो प्रति व्यक्ती (तीन रुपये प्रति किलो), नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांकरीता- एक किलो प्रति शिधापत्रिका (वीस रुपये प्रति किलो). या प्रमाणे परिमाण उपलब्ध झाले असून वाटप परिमाण गोदामातील साठा व लाभार्थी संख्या उपलब्धतेनुसार राहील असेही जिल्हा पुरवठा अधिकारी

कोविडचा नवा म्युटंट स्ट्रेन; जिल्हा प्रशासन सतर्क: विदेशातून आलेले व त्यांच्या संपर्कातील लोकांनी चाचणी करुन घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

  अकोला , दि.२९ (जिमाका)-   कोविड १९ च्या नव्या म्युटंट स्ट्रेन आढळून आला असल्याने जिल्हास्तरावर खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत. अकोला जिल्ह्यात विदेशातून आलेले लोक व त्यांच्या संपर्कातील लोक यांनी स्वतःहून कोविडची चाचणी ( RTPCR) करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. यासंदर्भातील जिल्ह्यातील स्थितीचा आढावा आज जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.   यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी   संजय खडसे आदी उपस्थित होते. यावेळी   जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी माहिती दिली की,   राज्यस्तरीय कक्षातून जिल्ह्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १५ जण हे विदेशातून आले आहेत. त्यातील १२ जणांचा प्रशासनाचा संपर्क झाला आहे. तीन जण अद्यापही संपर्कात नाहीत. या १२ जणांची   चाचणी झाली असून त्यातील पाच जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उर्वरित सात जणांचे अहवाल अद्याप प्राप्त व्हायचे आहेत.   दरम्यान लंडनहून आल

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात ९३ चाचण्या; आठ पॉझिटीव्ह

  अकोला , दि. २९  (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या ९३ चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात   अकोट येथे १९ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सात जण पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे तीन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एक जण पॉझिटिव्ह आला. तर   तेल्हारा येथे नऊ, मुर्तिजापूरे येथे सहा, आयएमए येथे सहा, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २०, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३० चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात २८   हजार ६१७ रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी १९२४ पॉझिटीव्ह आले आहेत ,   असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे .  

३९३ अहवाल प्राप्त; ३३ पॉझिटीव्ह, ७२ डिस्चार्ज, एक मयत

  अकोला , दि. २९(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे  ३९३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३६० अहवाल निगेटीव्ह तर ३३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर ७२ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान आज एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. त्याच प्रमाणे काल (दि.२८) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या   १०४२४ ( ८३८१+१८६६+१७७) झाली आहे , अशी   माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.              शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण   ६९६२८ जणांचे   अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६७९९१ फेरतपासणीचे २७८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३५९ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६९४४३ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६१०६२ तर पॉझिटीव्ह अहवाल १०४२४ ( ८३८१+१८६६+१७७) आहेत , अशी माहिती शा

ग्रामपंचायत निवडणूक: नामनिर्देशन पत्रे व जात पडताळणी प्रस्ताव ‘ऑफलाईन’ पद्धतीने स्विकारणार

  अकोला , दि. २९(जिमाका)- ग्रामपंचायत निवडणूकीची नामनिर्देशन पत्रे  ऑनलाईन पद्धतीने सादर करतांना  तांत्रिक अडचणी, इंटरनेटचा वेग कमी असणे, सर्व्हर डाऊन होणे अशा तक्रारी येत असल्याने नामनिर्देशनपत्रे पारंपारिक पद्धतीने म्हणजेच ‘ऑफलाईन’ पद्धतीने स्विकारण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. तसेच नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यासाठी दि.३० रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ वाढविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. त्याच प्रमाणे जात वैधता पडताळणी प्रस्तावही ऑफलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहेत असे कळविण्यात  आले  आहे. या संदर्भात   दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,   राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार   जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दि.२३ पासून नामनिर्देश पत्रे ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येत आहेत.   मात्र दि.२८ रोजी सायंकाळ पासून तांत्रिक अडचणी   निर्माण होत होत्या. त्याबाबतच्या तक्रारी आयोगाला प्राप्त होत होत्या. ही बाब विचारात घेता आयोगाने   इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासूच वंचित राह

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात ९० चाचण्या; एक पॉझिटीव्ह

  अकोला , दि.२८ (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या ९० चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात   अकोट येथे १६, बाळापूर येथे ११, बार्शी टाकळी येथे एक, आयएमए येथे ११, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २०, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १८ चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर तेल्हारा येथे १३ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात २८   हजार ५२३ रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी १९१६ पॉझिटीव्ह आले आहेत ,   असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे .  

९२ अहवाल प्राप्त; १४ पॉझिटीव्ह, १६ डिस्चार्ज, दोन मयत

  अकोला , दि. २८(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे  ९२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७८ अहवाल निगेटीव्ह तर १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर १६ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान आज दोन जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचेही जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. त्याच प्रमाणे काल (दि.२७) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या   १०३९०(८३४८+१८६५+१७७) झाली आहे , अशी   माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.              शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण   ६९२१४ जणांचे   अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६७५८० फेरतपासणीचे २७८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३५६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६९०५१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६०७०३ तर पॉझिटीव्ह अहवाल १०३९०(८३४८+१८६५+१७७) आहेत , अशी माहिती शासकीय व

नाफेड मार्फत तूर खरेदी;ऑनलाईन नोंदणी सुरु

  अकोला , दि.२८ (जिमाका)-   खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत तूर खरेदीसाठी  ऑनलाईन प्रक्रिया आज (दि.२८) पासून सुरु झाली असून शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या  खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अकोला यांनी केले आहे. या नोंदणीसाठी  ऑनलाईन सातबारा उतारा (त्यात २०२०-२१ च्या तूर पिक पेऱ्याची नोंद आवश्यक). आधार कार्ड झेरॉक्स प्रत, आधार संलग्नित  बॅंक खाते पासबुकाची स्पष्ट दिसणारी झेरॉक्स प्रत सोबत जोडावी,असेही  जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी कळविले आहे.

३०-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघ: छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध; दोन दिवसांत छायाचित्रे जमा करण्याचे आवाहन

  अकोला , दि.२८ (जिमाका)-   येथील ३०- अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत २६ हजार ५८७  मतदार असे आहेत ज्यांची छायाचित्रे नाहीत. अशा मतदारांची यादी ही  संबंधित मतदान केंद्रावर,  जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या www.akola.nic.in   या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी ज्या मतदारांच्या नावापुढे छायाचित्र नसेल त्यांनी  दोन दिवसांच्या आत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा करावीत, अन्यथा ही नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, असे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी ३०- अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघ यांनी आवाहन केले आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की,   मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार, मतदार यादीमध्ये मतदारांचे छायाचित्र नसणे, मतदार ओळखपत्र क्रमांक नसणे अशा मतदारांची छायाचित्रे घेऊन मतदार यादी अद्यावत करावी व जे मतदार त्या भागात रहात नाहीत किंवा आढळून येत नाहीत त्यांच्याबाबत रितसर नावे वगळण्याबाबत कार्यवाही करण्यात आली.   त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय   अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी   जाऊन यादी अद्यावत केली आहे. याअंतर्गत ३०-अकोला पश्चिम या विधा

स्व.डॅडी देशमुख जयंती समारोह व पुरस्कार वितरण सोहळा: पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळ सन्मानित

  अकोला , दि.२७(जिमाका)- स्व. बाबुराव साहेबराव उपाख्य डॅडी देशमुख जयंती समारोह व पुरस्कार वितरण सोहळा आज येथे पार पडलायावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळ यांना डॅडी देशमुख स्मृती जीवन गौरव पुरस्काराने राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास ,   शालेय शिक्षण ,   महिला व बालविकास ,   इतर मागासवर्ग ,   सामाजिक व शैक्षणिक   मागास प्रवर्ग ,   विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण ,   कामगार राज्यमंत्री   तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले. हॉटेल सेंटर प्लाझा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या समवेत विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी , महापौर अर्चनाताई मसने , माजी आमदार तुकाराम बीडकर , बल्लूभाऊ जवंजाळ , प्रा.डॉ.संतोष हुसे तसेच संयोजन समितीचे प्रा.मधु जाधव , संजय खडपकर , सदाशिव शेळके , अशोक रहाटे , प्रशांत देशमुख तसेच देशमुख परिवारातील सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अर्चनाताई मसने या होत्या.   उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन भाऊसाहे

स्व.डॅडी देशमुख जयंती समारोह व पुरस्कार वितरण सोहळा

  ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळ डॅडी देशमुख स्मृती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात २४ चाचण्या; कुणीही पॉझिटीव्ह नाही

  अकोला , दि.२७ (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या २४ चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २२   तर हेडगेवार प्रयोगशाळेत दोन अशा एकूण २४ चाचण्या झाल्या. त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात २८   हजार ४५७ रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी १९१५ पॉझिटीव्ह आले आहेत ,   असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे .