रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1739 चाचण्यात 192 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 19 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात काल (दि.18) दिवसभरात झालेल्या 1739 चाचण्या झाल्या त्यात 192 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला येथे 19 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोट येथे 95 चाचण्या झाल्या त्यात 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर
येथे 18 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,
पातूर येथे 160 चाचण्या झाल्या त्यात 28 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,
तेल्हारा येथे 88 चाचण्या झाल्या त्यात सात
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 250 चाचण्या झाल्या त्यात 22 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे 730 चाचण्या
झाल्या त्यात 50 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए
येथे 11 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 76 चाचण्या झाल्या त्यात 23 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 97 चाचण्या
झाल्या त्यात 35 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच बार्शीटाकळी येथे 161, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 34 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल
पॉझिटिव्ह आला नाही. असे 1739 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 192 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष
37 हजार 164 चाचण्या झाल्या पैकी 12477
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा