पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पीएम किसान योजनेची वार्षिक ई-केवायसी ३० जूनपूर्वी पूर्ण करा

                                    पीएम किसान योजनेची वार्षिक ई-केवायसी ३० जूनपूर्वी पूर्ण करा  प्रशासनाचे आवाहन              अकोला, दि. २९ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पुढील हप्ता अखंडित सुरू ठेवण्यासाठी ३० जूनपूर्वी आपली वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.              योजनेमध्ये पारदर्शकता आणणे , गळती रोखणे आणि केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थींपर्यंतच शासनाचे अर्थसाहाय्य पोहचवणे हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्यभरात २० मे २०२६ पासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. प्रशासकीय स्तरावर यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून , गावपातळीवर याबद्दल जनजागृती करण्य...

‘बीएलओं’ना सहकार्य करा : मतदार नोंदणी अधिकारी

  ‘बीएलओं’ना सहकार्य करा : मतदार नोंदणी अधिकारी अकोला, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 'विशेष सखोल पुनरीक्षण' कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करणे, नावात चूक दुरूस्ती करणे, मयत/स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळणे यांसारखी महत्त्वाची कामे केली जात आहेत. या अनुषंगाने आपल्या घरी येणारे बीएलओ  हे शासन नियुक्त कर्मचारी असुन त्यांनी विचारलेली माहिती देणे हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनातर्फे दि. 30 मे ते 2 जून या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण कागदपत्रांसह शिबिराला भेट देऊन आपले मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निखील खेमनार यांनी केले आहे.   नागरिकांकडून घेतली जाणारी माहिती पूर्णपणे सुरक्षित असून ती केवळ निवडणूक प्रक्रियेसाठीच वापरली जाते. तरी बीएलओ यांना ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड) आणि कुटुंबाची योग्य माहिती देऊन सहकार्य करावे  नागरिकांनी आपली किंवा कुटुंबाची योग्य ...

दिशा समितीची बैठक खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेत विविध योजना व विकासकामांचा आढावा

इमेज
दिशा समितीची बैठक खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेत विविध योजना व   विकासकामांचा आढावा कामे वेळेत पूर्ण करा -        खा. अनुप धोत्रे अकोला, दि. २९ : केंद्र शासनाच्या विविध योजनांतून जिल्ह्यात रस्ते, स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो. अशी कामे रखडता कामा नयेत. ती वेळेत पूर्ण व्हावीत. आवश्यक कामांचे वेळेत प्रस्ताव द्यावेत, तसेच केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना करून द्यावा, असे निर्देश खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे दिले.   जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) समितीची बैठक खासदार श्री. धोत्रे यांच्या अध्यक्षतेत नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार नितीन देशमुख, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, महापौर शारदा खेडकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे, महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांच्य...

वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

  अकोला, दि. 29 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत १२५ वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (आदर्श कॉलनी), अकोला येथील इयत्ता ८ वी ते वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी वसतिगृहातील रिक्त जागांनुसार प्रवेश अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, तसेच अनाथ, अपंग व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी ही सुविधा उपलब्ध असून, वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पात्र व गरजू विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल व्ही. बी. कुळकर्णी यांनी केले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू केले असून अर्जदारांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

  अकोला, दि. २९ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृह, संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान बस्ती, अकोला येथे विद्यार्थिनींसाठी विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या वसतीगृहात इयत्ता ८ वी पासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी निवास, भोजन, अभ्यासिका आदी सर्व सुविधा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दि. २५ मे २०२६ पासून सुरू झाली आहे. शालेय विभागातील (इयत्ता ७ वी उत्तीर्ण) विद्यार्थिनींनी दि. ३० जून पर्यंत अर्ज सादर करावेत. तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी दि. १५ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी https://hmas.mahait.org ही लिंक उपलब्ध असून, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची झेरॉक्स प्रत तसेच सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती वसतीगृह कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी वसतीगृहाच्या गृहपाल आर. जे. लेंडे यांनी विद्यार्थिनींनी व पालकांनी पुढील क्रमांकावर (९४२०४३३९७४, ९५६१३१६०१६, ७४९९६०११६२) संपर्क...

शेतकरी बंधूनी डिएपी खतास पर्यायी खते वापरावीत

अकोला, दि. 29 : राज्यामध्ये मागील ३ वर्षात खरीप हंगामात ४४ लाख मे.टन रासायनिक खतांचा वापर झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने युरिया, डीएपी, एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते व एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) या खतांचा वापर केला जातो. महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. राज्यामध्ये लवकरच पेरणीला सुरुवात होणार असून डिएपी खताची शेतक-यांकडून जास्त मागणी होणार आहे. डिएपी (डी अमोनिअम फॉस्फेट) खता मध्ये १८ टक्के नत्र तर ४६ टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. राज्यामध्ये डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नाही त्यामुळे पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-१६ टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामूळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डिएपीस ...

जनगणना म्हणजे नव्या युगाची सुरुवात

    जनगणना म्हणजे नव्या युगाची सुरुवात   भारताची जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून देशाच्या लोकसंख्यात्मक , सामाजिक , आर्थिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचे व्यापक चित्र सादर करणारी प्रक्रिया आहे. देशातील सर्वात मोठा प्रशासकीय उपक्रम म्हणून ओळख असलेल्या जनगणना गाव आणि शहर पातळीवरील सर्वात विश्वासार्ह माहितीचा स्रोत मानली जाते. पुराव्यावर आधारित शासनव्यवस्था , विकास नियोजन , कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी , शैक्षणिक संशोधन , व्यावसायिक धोरणे , तसेच मतदारसंघ पुनर्रचना आणि लोकप्रतिनिधित्व यांसारख्या लोकशाही प्रक्रियांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते. जनगणनेद्वारे उपलब्ध होणाऱ्या माहितीमुळे शासन आणि विविध संस्था लोकसंख्येतील बदल समजून घेऊन नागरिकांच्या गरजांनुसार धोरणे आखू शकतात. भारताने १८७२ पासून अखंड जनगणनेची परंपरा जपली आहे , त्यामुळे जगातील काही मोजक्या देशांमध्ये भारताला विशेष ऐतिहासिक स्थान प्राप्त झाले आहे. कोविड-१९ महामारीमुळे २०२१ ची जनगणना पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता जनगणना २०२७ ही देशाची एकूण सोळावी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना ठरणार आहे. भारतात जनगणना “ ड...

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आरोग्य विभागाच्या विविध बैठका लिंगनिदान प्रतिबंधासाठी ‘ट्रॅकिंग सिस्टीम’ राबवा पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी

इमेज
  जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आरोग्य विभागाच्या विविध बैठका     लिंगनिदान प्रतिबंधासाठी ‘ट्रॅकिंग सिस्टीम’ राबवा पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी -           जिल्हाधिकारी   अकोला, दि. 29 :   'गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायद्यानुसार कार्यवाहीसाठी   सोनोग्राफी सेंटरच्या अचानक तपासण्या, धाडी यांची संख्या वाढवावी, तसेच ‘ट्रॅकिंग सिस्टीम’ राबवावी. त्याचप्रमाणे, कायद्याची व संबंधित उपक्रमांची प्रभावी जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.     जिल्हा एड्स नियंत्रण समिती, तंबाखूविरोधी अभियान, 'गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायद्यांतर्गत स्थापित समिती आदी विविध बैठका जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत झाल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, डॉ. आशा मिरगे, मोहन खडसे, डॉ. सीमा तायडे, प्रतिभा अवचार, डॉ. विनोद करंजीकर, समितीच्या विधी समुपदेशक ॲड. शुभां...

जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते सुरक्षा समितीची बैठक अपघातप्रवण स्थळी ‘आयटीएमएस’ प्रणाली बसविणार

इमेज
      जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते सुरक्षा समितीची बैठक अपघातप्रवण स्थळी ‘आयटीएमएस’ प्रणाली बसविणार अकोला, दि. २७ : शहरात अपघात टाळण्यासाठी महत्वाच्या अपघात प्रवणस्थळी ‘इंटलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (आयटीएमएस) बसविण्यासाठी जलद कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, उपजिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, निमंत्रित सदस्य प्रदीप गुरूखुद्दे, मनपा उपायुक्त गीता वंजारी, मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके आदी उपस्थित होते.   ‘इंटलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’मध्ये ॲटोमॅटिक नंबरप्लेट रेकग्निशन, ट्रॅफिक व्हायोलेशन डिटेक्शन, सीसीटीव्ही ॲनालिटिक्स, व्हेईकल ट्रॅकिंग आदी सुविधांचा समावेश आहे. ही प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी जलद कार्यवाही व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले. मस्तान चौक ते भोला चौक (अकोटपेठ पुलापर्यंत) दरम्यानची वाहतूक एकेरी करण्याबाबत,...

माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण करा - कामगार मंत्री आकाश फुंडकर

इमेज
  माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण करा -            कामगार मंत्री आकाश फुंडकर   मुंबई , दि. २६: एसटी पार्सल सेवा देणाऱ्या कंत्राटदारांनी माथाडी कायद्याला अनुसरून कामगारांना त्यांचे सर्व कायदेशीर लाभ मिळवून दिले पाहिजेत. तसेच कायद्याप्रमाणे माथाडी कामगारांच्या हिताचे पूर्ण संरक्षण केले जावे , असे स्पष्ट निर्देश कामगार मंत्री ॲड.  आकाश फुंडकर यांनी दिले.   नरिमन भवन येथे कामगार ॲड. आकाश फुंडकर मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत बैठक पार पडली. बैठकीस कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन , कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड , उपसचिव स्वप्निल कापडणीस आदी उपस्थित होते. तसेच आमदार सदाभाऊ खोत यांनी दूरसंवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.   कामगार मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले , मे. ज्युबिलन्ट फूड वर्क प्रा. लिमिटेड या औद्योगिक आस्थापनाने स्थानिक भूमिपूत्र बेरोजगारांना रोजगाराची संधी दिली पाहिजे आणि तेथील माथाडी टोळीला तत्काळ मान्यता द्यावी. नवीन माथाडी कामगारांची नोंदणी करण्य...

पुढील २ दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

    पुढील २ दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन अकोला, दि. २६ : जिल्ह्यात २६ ते २८ मे दरम्यान उष्णतेची लाट राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. त्यानुसार नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दु. १२ ते ४ दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळा. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. ज्वलनशील पदार्थापासून दूर राहावे. लहान मुले व   पाळीव   प्राण्यांना दरवाजा बंद असलेल्या वाहनात किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. तहान असो किंवा नसो; भरपूर पाणी प्यावे. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. पशुधनास तसेच   पाळीव   प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे, आदी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ०००

नियोजन वृक्षलागवडीचे; जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक यंदा जिल्ह्यात ३१ लक्ष २८ हजार झाडे लावणार सर्व विभागांनी समन्वयाने उद्दिष्ट पूर्ण करावे - जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  नियोजन वृक्षलागवडीचे; जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक यंदा जिल्ह्यात ३१ लक्ष २८ हजार झाडे लावणार सर्व विभागांनी समन्वयाने उद्दिष्ट पूर्ण करावे -         जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. 26 : राज्याच्या एकूण क्षेत्राच्या ३३ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. जिल्ह्यात यंदा ३१.२८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.   नियोजित वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. जि प मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, महापालिकेच्या आयुक्त सुनील लहाने, जिल्हा उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, सामाजिक वनीकरण अधिकारी रोहित चौबे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, राज्याचे सध्याचे वनाच्छादन व वृक्षाच्छादन अनुक्रमे १६.५३ टक्के व ४.७२ टक्के असे २१.२५ टक्के आहे. हे प्रमाण ३३ ...

जीडीसी अँड ए परीक्षा २६ ते २८ मे दरम्यान

  जीडीसी अँड ए परीक्षा २६ ते २८ मे दरम्यान अकोला, दि. २६ - सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत गव्ह. डिप्लोमा इन को-ऑपरेशन अँड अकौंटन्सी (जी.डी.सी. अॅन्ड ए.) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा अकोला येथे घेण्यात येत आहे. तशी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील १९१ परीक्षार्थी उपस्थित राहणार आहेत. ही दि. २६, २७ व २८ मे रोजी खंडेलवाल ज्ञानमंदिर शाळा, श्री. इंदिरादेवी मोहनलाल खंडेलवाल स्मृती विद्यालय, अकोला, विजय गृहनिर्माण संस्था, गोरक्षण रस्ता, अकोला असा आहे. सदर परीक्षेची वेळ सकाळी १० ते १ व दु. २ ते सायं.५ वा. पर्यंत अशी आहे.   ज्या परीक्षार्थीचे प्रवेश पत्र तांत्रिक अडचणीमुळे डाऊनलोड होऊ शकले नाही, त्यांनी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपेक्षा किमान एक तास अगोदर सदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. मुख्यालयाकडून प्राप्त उपस्थिती पत्रकावरुन व परीक्षार्थीचे छायाचित्र ओळखपत्रावरुन पडताळणी करुन परीक्षार्थीना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल, तरी सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी. ०००

पीएम इंटर्नशीप योजनेत ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’मध्ये प्रशिक्षण

  पीएम इंटर्नशीप योजनेत ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’मध्ये प्रशिक्षण अकोला, दि. 26 : कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री इंटर्नशीप योजना राबविण्यात येत आहे.   भारतातील पहिल्या ५०० नामांकित कंपन्यामध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन त्यांचे कौशल्य विकसित करणे हा त्याचा उद्देश आहे. अकोला जिल्ह्यातील उमेदवारांना संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, अकोला या कार्यालयाच्या वतीने पं. दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (प्लेसमेंट ड्राईव्ह) आयोजन दि. २९ मे २०२६ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, २ रा माळा, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे केले आहे. रोजगार मेळाव्यामध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा चाकण (पुणे) या नामांकित कंपनीने त्यांच्याकडील प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (पीएमआयएस) अंतर्गत प्रशिक्षण संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या मेळावाद्वारे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवाराच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात...