2585 अहवाल प्राप्त, 489 पॉझिटीव्ह, 403 डिस्चार्ज, सहा मृत्यू


अकोला,दि.5(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2585 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2096  अहवाल निगेटीव्ह तर 489 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 403  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर सहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.4) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 205 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 43121(33068+9876+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 489   रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 205 असे एकूण पॉझिटीव्ह 694 आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 215946 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 213033 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2526 नमुने होते. आजपर्यंत एकूण 215798 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 182730   आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

489 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात ४८९ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १८४ महिला व ३०५ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-३८, अकोट-७४, बाळापूर-३४, तेल्हारा-चार, बार्शी टाकळी-१३, पातूर-८७, अकोला-२३९. (अकोला ग्रामीण-७५, अकोला मनपा क्षेत्र-१६४)

दरम्यान काल (दि.4) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 205 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

सहा जणांचा मृत्यू

आज दिवसभरात सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात बाळापूर येथील ७० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. ३ मे रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य गोरक्षण रोड येथील ७९ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २७ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, खोलेश्वर येथील ७० वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. २६ रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी येथील ५० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते. अकोला फैल  येथील ६२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ४ मे रोजी दाखल करण्यात आले होते, तर  देऊळगाव ता. पातूर येथील ६४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.३० एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

  403 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २२, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, नवजीवन हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील एककोविड केअर सेंटर अकोट येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी दोन, केअर हॉस्पीटल येथील एक,युनिक हॉस्पीटल येथील एक, आगर हॉस्पीटल येथील दोन, जिल्हा कर्मचारी भवन येथील एक, समाज कल्याण वसतीगृह येथील सहा, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, तर होम आयसोलेशन मधील ३४५ असे एकूण ४०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

5977 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 43121(33068+9876+177) आहे. त्यात 743 मृत झाले आहेत. तर 36401 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5977 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन