रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 2204 चाचण्यात 195 पॉझिटीव्ह


 अकोला,दि. 1(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.30) दिवसभरात झालेल्या 2201 चाचण्या झाल्या त्यात 195 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

  काल दिवसभरात अकोला येथे 55 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,  अकोट येथे 135 चाचण्या झाल्या त्यात  नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बाळापूर येथे 39 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी येथे 50 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, पातूर येथे 28 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 43 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 208 चाचण्या झाल्या त्यात 37 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे 1466 चाचण्या झाल्या त्यात 67 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 18 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 79 चाचण्या झाल्या त्यात 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 72  चाचण्या झाल्या त्यात 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 11 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 2204 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 195 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 10 हजार 825 चाचण्या झाल्या पैकी 9162 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन